- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- आज झालेल्या हायव्होल्टेज ड्राम्याने विरारकर नागरिकांचे चांगलेच मनोरंजन,
- लोकशाही म्हणजे अल्पमताचा आदर करणारे बहुमत – ऍड. जयंत जायभावे,
- भूकंपाच्या घटनामध्ये लक्षणीय वाढ ; डहाणू व तलासरीच्या गावांमध्ये भितीचे वातावरण,
- उशीरा का होईना, पण एकदाची पहाट झाली तर…
- क्लस्टर व पुनर्विकासमधील जीवघेण्या स्पर्धेमुळे ठाण्यातील गुन्हेगारीचा वेलू गगनावर…
- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तासंघर्ष जोमात ; पार्थ पवार विरुद्ध सुनील तटकरे,
- प्रशासकीय राजवटीतील एफएसआयचे घोटाळे चव्हाट्यावर,
- रेखा चवरे यांच्या पुस्तकाचे थाटामाटात प्रकाशन,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आजच्या हायव्होल्टेज ड्राम्याने विरारकर नागरिकांचे चांगलेच मनोरंजन, एखाद्या विकासकामाचे दोन वेळा लोकार्पण सहसा होत नसते, मात्र त्यास वसई विरार हा परिसर अपवाद ठरला आहे. या उपविभागात अनेकदा भूमिपूजने दोन ते तीन वेळा झाल्याचे ऐकीवात आहे. पण लोकार्पण सोहळा एकाच दिवशी दोनदा करण्यात आल्याचे आज पहिल्यांदाच पाहायला मिळाले. वसईचे माजी आ. हितेंद्र ठाकुर यांच्या ६१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत बहुजन विकास आघाडीने आज महानगरपालिकेच्या विरारस्थित क्रीडासंकुल व नालासोपारा येथील नाट्यगृह अशा दोन कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. पण या कार्यक्रमास विरोधी पक्ष असलेल्या भाजपने तीव्र विरोध केला. याप्रकरणी भाजपचे दोन आमदार व खासदारांनी आक्षेप घेतला. त्यामुळे…
दीपक मोहिते, लोकशाही म्हणजे अल्पमतांचा आदर करणारे बहुमत, – अॅड. जयंत जायभावे, आज वसई येथील कृपामाता सभागृह, पापडी येथे सुवार्ता साहित्य मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी बोलताना मुख्य वक्ते म्हणून महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष, कायदेतज्ज्ञ अॅड. जयंत जायभावे म्हणाले, ” आपणा सर्वांचे सगळ्यात मोठे राष्ट्रीय कर्तव्य म्हणजे सर्वश्रेष्ठ असलेल्या भारतीय संविधानाची माहिती प्रत्येक भारतीय नागरिकाला असली पाहिजे. लोकांची संविधानाविषयाची निरक्षरता म्हणजे लोकशाहीचा पराभव आहे. ऐतिहासिक परंपरेतून आपल्या भारत देशाची निर्मिती झाली आहे. या देशात निर्माण झालेली सत्ताकेंद्रे वरून निर्माण झाली नसून लोकांच्या अधिकारातून निर्माण झाली आहे. भारत देशातील संविधानाच्या प्रास्ताविकातून न्याय, स्वातंत्र्य, समता या तीन तत्त्वांनी हातात…
दीपक मोहिते, ” भितीचे सावट, ” भूकंपाच्या घटनामध्ये लक्षणीय वाढ ; डहाणू व तलासरीच्या गावामध्ये भितीचे वातावरण, पालघर जिल्ह्यातील डहाणू – तलासरी हे तालुके भूकंप प्रवण तालुके म्हणून ओळखले जातात. गेल्या काही वर्षात या परिसरात भूकंपाचे मध्यम स्वरूपाचे ६० ते ७० धक्के बसले.( ३ ते ४.१ रिष्टर ) या भूकंपामुळे या दोन्ही तालुक्यातील सुमारे १ हजार ९२३ घरांना तडे गेले तर काही घरांच्या भिंती कोसळल्या.२०१९ साली झालेल्या भूकंपात घराबाहेर पडताना एका २ वर्षें वयाच्या मुलीचा मृत्यू झाला होता. गेल्या आठवड्यात म्हणजे २७ सप्टें. रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ३.६ रिष्टरचा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू डहाणू तालुक्यातील मोडगाव या गावात होता.…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” उशीरा का होईना, पण एकदाची पहाट झाली तर… वसई – विरार शहर महानगर पालिकेचे क्रीडा संकुल व नाट्यगृहाचे आज उदघाटन होणार आहे. माजी आ. हितेंद्र ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा सोहळा पार पडत आहे. अनेक वर्षांपासून रखडलेली नागरिकांची ही मागणी अखेर मार्गी लागल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. पण आता सत्ताधारी बहुजन विकास आघाडी व विरोधी पक्ष असलेल्या भाजप या दोघामध्ये श्रेय घेण्यावरून ” तू तू मै मै,” सुरु झाले आहे. महापौर अजीव पाटील यांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेवरुन आता भाजपने जोरदार टिकास्त्र सोडले आहे. नालासोपाऱ्याचे आ. राजन नाईक यांनी ही दोन्ही विकासकामे राज्याचे…
दीपक मोहिते, वाढती गुन्हेगारी, क्लस्टर व पुनर्विकासमधील जीवघेण्या स्पर्धेमुळे ठाण्यातील गुन्हेगारीचा वेलू गगनावर… ठाण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलीस यंत्रणा, नियंत्रण करण्याकामी अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाने पोलीस यंत्रणेची लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत. भाजप आ. संजय केळकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले कि ठाणे आता ” तलावांचे शहर” राहिले नाही. आनंदनगर ते घोडबंदर पर्यंत प्रचंड पुनर्विकास आणि क्लस्टर डेव्हलपमेंटची कामे सुरू आहेत. प्रत्येक बिल्डिंग मागे ५००-१००० कोटींचा आर्थिक व्यवहार आहे. केळकर पुढे म्हणाले,” बांधकाम मटेरियल सप्लाय, कामगार, पार्किंग, विक्री यावरून ठाण्यात टोळी युद्ध सुरू झाले आहे. फक्त एप्रिल २०२६ मध्ये ठाणे आयुक्तालयाच्या ३५ पोलीस ठाण्यात १…
