- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- आ. हरिश्चंद्र भोये ; आदिवासी समाजाचे बहुआयामी नेतृत्व,
- एपस्टीन फाईलच्या कागदपत्रानी अनेकांची झोप उडवली…
- एपस्टीन फाईल ; अनेकांचे चेहरे समोर येणार…
- … आता सुशिक्षित तरुणांनी पुढे यायला हवे,
- महायुतीमध्ये धुसफूस सुरु ; लवकरच कुस्तीचा फड रंगण्याची शक्यता…
- माजी खा. राजन विचारे व माजी आ. अनिल परब यांचे ठाणे पोलिसांवर सनसनाटी आरोप,
- राज्यातील सर्वात गरीब लोकप्रतिनिधी ; आ. कॉ. विनोद निकोले,
- पालघरवासियांना देशोधडीला लावणाऱ्या वाढवण बंदरा विरोधात जनआक्रोश…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, विक्रमगडचे आ. हरिश्चंद्र भोये, ( अंतिम भाग ) आ. हरिश्चंद्र भोये ; आदिवासी समाजाचे बहूआयामी नेतृत्व, काही महत्वाच्या कामामुळे विक्रमगडचे आ. हरिश्चंद्र भोये यांच्यावर लेख वेळेवर लिहिता आला नाही. यापूर्वी वसईच्या आ. स्नेहा दुबे पंडित, नालासोपाऱ्याचे आ. राजन नाईक, पालघरचे आ. राजेंद्र गावित, बोईसरचे आ. विलास तरे व डहाणूचे आ. कॉ. विनोद निकोले यांच्या बाबतीत आम्ही सविस्तर विवेचन केले. पण विक्रमगडचे आ.हरिश्चंद्र भोये यांच्या विषयी लेख लिहिण्यास थोडा उशीर झाला क्षमस्व, आ. हरिश्चंद्र भोये २०२४ साली पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले.अपेक्षेनुसार त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार ) सुनील भुसारा यांचा तब्बल ४१ हजार ४०८ मतांनी पराभव केला.भाजपच्या…
दीपक मोहिते, ” स्पॉटलाईट,” एपस्टीन फाईलच्या कागदपत्रानी अनेकांची झोप उडवली… कालच्या भागात ” एपस्टीन फाईल, ” या लेखात जेफ्रि एपिस्टनची गुन्हेगारी वाटचालीवर प्रकाश टाकला. आज त्याच्या गुन्हेगारीचा सर्वाधिक फटका कोणकोणत्या देशाला बसला याविषयी आढावा घेणार आहोत. तसेच त्याच्या जाळयात किती उद्योगपती व राजकीय नेते अडकले ? यावर प्रकाश टाकणार आहोत. एपस्टीन फाईलचा सर्वाधिक फटका युरोपला बसला. २००८ मध्ये जेफ्रि एपस्टीनला लैंगिक गुन्हा केल्या प्रकरणी शिक्षा झाल्यानंतरही एपस्टिनशी मैत्री ठेवल्यामुळे अनेक देशाचे नेते अडचणीत आले. आतापर्यंत १० देशात १५ हुन अधिक नेत्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत. ब्रिटन – १ ) प्रिन्स अँड्रयू राजा चार्ल्सचा भाऊ, १८ फेब्रु. २०२६ रोजी अटक, त्याचे…
दीपक मोहिते, एपस्टीन फाईल ( भाग क्र. १ ) एपस्टीन फाईल ; अनेकांचे चेहरे समोर येणार… *जेफ्रि एपस्टीन हा आज आपल्यात हयात नाही. त्याने १० ऑगस्ट २०१९ मध्ये मॅनहॅटन तुरुंगात आत्महत्या केली. जर त्याने आत्महत्या केली नसती तर त्यांची हत्याच झाली असती. *२० जाने. १९५३ साली त्याचा एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताचीच होती. त्याचे वडील एका पार्क डिपार्टमेंटमध्ये माळी होते. त्यामुळे जेफ्रिचे शिक्षण अर्धवट राहीले.