- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- पालघर जिल्ह्यात ८ हजार ३२० पात्र शेतकऱ्यांना ४७.३७ कोटीचा लाभ,
- जरांगे यांना ताकद देणारे कोण ? शिंदे सेना संभ्रमावस्थेत…
- महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय…
- गुन्हेगारीमध्ये सतत होणारी वाढ ; फडणवीस सरकारचे दारुण अपयश,
- मायबाप सरकारच शिक्षण व्यवस्थेच्या जीवावर उठले आहे,
- विक्रमगडमध्ये २५ हजार विद्यार्थ्यांना दररोज पौष्टिक भोजन,,
- भारत सरकारने अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांना जाब विचारायला हवा होता,
- सत्तास्पर्धेच्या हाणामारीमध्ये एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे होणार ?
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, पालघर जिल्ह्यात ८ हजार ३२० पात्र शेतकऱ्यांना ४७.३७ कोटींचा लाभ, नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून दिलासा देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पालघर जिल्ह्यातील लाभार्थ्यांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंत चार याद्यांमधून एकूण ८ हजार ३२० पात्र शेतकऱ्यांना सुमारे ४७ कोटी ३७ लाख रु.चा निधी वितरित करण्यात आला आहे. राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी ३० सप्टें. २०२५ रोजी पीक कर्ज थकीत असलेल्या आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत कर्जाची परतफेड न करू शकलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रु.पर्यंत कर्जमाफी देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. तसेच कर्ज…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” जरांगेंना ताकद देणारे कोण ? शिंदे सेना संभ्रमावस्थेत… ५०० कोटींच्या कथित व्यवहारावरून महायुतीमध्ये सध्या चांगलीच जुंपली आहे. दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात ” प्रत्येक आमदाराने बाजूच्या तालुक्यातील आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केल्यास आपले नेते एकनाथ शिंदे हे भविष्यात मुख्यमंत्री होऊ शकतात,” असे वक्तव्य केले. त्यानंतर अवघ्या काही तासात तथाकथित ५०० कोटीच्या व्यवहाराच्या ऑडियो क्लिप सर्वत्र व्हायरल झाली. हा केवळ योगायोग नसून सत्तास्पर्धेचा जीवघेणा खेळ सुरु झाल्याचे मानण्यात येत आहे. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजप व शिंदे गटाचे नेते आता एकमेकांवर तुटून पडत आहेत. शिंदे यांना बदनाम करण्यासाठी काही राजकीय…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय… गेली १५ वर्षांपासून महाराष्ट्र अवर्षण, पावसाचे अल्प प्रमाण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या व कर्जमाफ़ी इ. कारणाने सतत प्रकाशझोतात आहे. यापूर्वी कॉंग्रेस व सध्याचे महायुती सरकार या दोघानी या सर्व समस्यांवर काय उपाययोजना केली,हे राज्यातील तमाम जनतेने अनुभवले व अनुभवत आहे. परिस्थितीत किती बदल झाला ? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का ? त्याना कर्जमाफी मिळाली का ? असे एक ना अनेक प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यानी प्रसिद्धि माध्यमाना नुकतेच जे काही सांगितले,ते लक्षात घेता येणाऱ्या काळात राज्यातील शेतकऱ्याना अनंत अडचणी व संकटाना सामोरे जावे लागणार आहे. यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले…
दीपक मोहिते, ” घडलंय बिघडलंय,” गुन्हेगारीमध्ये सतत होणारी वाढ ; फडणवीस सरकारचे दारुण अपयश, राज्यात सतत घडत असलेले गुन्हे, कायदा व सुव्यवस्थेची ढासळती परिस्थिती व पोलिसांची निष्क्रियता, यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या विरोधकांच्या रडारवर आले आहेत. गुन्हेगारीमध्ये दिवसेंदिवस होत असलेली वाढ व त्यावर नियंत्रण मिळवण्यासंदर्भात त्यांच्या गृहविभागाला आलेल्या अपयशामुळे सध्या विरोधकांनी फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. ३५ वर्षांपूर्वी मुंबई, ठाणे व वसई विरार भागात अंडरवर्ल्डच्या गुंडानी जसा धुमाकूळ घातला होता. नेमकी तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण होत असल्याची भिती नागरिक व्यक्त करत आहेत. पूर्वी राज्यातील गुंडाच्या टोळ्या सक्रिय होत्या, आता परराज्यातील टोळ्यांच्या गुंडानी थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. गोळीबाराच्या घटनामध्ये…
दीपक मोहिते, ” नि:शब्द,” मायबाप सरकारच शिक्षण व्यवस्थेच्या जीवावर उठले आहे, आपल्याकडे मौजेच्या वस्तू नाहीत म्हणून आमची मुले नाराज होतात,आणि दूसरीकडे सुन्न करणारे वास्तव पाहुन काळीज तुटत आहे,७९ वर्षापुर्वी यासाठी केला होता का स्वातंत्र्याचा अट्टाहास ? प्रश्न मोठा जटील आहे, उत्तर देखील कोणाकडेही नाही.सरकारने शिक्षणाचा अधिकार मंजूर केला पण. तो प्रत्यक्षात किती अमलात आला ? शोध कुणी घ्यायला तयार नाही, ऐकायला,पाहायला मिळते ती साक्षरता वाढल्याची आकडेवारी, ती किती खरी,किती खोटी ? हे त्या परमेश्वरालाच माहित… समता,समानता, हक्क व अधिकार हे शब्द केवळ ऐकण्यासाठी बरे वाटतात, पण गेल्या आठ दशकामध्ये शहरी-ग्रामीण अशी जी दरी निर्माण झाली आहे, ती आपण कमी करु…
