Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, वाढवण बंदर ; तिढा अधिक जटील होत चालला आहे, वाढवण बंदरासंदर्भात केंद्र व राज्य सरकार बाधित शेतकऱ्यांकर पैश्याची खैरात करत असले तरी स्थानिकांचा विरोध मावळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या बंदराच्या उभारणीमुळे पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर अनेक संलग्न उद्योग व प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामुळे कृषी व मासेमारी व्यवसाय उद्ध्वस्त होण्याची भिती सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय संरक्षणाच्या प्रश्नांसह किनारपट्टीची होणारी संभाव्य धूप व मासेमारी क्षेत्रावर परिणाम आदीं प्रश्नाकडे प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे गेला महिनाभर सुरु असणाऱ्या आंदोलनात प्रकल्पग्रस्त राजकीय पक्षांना सहभागी करून घेण्याचे नियोजन करत आहेत.विरोधी पक्षांच्या मदतीने आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी आंदोलक प्रयत्नशील आहेत. वाढवण…

Read More

दीपक मोहिते, ग्रामीण भागातील खेडी समृद्ध होण्यासाठी शाश्वत विकासाची गरज, शाश्वत विकास म्हणजे नेमके काय ? या ज्वलंत विषयी काही मूठभर द्रष्ट्या राज्यकर्त्यांचा अपवाद वगळता अनेक राजकीय नेते, खासदार, आमदार, नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्य आजही अनभिज्ञ आहेत. शरद पवार, शंकरराव चव्हाण, वसंतराव नाईक, पंजाबराव देशमुख, वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील व अन्य काही राज्यकर्त्यांनी आपापल्या भागात शाश्वत विकासाला प्राधान्य दिले.त्यामुळे त्यांच्या विभागाच्या विकासाला चालना मिळू शकली. काहींनी कृषी क्षेत्रात नजरेत भरेल, अशी दमदार कामगिरी केली.तर काहींनी ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रासाठी आपले सर्वस्व वेचले. या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार केला, त्याचबरोबर आपल्या घराण्यात आर्थिक सुबत्ता देखील आणली. त्याकाळी त्यांची ओळख ही शिक्षणमहर्षी…

Read More

दीपक मोहिते, विरोधी पक्षाकडून ७.८ टक्के जीडीपी वाढीच्या आकडेवारीवर संशय व्यक्त, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एक्सवर म्हटले, “बेरोजगारी ५० वर्षांतील सर्वोच्च पातळीवर आहे. ४० टक्के पदवीधर तरुण बेरोजगार आहेत. जुलै २०२६ मध्ये २५ वर्षे वयोगटातील प्रत्येक ०५ भारतीय तरुणांपैकी एक बेरोजगार होता. दरवर्षी ०२ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन पूर्णपणे फसले आहे.” किरकोळ महागाई गेल्या १९ महिन्यांतील सर्वोच्च स्तरावर आहे आणि साखर, कांदा, टोमॅटो, डाळी, स्वयंपाकाचे तेल, तांदूळ, दूध आणि स्वयंपाकघरातील प्रत्येक अत्यावश्यक वस्तूच्या किमती सतत वाढत आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये अर्थसचिव पदी कार्यरत असलेले सुभाषचंद्र गर्ग यांनीही जीडीपीच्या आकडेवारीवर शंका व्यक्त केली आहे. त्यांनी…

Read More

दीपक मोहिते, वसईत स्मार्ट मीटरविरोधात ७ सप्टें. रोजी सर्वपक्षीय आंदोलन, वसई तालुक्यात महावितरणतर्फे जुने वीज मीटर बदलून त्याजागी नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. मात्र या स्मार्ट मीटरमुळे ग्राहक वर्गात प्रचंड नाराजीचे वातावरण पसरले आहे. वीजदेयकात अवाजवी आणि दुप्पट वाढ होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिक करत आहेत. तसेच ग्राहकांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता जुने मीटर काढून थेट नवीन मीटर लावण्यात येत असल्यामुळे महावितरण विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. याप्रकरणी वसई-विरारमधील सर्व राजकीय पक्ष एकवटले असून प्रशासना विरोधात येत्या ७ सप्टें. रोजी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शिरसाड फाटा, के. टी. रिसॉर्टसमोर महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या…

Read More

दीपक मोहिते, पालघर जिल्हा परिषदेत शिक्षक भरती प्रक्रिया वेगात सुरु, जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त शिक्षक पदे भरण्याच्या प्रक्रियेला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.पवित्र प्रणालीअंतर्गत प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या यादीतील पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी काल २ सप्टें.पासून सुरू झाली आहे. ही पडताळणी उद्यापर्यंत जिल्हा परिषद पालघर कार्यालयात सुरु राहणार आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५च्या आधारे पद निवडीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये ही शिक्षक पदभरती करण्यात येत आहे. जिल्हा परिषद पालघरसाठी पवित्र प्रणालीअंतर्गत मराठी व उर्दू माध्यमातील उमेदवारांची यादी उपलब्ध झाली आहे. मराठी माध्यमातील पदनिहाय आकडेवारीनुसार २ री ते ५ वी – ३२८ पदांसाठी ३४७ उमेदवार, ६ वी ते ८ वी – विज्ञान…

