दीपक मोहिते,
” आश्चर्यकारक,
गुजरात राज्यातील स्था.स्व.संस्थाच्या निवडणुकांमध्ये भाजप सरस ; सारे विरोधी पक्ष भुईसपाट,
देशभरात भाजपविरोधात वातावरण असताना भाजपने गुजरात राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व आम आदमी पार्टी या दोन्ही पक्षाना चांगलीच धूळ चारली आहे. या निवडणुकीत विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना त्यांच्या होम ग्राऊंडवर घेरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते शक्य झाले नाही.
गुजरात राज्यातील १५ महानगरपालिका, ८४ नगरपालिका व जिल्हा / पंचायत समित्यांच्या निवडणुकासाठी १२ ऑक्टो. रोजी मतदान पार पडले. काल झालेल्या मतमोजणीमध्ये, गांधीनगर महापालिका – एकूण ४४ जागापैकी भाजपने ३८ जागा जिंकून आपले वर्चस्व कायम राखले.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – ०५, अपक्ष – ०१, असे बलाबल निर्माण झाले. २०२१ मध्ये भाजपला ४१ जागा मिळाल्या होत्या. येथे ५९.२५ % मतदान झाले होते.
थारा महापालिकेत ( बनासकाठा ) एकूण २४ जागापैकी भाजपने १९ जागांवर विजय मिळवला. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा घोडा ५ जागावर अडखळला. येथे ८१.१८ % मतदान झाले होते. ओखा नगरपालिकेत ( द्वारका ) भाजपने ३६ पैकी ३३ जागा जिंकल्या, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला केवळ ०३ जागा जिंकता आल्या. येथे ६३.२७ % मतदान झाले होते. या तीन महापालिकेतील १०४ जागापैकी ९० जागा भाजपने जिंकल्या. गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणुका जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आम आदमी पार्टीला या निवडणुकीत चांगलाच फटका बसला. गांधीनगरमध्ये त्यांना खातेही उघडता आले नाही. येथे त्यांच्या सर्व उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या.
राज्यात झालेल्या निवडणुकामध्ये एकूण ०९ हजार ९८६ जागापैकी भाजपने ०६ हजार ४७२ जागा जिंकल्या. ( ७५.०३ % ) ७३१ जागा बिनविरोध झाल्या. २०२१ मध्ये केवळ २४१ जागा बिनविरोध झाल्या होत्या. एकूण १५ पैकी १५ महापालिकेवर भाजपने पुन्हा वर्चस्व राखले.
अहमदाबाद – १९२ पैकी १६०,
सुरत – १२० पैकी ११५,
राजकोट – ७२ पैकी ६५,
एकूण ८४ पैकी ७८ नगरपालिकावर भाजपने भगवा फडकवला आहे.
या निवडणुका बॅलट पेपरवर झाल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले, पण त्यांच्या या दाव्यात तथ्य नाही, कारण केंद्रीय निवडणूक आयोगाने या निवडणुका ईव्हीएम मशीनवर झाल्याचे स्पष्ट केले आहे.
देशात भाजपविरोधी वातावरण असताना भाजपने केलेली कामगिरी नक्कीच कौतुकास्पद अशीच आहे.

