- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- राष्ट्रवादी काँग्रेसला ( अजित पवार ) फुटीचे ग्रहण लागण्याची शक्यता,
- मुंबई व ठाणे जिल्ह्यात मराठी बोलणाऱ्यांची संख्या घसरणीवर,
- प्रियंका व राहुल गांधी राजघाटावर दाखल ; आंदोलन अधिक तीव्र होणार,
- पालघर जिल्हा परिषद ; कागदविरहित बैठक प्रणालीचा शुभारंभ,
- भुजलाची पातळी झपाट्याने खालावत चालली आहे…
- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ; सोहळे मोठे व लक्षण खोटे,
- नाना, कोणालाही न सांगता निघून गेले ; अवघे सिनेजगत स्तब्ध,
- सरकार सुमारे ५० हजार शेतकऱ्यांच्या उरावर उभारतोय शक्तिपीठ महामार्ग,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” राष्ट्रवादी काँग्रेसला ( अजित पवार ) फुटीचे ग्रहण लागण्याची शक्यता, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( अजित पवार गट ) सुरु असलेले शीतयुद्ध काही थांबायचे नाव घेत नाही. काल पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यानी केलेल्या एका वक्तव्यामुळे आगीत तेल ओतले गेले आहे. यापूर्वी सुनील तटकरे यांनी पक्षांच्या ज्येष्ठ नेत्या व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केल्यामुळे पक्षात वातावरण तापले होते. अशावेळी प्रफुल्ल पटेल यांनी टायमिंग साधत पुणे शिक्षक मतदारसंघाची आपल्या पक्षाला मिळाली असती तर चांगल झालं असते. असे स्पष्ट करत सुनेत्रा पवार यांना लक्ष्य केले. या सर्व धडामोडी लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेला सत्तासंघर्ष टिपेला पोहोचल्याचे…
दीपक मोहिते वास्तव लक्षात घ्या, मुंबई व ठाणे जिल्ह्यात मराठी बोलणाऱ्यांची संख्या घसरणीवर, गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, म्हणून आपण केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा करत होतो. पण सरकार काही दाद देत नव्हते. मात्र दोन वर्षांपूर्वी ऐन निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने याविषयी निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या या निर्णयाने महाराष्ट्रातील जनता चांगलीच सुखावली. पण मराठी भाषा किती बोलली जाते, याबाबतच्या आकडेवारीवरून जर एक नजर टाकली तर किती भयावह स्थिती आहे, हे आपल्याला जाणवते. अशी परिस्थिती का व कशी निर्माण झाली यासाठी आपल्याला इतिहासात डोकवावे लागणार आहे.सन १९५१ साली राज्य पुनरर्चना आयोगाच्या अहवालानुसार मुंबई शहरात मराठी माणसे ४३.६ % होते.…
सुनील अरोरा : दिल्ली, प्रियंका व राहुल गांधी राजघाटावर दाखल,आंदोलन अधिक तीव्र होणार, भाजप व इंडिया आघाडी यांच्यात मुख्य निवडणूक आयुक्त यांनी राजीनामा द्यावा यासाठी सध्या धमासन सुरु आहे.निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आज काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दिल्लीतील राजघाटावर आज सामूहिक प्रार्थना केली. निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील इंडिया आघाडीच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. गुरुवारी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दिल्लीतील राजघाटावर मोर्चा काढला.…
दीपक मोहिते, पालघर जिल्हा परिषद,; कागदविरहित बैठक प्रणालीचा शुभारंभ, जिल्हा परिषद पालघरच्या प्रशासकीय कामकाजात डिजिटल परिवर्तनाला महत्त्वपूर्ण सुरुवात झाली आहे. काल मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत कागदविरहित बैठक ही कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम डिजिटल बैठक व्यवस्थापन प्रणालीचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असा प्रयोग राबवणारी ही पहिलीच जिल्हा परिषद ठरली आहे. या उपक्रमाचा प्रस्ताव उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन ) इजाज अहमद शरिक मसलत यांनी मांडला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी या प्रस्तावाला त्वरित मान्यता देत प्रणालीच्या अंमलबजावणीला गती दिली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली कालची स्थायी समिती…
दिपक मोहिते, भयावह वास्तव, भुजलाची पातळी झपाट्याने खालावत चालली आहे… पावसाचे प्रमाण कमी होणे, भुगर्भातील पाण्याच्या साठ्यात घट होणे व वातावरणात प्रदूषणाची वाढ, अशी चार कारणे, सध्या मानवी जीवनाच्या मुळावर आली आहेत. भुगर्भातील पाण्याचा साठा कमी होणे, हे फार मोठे संकट जगभरात गहिरे होत चालले आहे. महाराष्ट्रात विशेष करून वसई – विरार व पालघर पट्ट्यात भुजल पातळी दरवर्षी १ ते २ मीटरने खाली जात आहे. १९५० – ६० दरम्यान दहा ते वीस फुटावर लागणारे पाणी आज दोनशे ते तीनशे फुटावरही लागत नाही. यास मानवाचा हव्यास कारणीभूत ठरला आहे. पाण्याचा प्रचंड उपसा ( ७० ते ७५ % ) ग्रामीण भागातील ऊस…
