Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत, नीट पेपर फुटीवरून सध्या देशभरात वादळ उठले आहे. सरकारला शिक्षण, उद्योग, व्यापार, कृषी व रोजगार क्षेत्रात आलेले अपयश लक्षात घेता तरुण वर्गात सरकारविरोधात प्रचंड चीड निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. बेरोजगारीमुळे देशातील सुमारे २ कोटी तरुण सध्या नैराश्यात सापडले आहेत. शेतमालाला किमान हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकरीवर्गही संताप व्यक्त करत आहे. दुसरीकडे शिक्षण क्षेत्राची मोठ्या प्रमाणात अवहेलना होत असल्यामुळे विद्यार्थी देखील आता आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून शिक्षण व्यवस्थेची रया पार बिघडून गेली आहे. पेपर फुटणे, हे आपल्या पाचवीला पुजले आहे. मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने…

Read More

दीपक मोहिते, इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला, इराण – अमेरिका व इराण दरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या मागे अनेक कारणे आहेत. आखाती देशातील खनिज तेलाचा विपुल साठा व पॅलेस्टाईनच्या भूमीवरून मूळ निवासी असलेल्या अरबाची हकालपट्टी, अशी दोन कारणे असली तरी गेल्या काही वर्षात इराणची अणुबॉम्ब तयार करण्याच्या दिशेने सुरू झालेली वेगवान वाटचाल हे मुख्य कारण आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हट्टाला पेटले आहेत. इराणच्या या कथित अणुबॉम्बची सर्वाधिक भिती इस्त्रायलला आहे. त्यामुळे इस्त्रायल हा गेल्या अनेक वर्षांपासून मध्यपूर्वेतील मुस्लिम राष्ट्रविरोधात अमेरिकेला सतत उसकावत असतो. अमेरिकेची अर्थव्यवस्था गेल्या काही दशकापासून ज्यू उद्योगपतींच्या लॉबीच्या हातात असून ही लॉबी अमेरिकेच्या अर्थ,व्यापार,उद्योग व…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” महिलांना डावलणे ; ” देवाभाऊ,” चे ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण, गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने ” लाडकी बहीण, ” योजना कार्यान्वित करून विरोधी पक्षाचे सारे मनसूबे धुळीला मिळवले. दरमहा २ कोटी ४० लाख महिलांच्या बँक खात्यात १५०० /- रु. जमा करून महायुतीने. निवडणुकीत महाविकास आघाडीचा निवडणुकीत अक्षरशः पालापाचोळा केला. या धक्यातून विरोधक अद्याप स्वतःला सावरू शकलेले नाहीत. त्या निवडणुकीत राज्यातील समस्त महीला मतदारांनी महायुतीला डोक्यावर घेतले. महिलांचा मिळालेला उदंड प्रतिसाद लक्षात घेऊन महायुतीने “नारीशक्ती,” ” मातृवंदना,” ” लाडकी बहीण,” अशा गोंडस शब्दाचा वापर करत महायुती सरकार महिलांच्या सक्षमीकरण करत असल्याचा दावा करू…

Read More

दीपक मोहिते, कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार, काल कॉक्रोच जनता पार्टीचे ( सीजेपी ) अध्यक्ष अभिजित दिपके हे दिल्लीत आल्यानंतर जंतर-मंतरवर हजारो तरुणांनी केलेली गर्दी व आंदोलनाला जनतेचा मिळालेला पाठिंबा लक्षात घेता येणाऱ्या काळात या ठिणगीचा चांगलाच भडका उडण्याची शक्यता आहे. काल झालेल्या या आंदोलनानंतर दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. अभिजित दिपके यांनी सुरु केलेल्या या लढ्यात त्याच्या पक्षाला सरकार व मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे. जंतर मंतरवर झालेले हे आंदोलन प्रचंड यशस्वी झाले. पण एकाही वृत्तवाहिनीने त्याचे थेट प्रक्षेपण दाखवणे टाळले. सोशल मिडियावर मात्र या घटनेच्या बातम्या व फोटोचा अक्षरशः पाऊस…

