दीपक मोहिते,
जलसक्षरता,
पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे महत्वाचे आहे,
यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्यामुळे राज्याच्या सुमारे २६५ तालुक्यात भीषण दुष्काळ पडला आहे. या नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना सरकारची चांगलीच दमछाक होत आहे. या ज्वलंत विषयी आपण वेळीच सावध होण्याची गरज आहे.२०२७ चे पहिले सहा महिने ( जाने.- जून २०२७ ) आपल्यासाठी कसोटीचा काळ ठरणार आहे. भीषण दुष्काळ, तीव्र पाणीटंचाई, भुगर्भातील पाण्याचा अविरत उपसा व अल निनोचे आक्रमण, अशा नैसर्गिक संकटानी आपण चहूबाजूनी घेरले जाणार आहोत. त्यामुळे राज्यातील प्रत्येक नागरिकाने जलसाक्षरतेचे महत्व जाणून घेणे गरजेचे आहे.
पाण्याची बचत, उपलब्ध पाण्याचा जपून वापर, रेन हार्वेस्टिंग, समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून साठा करणे, पाणी वाया जाऊ नये, यासाठी कठोर उपाययोजना करणे, असा कार्यक्रम राबवल्यास काही अंशी पाणीटंचाईची दाहकता कमी होऊ शकते.
रेन हार्वेस्टिंग – पावसाचे पाणी साठवा ( डायग्राम )
समुद्रात जाणारे पाणी अडवणे – बंधारा / चेक डॅम नळाला एरेटर, ठिबक सिंचन, बंधारे,यासाठी कठोर नियम लागू करणे,अशा उपाययोजना करायला हव्यात.
शहरी भागात बांधकामासाठी लागणाऱ्या पाण्याचे नियोजन, भुगर्भातील पाण्याचा होणारा प्रचंड उपसा रोखणे, डोंगर माथ्यावरून कोसळणारे कोट्यवधी दशलक्ष लिटर पाणी वापराविना समुद्रात वाहून जाते. त्याचा वापर करण्यासाठी सरकारने कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला पाहिजे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे,ही काळाची गरज ठरली आहे. अल निनो सारखी संकटे आता आपल्यावर वारंवार आदळणार आहेत. त्यामुळे केवळ सरकारवर अवलंबुन राहून चालणार नाही, प्रत्येक नागरिकाने या संकटावर मात करण्यासाठी स्वतःला झोकून देण्याची गरज आहे.