* *१९७३ मध्ये त्याने डाल्टन स्कुलमध्ये गणित व भौतिक शास्त्राचा शिक्षक म्हणून काम केले. या शाळेत असलेल्या एका विद्यार्थ्यांच्या वडिलांमुळे वॉल स्ट्रीटवर असलेल्या बिअर स्ट्रीम्स या बँकेत त्याला नोकरी मिळाली. सन १९८२…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” …आता सुशिक्षित तरुणांनी पुढे यायला हवे, वसई व नालासोपारा मतदारसंघाच्या मतदारांनी गेल्यावर्षी न भूतो न भविष्यती असे परिवर्तन घडवून आणले, त्यानंतर झालेल्या वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत याच मतदारांनी बहुजन विकास आघाडी व भाजपला ५७ व ४३ % जागा निवडून दिल्या. ( बहुजन विकास आघाडी – ७१, भाजप – ४३ व शिवसेना शिंदे गट- ०१ ) पण हे दोन्ही पक्ष मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरू शकले नाहीत. गेल्या आठ महिन्यात या महानगरपालिकेत सध्या जे काही चालले आहे. त्यावरून हे दोन्ही पक्ष मतदारांच्या मनातून साफ उतरले आहेत. या दोन्ही मतदारसंघात विकासाचे अनेक प्रश्न गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित आहेत.…
दीपक मोहिते, महायुतीमध्ये धुसफूस सुरु; कवकरच कुस्तीचा फड रंगण्याची शक्यता… *विधान परिषद निवडणुकीनंतर महायुतीच्या घटक पक्षात चांगलीच जुंपली आहे. शिंदे गटाचे धंगेकर विरुद्ध भाजपचे नवनाथ बन व निलेश राणे विरुद्ध बन हे तिघे एकमेकांच्या झिज्या उपटत आहेत. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून एकनाथ शिंदे यांनी धंगेकरांना सबुरीने घेण्याचे सांगितले. एकंदरीत या सर्व घडामोडीवरून महायुतीमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत असून लवकरच कुस्तीचा फड रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.* *नुकतेच विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक पार पडली. पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, मराठवाडा पदवीधर, पुणे शिक्षक, अमरावती शिक्षक, या निवडणुकीत महाविकास आघाडीने तिन्ही पदवीधर मतदारसंघ तर महायुतीने फक्त दोन शिक्षक मतदारसंघ…
दीपक मोहिते, माजी खा.राजन विचारे व आ. अनिल परब यांचे ठाणे पोलिसांवर सनसनाटी आरोप, गेल्या महिन्यात ठाणे शहरात शिवसेनेचे ( उबाठा ) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येतील सर्व आरोपीना अटक करण्यात आली.मात्र या हत्येमधील खरे सूत्रधार अद्याप मोकळे फिरत आहेत, त्यांना त्वरित अटक करा, अशी मागणी पूर्णेकर कुटुंबियांनी केली आहे. २९ ससप्टें.२०२६ रोजी घोडबंदर रोडवरील मानपाडा येथे शिवसेना ( उबाठा ) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची त्यांच्या कार्यालयात घुसून गोळ्या झाडल्या आणि चॉपरने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. २९ ऑक्टो.ला हत्येला एक महिना पूर्ण झाला तरी हत्येचे नेमके कारण पोलिसांनाअद्याप स्पष्ट…
दीपक मोहिते, डहाणू : कॉ. विनोद निकोले, राज्यातील सर्वात गरीब लोकप्रतिनिधी : आ.कॉ. विनोद निकोले, डहाणूचे आ. कॉ. विनोद निकोले हे विद्यार्थी दशेपासून राजकारणात सक्रिय आहे. सुरुवातीला डिवायएफआय या विद्यार्थी संघटनेमध्ये सक्रिय होते.त्यानंतर सिटूमध्ये ठाणे – पालघर जिल्हा सचिव, मग महाराष्ट्र सिटूचे राज्य सचिव आणि माकप राज्य समिती सदस्य व सध्या, विधानसभा सदस्य. २०१८ साली नाशिक – मुंबई किसान लॉंग मार्चमध्ये सहभागी झाले होते. २०१३ – १५ दरम्यान आदिवासीच्या जमिनी व कामगार आंदोलनात त्यांच्यावर असंख्य गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना पाच जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.पण प्रशासनाच्या या आदेशाविरोधात सुमारे २५ हजार शेतकऱ्यांनी डहाणू पोलीस ठाण्याला घेराव घातला त्यामुळे पोलीस प्रशासन…