Read More

दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” डोनाल्ड ट्रम्प ;… तर असा मित्र नसलेलाच बरा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल केलेल्या एका वक्तव्याने त्यांनी एकतर ताळतंत्र सोडले आहे किंवा त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली असावी,असे वाटू लागले आहे. ट्रम्प हे गेल्या काही महिन्यांपासून भारताला कमी लेखण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. काल त्यांनी ” भारताने गेली अनेक दशके अमेरिकेला लुटले असून भारतीय मालावर भरमसाठ शुल्क लावण्याच्या आपल्या निर्णयावर आपण आजही ठाम असल्याचे सांगितले.” हे सांगत असताना दुसरीकडे नरेंद्र मोदी मला खूप आवडतात व ते माझे चांगले मित्र आहेत, हे देखील सांगायला विसरत नाहीत.त्यांचे हे वागणे पोटात एक आणि ओठावर दुसरेच असे आहे. भारत…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” कार्यकर्त्यांची ओळख ; पूर्वी ” पायपुसणी,” अशी होती, ती आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे… राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यांच्या ( घराणेशाही ) प्रथेमुळे आजवर अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होत आला. या विषयावर अनेक विचारवंतांनी आजवर खूप लिहिले, पण परिस्थितीत कोणताही बदल होऊ शकला नाही. विविध पक्षातील प्रामाणिक कार्यकर्ते वर्षानुवर्षे पक्षात सतरंज्या उचलण्याचे काम करत आहेत. अशा या कार्यकर्त्यांचा पक्षात ” अंधभक्त,” म्हणूनच वावर होत असतो. याला आज एकही राजकीय पक्ष अपवाद ठरू शकला नाही.जवळपास सर्वच पक्षात कार्यकर्त्यांवर असे बलात्कार होत असतात. शरद पवार,अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, एकनाथ शिंदे, मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव, नितीश…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” ममता बॅनर्जीं यांचा उद्धव ठाकरे होणार… पश्चिम बंगालमध्ये मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळू लागले आहेत, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे व शरद पवार यांचे जे काही झाले तेच तृणमूल काँग्रेस च्या ममता बॅनर्जी यांच्या बाबतीत होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये ज्या काही राजकीय हालचाली होत आहेत, त्यावरून लवकरच भूकंप होण्याची चिन्हे आहेत. ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जींना वगळून नवीन टीएमसी स्थापन करण्याचे प्रयत्न होत असल्याचे संकेत मिळत आहेत.दोन आमदारांना पक्षातून काढल्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये उलथापालथी सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रातील शिवसेनेप्रमाणेच टीएमसीमध्ये फूट पाडण्याचा ‘महाराष्ट्र मॉडेल’ वापरला जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका…

Read More

दीपक मोहिते, फ्रंटलाईन, अपेक्षेप्रमाणे सेनेचे रविंद्र फाटक यांनी बाजी मारली, ठाणे – पालघर विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे रविंद्र फाटक हे प्रचंड मतांनी निवडून येतील, असा अंदाज होता. पण त्यांची निवड बिनविरोध होईल,असे कोणालाही वाटले नव्हते. शिवसेनेला ही जागा मिळावी, यासाठी एकनाथ शिंदे यांनी केलेले प्रयत्न स्तुत्य असेच होते.त्यांनी वनमंत्री गणेश नाईक व भाजपचे आ. संजय केळकर या दोघांना धोबीपछाड देत,ही जागा आपल्या पदरात पाडली. या सर्व घडामोडीनंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी शिंदे यांनी आपली राजकीय ताकद जी पणाला लावली ती नक्कीच अभिनंदनास पात्र आहे. निवडणुकीपूर्वी पालघर जिल्ह्यात अनेक वावड्या उठल्या व अफवांचे अमाप पीक आले होते. त्यामध्ये अनेक युट्युब…

Read More

दीपक मोहिते, वेळीच सावध व्हा, अन्यथा विनाश अटळ… आज जागतिक पर्यावरण दिन, जगभरात हा दिन दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.काही वर्षांपूर्वी विकासाच्या नावाखाली वसुंधराचे अपरिमित हानी होत असल्याचे दिसून आल्यामुळे सन् १९७२ साली स्वीडन देशाची राजधानी स्टॉकहोम येथे याविषयी एका परिषदेचे आयोजन करण्यात आले. तेव्हापासून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पर्यावरणप्रेमी मान्यवरांनी केलेला हा प्रयत्न स्तुत्य असला तरी गेल्या ५४ वर्षात या महत्वाच्या विषयी किती काम झाले ? याचा लेखा-जोगा मांडणे मला गरजेचे वाटले, म्हणून हा लेख प्रपंच करत आहे. तप्त वातावरण,भुगर्भातील पाण्याची पातळी सतत खालावणे, अवेळी पाऊस पडणे, तप्त वातावरणामुळे जलसाठ्यातील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अन्यायाविरोधात तरुणांनी पेटून उठायला हवे, राजकारणात सर्वसामान्य कार्यकर्त्याला काडीची किंमत नसते, अशी चर्चा सतत होत असते. त्यांची गरज केवळ सतरंज्या उचलणे, नेते मंडळींची खरकटी व उष्टी उचलणे या कामासाठी असते. हे आपण सतत अनुभवत असतो. निवडणूकीसाठी उमेदवारी देणे किंवा लाभाचे पद देताना मंत्री, खासदार, आमदार व पक्षाचे वरिष्ठ नेते यांची मुले, नातेवाईक व मित्रमंडळी यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरण्यात येत असते. वर्षानुवर्षे हे असेच चालत आल्यामुळे पक्षात डावलल्या गेलेल्या एका कार्यकर्त्याने सोशल मीडियावर आपल्या मनातील खदखदीला मोकळी वाट करून दिली आहे. ते आपल्या पोस्टमध्ये काय म्हणतात ते पहा, त्यांच्या पोस्टचे शीर्षक आहे, ” कार्यकर्त्यांनी करायचं काय ?”…

Read More