दीपक मोहिते,
येणाऱ्या काळात पाकिस्तानची अर्थव्यवस्था पार रसातळला जाणार…
११ ऑक्टोबर २०२६ राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी खैबर पख्तूनख्वा राज्यात आणीबाणी लावली आहे.
संविधानाच्या कलम २३२ आणि २३४ अंतर्गत झरदारी यांनी वरील कारवाई केली आहे.सतत होणाऱ्या दहशतवादी हल्यामध्ये झालेली वाढ, प्रांतीय सरकार दहशतवादाविरुद्ध लढण्यात अपयशी,”
इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक इन्साफ पक्षाचे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, र
पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इम्रान खान यांच्या सुटकेसाठी इस्लामाबादकडे लॉन्ग मार्च काढला होता, इम्रान खान यांच्या सुटकेसाठी, तो रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे.अशी बिकट परिस्थिती असताना लष्करप्रमुख असीम मुनीर हे सध्या आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत.
पाकिस्तानात सध्या चारही बाजूने आग लागली आहे,
बलुचिस्तान : बीएलए ( बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ) बीएलएफ ( बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट ) सारख्या संघटनांकडून वारंवार होणारे दहशतवादी हल्ले,या हल्ल्यात २०२५ साली पाक लष्कराचे १२०० हुन अधिक जवान मारले गेले.
सिंध, पंजाब : महागाईविरोधी सतत होणारी आंदोलने,
पाकव्याप्त काश्मीर : निदर्शने, बंद, मोर्चे व अशा हिंसक हिंसक घटनाना ऊत,
खैबर पखतनूख्वाब : तहरीक तालिबान ऑफ पाकिस्तान या दहशतवादी संघटनेकडून होत असलेले हल्ले,
अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तान सरकारने सौदी अरेबियाला सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला आहे, सैन्य आधीच तेथे ठाण मांडून बसले आहे. गेल्या ऑगस्ट २०२६ मध्ये मक्का सुरक्षा कराराचे पालन करण्यासाठी पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्की यांच्यात त्रिपक्षी करार झाला, या करारानुसार एकावर हल्ला म्हणजे तिघांवर हल्ला, असे समजून एकमेकांच्या मदतीला धावून जाणे, असा करार करण्यात आला. पाकिस्तानच्या लष्कराचे प्रवक्ते लेफ्ट. जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सीएनएन या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये “आमचे सैन्य आधीच सौदीत आहे, व ते अनेक दशकांपासून आहे,” सध्या हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियावर हल्ले चढवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आम्हाला सौदीमध्ये सैन्य पाठवावे लागत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार ८,००० ते ४०,००० सैनिक पाठवण्यात येत आहेत, हुथी बंडखोरांच्या ड्रोन हल्ल्यांपासून सौदीच्या विमानतळांचे रक्षण करण्यासाठी पाकिस्तान सरकार ही उपाययोजना करत आहे. पण पाकिस्तान सरकारने घेतलेल्या या निर्णयाविरोधात पाकीस्तानात सध्या जनमत खवळले आहे.
सरकारचे मत : सौदी हा आपला धार्मिक आणि आर्थिक मित्र आहे, पवित्र स्थळांचे रक्षण करणे पाकिस्तानचे कर्तव्य आहे.
विरोधकांचे मत : संसदेची परवानगी न घेता लष्करप्रमुख असिम मुनीर यांनी हा निर्णय घेतला आहे.देशांतर्गत सुरक्षा ढासळली असताना परदेशात सैन्य पाठवणे आम्हाला मान्य नाही.
जनतेचे म्हणणे : देशात महागाई, कायदा व सुव्यवस्थेची गंभीर स्थिती, दहशतवादी संघटनाकडून होणारे आत्मघाती हल्ले, ढासळलेली अर्थव्यवस्था, वाढती बेरोजगारी अशी एक ना अनेक संकटे देशासमोर असताना लष्कराने घेतलेला निर्णय हा देशाला आर्थिक खाईत ढकलणारा आहे, असे मत विविध क्षेत्रातील तज्ञानी व्यक्त केले आहे. पण पाकचे लष्कर सध्या कोणाचेही ऐकण्याच्या
मन:स्थितीत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात पाकिस्तानची अर्थव्यवस्था पार रसातळाला जाण्याची शक्यता आहे.