दीपक मोहिते, पालघरवासियांना देशोधडीला लावणाऱ्या वाढवण बंदरा विरोधात जनआक्रोश… वरोर येथे आयोजित करण्यात आलेल्या विनाशकारी वाढवण बंदरविरोधी जनआक्रोश सभेत हजारो ग्रामस्थानी सहभागी होऊन वाढवण विरोधी संघर्षाला पाठिंबा दिला. वाढवण बंदर हा केवळ एक प्रकल्प नसून पालघर जिल्ह्यातील निसर्ग, पर्यावरण, शेती, मासेमारी आणि स्थानिक जनजीवनावर दूरगामी परिणाम करणारा ज्वलंत विषय आहे. या प्रकल्पामुळे समुद्रातील जैवविविधता, मासळीचे नैसर्गिक अधिवास आणि मच्छीमार बांधवांच्या पारंपरिक व्यवसायावर गंभीर परिणाम होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच शेतजमिनी, पाण्याचे स्रोत, पर्यावरणीय समतोल आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेवरही संकट कोसळण्याची शक्यता आहे. विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या हक्कांवर गदा आणणे, त्यांच्या जमिनी आणि उपजीविकेची साधने हिसकावून घेणे, त्यामुळे स्थानिक जनता गेल्या…
दिपक मोहिते, आम्ही सारे गाफिल, ( भाग क्र.१ ) असंख्य नद्या असूनही हजारो गावे तहानलेलीच… पालघर जिल्हा,हा देशातील ३६ वा जिल्हा आहे.सात वर्षांपूर्वी देशातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करून १ ऑगस्ट २०१४ रोजी नवीन आदिवासी जिल्हा निर्माण करण्यात आला. नागरी परिसराचा विचार न करता तत्कालीन राज्य सरकारने सागरी व डोंगरी,असे जिल्हा विभाजन केले. अनेक वर्षे चर्चेत असलेला हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला व जिल्ह्यातील जनतेचा आनंद गगनात मावेनासा झाला.ग्रामीण विकासाला चालना मिळून आपले जीवन सुख-समृद्धीने बहरेल,अशी सर्वसाधारण अपेक्षा होती.पण गेल्या बारा वर्षात प्रशासनाचा लालफितीचा कारभार व लोकप्रतिनिधींची बुरसटलेली मानसिकता,यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनात फारसा फरक पडला नाही.पाणी, शिक्षण, आरोग्य, कृषी,…
दीपक मोहिते, चुकीचा पायंडा, जनगणनेच्या कामात खाजगी व्यक्तीचा शिरकाव, देशात जनगणनेचे कार्य सुरू झाले असून केंद्र सरकारने प्रगणक म्हणून काम करण्यासाठी खाजगी व्यक्तींची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सरकारी कर्मचार्यांसह सरकारला योग्य वाटणार्या अन्य व्यक्तींनाही प्रगणक म्हणून नियुक्त करता येणार आहे. मात्र, या बदलामुळे जनगणनेची अचूकता, गोपनीयता आणि राजकीय हस्तक्षेप याविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत.केंद्र सरकारच्या या निर्णयावर सर्वत्र टीका होत आहे.* *केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या महा रजिस्ट्रार कार्यालयाने पंधरा दिवसापूर्वी जनगणना ( सुधारणा ) नियम, २०२६ अधिसूचनेद्वारे जनगणना नियम, १९९० मधील प्रगणकांच्या पात्रतेसंबंधीच्या तरतुदींमध्ये बदल केला आहे. विशेष म्हणजे, राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश प्रशासनाला प्रगणक…