दीपक मोहिते , ” हल्लाबोल,” राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तासंघर्ष जोमात ; पार्थ पवार विरुद्ध सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि रायगडचे खा. सुनील तटकरे यांचे राजकीय भवितव्य सध्या धोक्यात आले आहे. हल्ली पक्षातील एक गट त्यांचे पंख कापण्याची एकही संधी सोडत नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची सर्व सूत्रे आपल्या ताब्यात राहावीत, यासाठी पार्थ पवार सध्या जोमाने कामाला लागले आहेत. रायगडमध्ये भरत गोगावले यांना अदिती तटकरे यांना हटवून पालकमंत्रीपद देण्यासाठी याच गटाने महत्त्वाची भूमिका बजावली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. जाने. २०२६ मध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीत ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे…
दीपक मोहिते, ” स्पॉटलाईट, ” प्रशासकीय राजवटीतील एफएसआयचे घोटाळे चव्हाट्यावर, वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रशासकीय राजवटीत मंजूर झालेल्या अतिरिक्त एफएसआयच्या प्रकरणांची सखोल चौकशी झाल्यास मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी विकासक, आर्किटेक्ट व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत मिळत आहेत.राज्याचे अप्पर सचिव असीम गुप्ता यांनी महानगरपालिकेला तसे निर्देश दिले आहेत. अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशकांचा वापर केल्याचे समोर आलेल्या ८८ पुनर्विकास प्रकल्पांवर नगररचना विभागाने सुनावण्या घेतल्यानंतर आता २०२२ ते २०२५ या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने देण्यात आलेल्या बांधकाम परवानग्यांचीही तपासणी करण्यात होणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या दप्तरी असलेल्या नोंदी व महारेराकडे नोंद करण्यात आलेल्या प्रकल्पांची पडताळणी होणार आहे.नियमबाह्य अतिरिक्त एफएसआयचा वापर…
दीपक मोहिते, ” साहित्य संपदा, ” रेखा चवरे यांच्या पुस्तकाचे थाटामाटात प्रकाशन, प्रसिद्ध लेखिका रेखा चवरे यांच्या ‘ ये हृदयी चे ते हृदयी, ‘ या पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी कथन केलेल्या गाण्यांच्या सर्जनशील आठवणींच्या पुस्तकाचे प्रकाशन सकाळ समूहाचे अध्यक्ष पद्मश्री प्रतापराव पवार यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह पुणे येथे झाले. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या ९७ व्या जन्मदिनानिमित्त पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सादर केलेल्या लतादीदी आशाताई आणि मी या सांगीतिक कार्यक्रमात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषाताई मंगेशकर, भारतीताई मंगेशकर, प्रतापराव पवार ,अमोल पालेकर ,सुरेश वाडकर या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला. सदर पुस्तक म्हणजे कला…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” मुंबई – गोवा महामार्ग लवकर पूर्ण होण्याची शक्यता नाही… गेली १३ वर्षे रखडलेला मुंबई – गोवा महामार्ग ( एनएच – ६६ ) हा महाराष्ट्राचा सर्वात दुर्देवी प्रकल्प ठरला आहे. राज्यकर्त्यांच्या नालायकपणामुळे हा महत्वाचा प्रकल्प खड्ड्यात गेला आहे. इतर प्रकल्पासाठी बळजबरीने जमिनी संपादन करणारे सरकार या प्रकल्पासाठी जमिनी संपादन करू शकत नाही, ही बाब दुर्देवीच म्हणावी लागेल. राज्यात फडणवीस सरकारने गेल्या चार वर्षात समृद्धी, द्रूतगती,ग्रीनफिल्ड, मेट्रो, कोस्टल असे अनेक प्रकल्प मार्गी लावले, पण हा महामार्ग मार्गी लावण्यात या सरकारला अपयश का आले ? यावर विचार करायला हवा. भुसंपादनाचा वाद हे सर्वात मोठे कारण असल्याचे शासकीय अधिकाऱ्यांचे…
दीपक मोहिते, खातेदारांना दिलासा, सूर्या प्रकल्पग्रस्तांना दिलासा, नवीन सातबारे मिळणार, पालघर तालुक्यातील मौजे हनुमाननगर व मौजे नेवाळे येथील सूर्या प्रकल्पग्रस्त खातेदारांच्या जमीन नोंदींबाबत राज्य मंत्रिमंडळाने नुकताच महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयानुसार संबंधित प्रकरणांचे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम २५७ अन्वये प्रकरणनिहाय पुर्ननिरीक्षण करण्यात येणार आहे. उपलब्ध वाटप आदेश, महसुली अभिलेख, प्रत्यक्ष ताबा, शेतीवहिवाट आणि आवश्यक क्षेत्रीय पडताळणीच्या आधारे पात्र खातेदारांच्या नोंदी अद्ययावत करून नवीन ७/१२ उतारे तयार करण्यात येणार आहेत. अद्ययावत ७/१२ नोंदींमुळे पात्र खातेदारांना जमीनविषयक व्यवहार, पीक कर्ज, पीक विमा तसेच विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक अभिलेख उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. वाढवण बंदराशी संबंधित ग्रीनफिल्ड महामार्गाच्या भूसंपादन…