दीपक मोहिते, ” घडलंय बिघडलंय, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ; सोहळे मोठे व लक्षण खोटे, मराठी भाषेला इतर भाषेप्रमाणे अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी गेली अनेक वर्षे राज्यातील विविध सामाजिक संस्था तसेच राज्य सरकार जोरदार प्रयत्न करत होते. पण केंद्र सरकार तो दर्जा देण्यासंदर्भात सतत चालढकल करत होते. अखेर तीन ऑक्टो. २०२४ रोजी केंद्र सरकारने हा दर्जा देण्यास हिरवा कंदील दाखवला. नुकताच ३ ऑक्टो. २०२६ रोजी पहिला मराठी अभिजात भाषा दिवस आणि अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा झाला. या सप्ताहाचे उदघाट्न राज्याचे मुख्यमंत्री यांनी केले. या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षात भाषेला प्रत्यक्षात किती फायदा झाला ? याविषयी आढावा…
दीपक मोहिते, नाना, कोणालाही न सांगता निघून गेले ; अवघे सिनेजगत स्तब्ध, आज पहाटे प्रसिद्ध अभिनेते नाना उर्फ विश्वनाथ पाटेकर यांचे गोव्यातील डोना पावलो येथील त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते ७५ वर्षाचे होते. त्यांच्या अचानक एक्सिटने अवघे सिनेजगत स्तब्ध झाले आहे. त्यांचा जन्म १ जाने. १९५१ रोजी मुरुड-जंजिरा, रायगड येथे झाला. मुंबईच्या सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट, येथे त्यांचे शिक्षण झाले. १९७८ साली गमन चित्रपटातून त्यांचे बॉलिवूडमध्ये पदार्पण झाले. त्यांचे गाजलेले चित्रपट : परिंदा (१९८९) – राष्ट्रीय पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहअभिनेता, क्रांतिवीर (१९९४) – राष्ट्रीय पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता, अग्निसाक्षी, खामोशी, अब तक छप्पन, अपहरण, वेलकम…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” सरकार,सुमारे ५० हजार शेतकऱ्यांच्या उरावर उभारतोय शक्तिपीठ महामार्ग, राज्यात भीषण दुष्काळ पडला असताना फडणवीस सरकार १३ जिल्हे, ४० तालुके व ३९५ गावातील शेतकऱ्यांच्या उरावर शक्तिपीठ महामार्ग बांधत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेले वाढवण बंदराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प उभारण्यात येत आहे.या प्रकल्पासाठी सरकारने १ लाख कोटी रु. ची आर्थिक तरतूद केली आहे. दुष्काळग्रस्त गावातील शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसा नाही. मात्र प्रचंड पैसा ओतून हा महामार्ग उभारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पोलीस बंदोबस्तात सरकारी अधिकाऱ्यांनी जमिनीची मोजणी सुरु केली आहे. हा महामार्ग सिंधुदुर्ग ते नागपूर दरम्यात बांधण्यात येत आहे. त्यामुळे फायदा…
दीपक मोहिते, ” स्पॉटलाईट,” केवळ धर्मेंद्र प्रधान व ज्ञानेशकुमारला हटवून व्यवस्था सुधारणार का ? संपूर्ण व्यवस्थेतच बदल हवा, देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्याभोवती सध्या मोठे वादळ उठले आहे. राहुल गांधी आणि इंडिया आघाडी त्यांच्या राजीनाम्याची सतत मागणी करत आहेत, तर माजी सनदी अधिकाऱ्यांनी त्यांना ‘ जनतेचा महाभियोग,’ नोटीस पाठवली आहे. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, ५ ऑक्टो. २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना तात्पुरते निलंबित करण्यास नकार दिला आहे. लोकसभा अध्यक्षांनीही हटवण्याचा प्रस्ताव एप्रिलमध्येच फेटाळला होता. म्हणून मूळ प्रश्न असा आहे की, समजा ज्ञानेशकुमार हटले तरी व्यवस्था सुधारेल आहे का ? उत्तर आहे – नाही. कारण सरकारच्या प्रत्येक विभागात असे…
दीपक मोहिते, पालघर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपच सरस ठरणार… ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वर्चस्व आहे, तसे पालघर जिल्ह्यात एकाही राजकीय पक्षाला पालघर जिल्हावासियांनी कधीही एकहाती सत्ता सोपवली नाही.अशी स्थिती असताना देखील भाजपने या जिल्ह्यात बऱ्यापैकी बस्तान बसवले आहे.या जिल्ह्यात भाजपची मदार उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी व अन्य भाषिक समाजाच्या मतदारावर आहे. पालघर व बोईसर मतदारसंघात कुणबी, आगरी, वंजारी व आदिवासी समाज शिवसेनेचा ( शिंदे गट ) कट्टर पाठीराखा आहे. एकेकाळी हा संपूर्ण परिसर ठाणे जिल्ह्यात होता, त्याकाळी समाजवादी पक्षाचे वर्चस्व होते. कालांतराने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने काही काळ आपले पाय रोवले.पण त्यांना फार काळ आपले वर्चस्व राखता आले नाही. १९८५…