दीपक मोहिते, विक्रमगडमध्ये २५ हजार विद्यार्थ्यांना दररोज पौष्टिक भोजन, पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक, स्वच्छ आणि ताजे मध्यान्ह भोजन उपलब्ध करून देण्यासाठी दररोज २५ हजार विद्यार्थ्यांना भोजन पुरवण्याची क्षमता असलेले अत्याधुनिक केंद्रीय स्वयंपाकगृह उभारण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन आहे.या प्रकल्पासाठी सुमारे दीड एकर जागा उपलब्ध होणार असून, प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक शासकीय परवानग्या आणि मान्यता मिळवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विक्रमगड तालुक्यातील शालेय शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या पोषणाच्या गरजा लक्षात घेता या उपक्रमाला विशेष महत्त्व आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील आकडेवारीनुसार, तालुक्यातील २७३ शाळांमध्ये एकूण २९ हजार १२४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये जिल्हा परिषद शाळांतील १५ हजार ९१,…
दीपक मोहिते, भारत सरकारने अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांना जाब विचारायला हवा होता, भारताच्या अंतर्गत बाबीत संयुक्त राष्ट्र समितीला ( युनो ) हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. तसेच राष्ट्र संघांचे ” मानवाधिकार तज्ञ,” हाच एक विरोधाभास आहे, असे वक्तव्य भारताच्या दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबीयो यांनी केले. जो देश डॉलर्स व शस्त्रात्र विक्री व्यवसायावर जगभरातील देशात सातत्याने हस्तक्षेप करत आला आहे, त्या देशाचा परराष्ट्रमंत्री भारतात येऊन अशाप्रकारचे वक्तव्य करतो, हे देखील आपल्या देशाच्या अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप करणारे आहे, असे परराष्ट्र विषयक अभ्यासकांचे म्हणणे आहे. गेल्या एक महिन्यापासून दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीनं मोठं आंदोलन सुरु केलं…
दीपक मोहिते, ” घडलंय बिघडलंय, ” सत्तास्पर्धेच्या हाणामारीमध्ये एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे होणार ? नुकत्याच पार पडलेल्या दसरा मेळाव्यात मोठा राजकीय धमाका झाला आहे. शिवसेनेचे मंत्री कॅबिनेटमंत्री ( शिंदे गट ) गुलाबराव पाटील यांनी जगदंबा देवीच्या चरणाला स्पर्श करून प्रार्थना केली की ” येत्या काळात एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत आणि शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी यावी,” व जो जो शिंदे साहेबांना आडवा येईल… त्याचा सत्यानाश होवो,” पुढे ते म्हणाले, सध्या आमच्याकडे ६० आमदार आहेत, विधान परिषद धरून ७३ आणि मित्रपक्ष धरून ८५-८६ चा आकडा आहे. प्रत्येक आमदाराने शेजारच्या मतदारसंघातून एक आमदार निवडून आणला तर पुढचे मुख्यमंत्री शिंदे साहेबच होतील. त्यांच्या…
दीपक मोहिते, माधव भंडारी : शब्दाने लढणारा भाजपचा शिलेदार, जन्म : २१ ऑक्टो.१९५४, देवगड तालुका, सिंधुदुर्ग. कोकणच्या मातीतला हा नेता. प्रवास रा. स्व. सं.पासून भाजपपर्यंत, लहानपणापासून रा. स्व. सं. मध्ये स्वयंसेवक, नंतर अभाविपमध्ये काम. १९७५ च्या आणीबाणीच्या काळात पत्रकारितेत आले. मुंबईच्या ‘विवेक,’ साप्ताहिकाचे सहसंपादक,” म्हणून काम केलं. १९८० मध्ये भाजपचे पूर्णवेळ कार्यकर्ता झाले. कोकण विभागाचे संघटन मंत्री, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अशी पदे भूषवली.१९९७-२००१ – सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उपाध्यक्ष, २००८ ते २०१४ संपूआच्या या काळात जेव्हा भाजप विरोधात होता, तेव्हा माधव भंडारी हेच टीव्हीवर भाजपचा चेहरा होते.अत्यंत अभ्यासू, शांत, पण टोकदार युक्तिवादाने ते विरोधकांना उत्तर देत असत. गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” २०२९ मध्येही भाजपचा पराभव होणे अशक्यच… भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपच्या सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी सध्या देशभरात रान उठवले आहे. भारत जोडो यात्रा, ईव्हीम मशीन घोटाळा,मतदारयाद्यातील त्रुटी, वाढती महागाई व निर्गुणवंतुणूक धोरण व वाढती बेरोजगारी इ. प्रश्नावर मोदी सरकारला चांगलेच घेरले आहे.पण त्याचे अपेक्षित परिणाम होताना मात्र पाहायला मिळत नाहीत. राहुल गांधी हे मोदी सरकारच्या कारभाराला लक्ष्य करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करत असतात. सदर बाब भारतीय जनतेच्या गळी उतरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प. बंगाल, आसाम, बिहार या तीन राज्यात झालेल्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या हाती काही लागले नाही. उलट…