Read More

दीपक मोहिते, पालघर जिल्हा प्रशासन व वयम यांच्यात सामंजस्य करार, पालघर जिल्ह्यातील सामुदायिक वनसंसाधन हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासन आणि नैसर्गिक संसाधनांच्या सुशासनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या वयम या स्वयंसेवी संस्थेशी काल सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारावर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, पालघर आणि वयमचे सचिव व विश्वस्त मिलिंद थत्ते यांनी स्वाक्षऱ्या केल्या. अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी ( वनहक्कांची मान्यता ) अधिनियम, २००६ अर्थात वनहक्क कायद्यांतर्गत पात्र गावांमध्ये सामुदायिक वनसंसाधन हक्कांची मान्यता सुनिश्चित करण्याची जबाबदारी जिल्हास्तरीय समितीची असून, या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात. वनसंसाधनांचे संरक्षण, संवर्धन व व्यवस्थापन यामध्ये ग्रामसभा ही प्रमुख संस्था…

Read More

दीपक मोहिते, जव्हार येथे राष्ट्रवादी काँग्रेसची तिरंगा रॅली, राज्यातील वाढती बेरोजगारी, रखडलेली शासकीय भरती प्रक्रिया आणि युवकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्यातर्फे काल जव्हार येथे ‘ बेरोजगार हक्क एल्गार,’ तिरंगा रॅली काढण्यात आली. माजी आ. सुनील भुसारा आणि पालघर जिल्हाध्यक्ष प्रीतम (सनी) एकनाथ पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या रॅलीत जव्हार, विक्रमगड, मोखाडा आणि वाडा तालुक्यांतील पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. गोरवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयापासून रॅलीला सुरुवात झाली. राज्यातील रिक्त शासकीय पदांची तातडीने भरती करावी, पोलीस भरती प्रक्रिया वेगाने राबवावी, परीक्षा व भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा घालावा तसेच स्थानिक युवकांना…

Read More

दीपक मोहिते, वसई-विरारच्या विविध प्रश्नासाठी माजी खा.किरीट सोमय्या यांचा धावता दौरा, वसई-विरार शहरातील विविध नागरी, प्रशासकीय तसेच कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित प्रश्न व समस्यांचा आढावा घेण्यासाठी माजी खा. किरीट सोमय्या यांनी आज वसई-विरार परिसराचा दौरा केला. दौऱ्यादरम्यान नालासोपारा विभागाचे सहा. पोलीस आयुक्त तसेच बोळींज पोलीस ठाण्याला भेट देऊन परिसरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा केली. परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर चाप लावावा, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात याव्यात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. त्यानंतर त्यांनी वसई-विरार शहर महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन शहरातील विविध नागरी प्रश्नांवर चर्चा केली. विशेषतः कचरा घोटाळ्याची तात्काळ चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित…

Read More

दीपक मोहिते, अंजुमन इस्लामतर्फे ४३ वा सत्कार सोहळा उत्साहात साजरा, अंजुमन इस्लाम विरार शाखेतर्फे यंदाही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. हितेंद्र ठाकूर उपस्थित होते. शनी. २९ ऑगस्ट रोजी विरार पूर्व भागातील मंगल कार्यालयात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी महापौर अजीव पाटील, आ. राजेंद्र गावित व संस्थेचे सरचिटणीस इस्माईल खान आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमात शालांत परीक्षेत ज्या पाच विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली, त्यांचा पाहुण्यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. त्यामध्ये ध्रुव पराग राऊत – ९७. ६० %, नील अजय मिस्त्री – ९७.६० %, मृणालिनी मनमोहन पाटील – ९७.२० %, समृद्धी…

Read More

दीपक मोहिते, वाढवण बंदर ; नुकसानभरपाई पॅकेजबाबत ८ सप्टें. रोजी हितधारकांची बैठक, वाढवण बंदर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मच्छीमार समुदायासाठी न्याय्य, पारदर्शक आणि सर्वसमावेशक पुनर्वसन व नुकसानभरपाई प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. वाढवण बंदर प्रकल्पाचे नियोजन सुरू झाल्यापासून प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान स्थानिक मच्छीमारांची उपजीविका आणि त्यांचे सामाजिक व आर्थिक हित यांना योग्य प्राधान्य दिले जावे, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. याप्रकरणी अनेक बैठका घेण्यात आल्या असून, मत्स्यव्यवसाय विभागातर्फे मच्छीमारांशी नुकसानभरपाईच्या मसुद्याबाबत प्राथमिक चर्चाही करण्यात आली आहे. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, बाधित क्षेत्रातील मच्छीमार कुटुंबांची उपजीविका मासेमारीवर किती अवलंबून आहे, हे समजून…

Read More