- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- विक्रमगडमध्ये २५ हजार विद्यार्थ्यांना दररोज पौष्टिक भोजन,,
- भारत सरकारने अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांना जाब विचारायला हवा होता,
- सत्तास्पर्धेच्या हाणामारीमध्ये एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे होणार ?
- माधव भंडारी : शब्दाने लढणारा भाजपचा शिलेदार
- २०२९ मध्येही भाजपचा पराभव होणे अशक्यच…
- दसरा मेळावे आता केवळ सोपस्कार ठरले आहेत…
- नेहासिंह राठोर, बदनामी करणाऱ्या वृत्तवाहिनीच्या विरोधात कायदेशीर लढाई लढणार,
- ५ हजार रु.त दिवाळी साजरी करून दाखवा…दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे देवाभाऊच्या सरकारला आव्हान,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, विक्रमगडमध्ये २५ हजार विद्यार्थ्यांना दररोज पौष्टिक भोजन, पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक, स्वच्छ आणि ताजे मध्यान्ह भोजन उपलब्ध करून देण्यासाठी दररोज २५ हजार विद्यार्थ्यांना भोजन पुरवण्याची क्षमता असलेले अत्याधुनिक केंद्रीय स्वयंपाकगृह उभारण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन आहे.या प्रकल्पासाठी सुमारे दीड एकर जागा उपलब्ध होणार असून, प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक शासकीय परवानग्या आणि मान्यता मिळवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विक्रमगड तालुक्यातील शालेय शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या पोषणाच्या गरजा लक्षात घेता या उपक्रमाला विशेष महत्त्व आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील आकडेवारीनुसार, तालुक्यातील २७३ शाळांमध्ये एकूण २९ हजार १२४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये जिल्हा परिषद शाळांतील १५ हजार ९१,…
दीपक मोहिते, भारत सरकारने अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांना जाब विचारायला हवा होता, भारताच्या अंतर्गत बाबीत संयुक्त राष्ट्र समितीला ( युनो ) हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. तसेच राष्ट्र संघांचे ” मानवाधिकार तज्ञ,” हाच एक विरोधाभास आहे, असे वक्तव्य भारताच्या दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबीयो यांनी केले. जो देश डॉलर्स व शस्त्रात्र विक्री व्यवसायावर जगभरातील देशात सातत्याने हस्तक्षेप करत आला आहे, त्या देशाचा परराष्ट्रमंत्री भारतात येऊन अशाप्रकारचे वक्तव्य करतो, हे देखील आपल्या देशाच्या अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप करणारे आहे, असे परराष्ट्र विषयक अभ्यासकांचे म्हणणे आहे. गेल्या एक महिन्यापासून दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीनं मोठं आंदोलन सुरु केलं…
दीपक मोहिते, ” घडलंय बिघडलंय, ” सत्तास्पर्धेच्या हाणामारीमध्ये एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे होणार ? नुकत्याच पार पडलेल्या दसरा मेळाव्यात मोठा राजकीय धमाका झाला आहे. शिवसेनेचे मंत्री कॅबिनेटमंत्री ( शिंदे गट ) गुलाबराव पाटील यांनी जगदंबा देवीच्या चरणाला स्पर्श करून प्रार्थना केली की ” येत्या काळात एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत आणि शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी यावी,” व जो जो शिंदे साहेबांना आडवा येईल… त्याचा सत्यानाश होवो,” पुढे ते म्हणाले, सध्या आमच्याकडे ६० आमदार आहेत, विधान परिषद धरून ७३ आणि मित्रपक्ष धरून ८५-८६ चा आकडा आहे. प्रत्येक आमदाराने शेजारच्या मतदारसंघातून एक आमदार निवडून आणला तर पुढचे मुख्यमंत्री शिंदे साहेबच होतील. त्यांच्या…
दीपक मोहिते, माधव भंडारी : शब्दाने लढणारा भाजपचा शिलेदार, जन्म : २१ ऑक्टो.१९५४, देवगड तालुका, सिंधुदुर्ग. कोकणच्या मातीतला हा नेता. प्रवास रा. स्व. सं.पासून भाजपपर्यंत, लहानपणापासून रा. स्व. सं. मध्ये स्वयंसेवक, नंतर अभाविपमध्ये काम. १९७५ च्या आणीबाणीच्या काळात पत्रकारितेत आले. मुंबईच्या ‘विवेक,’ साप्ताहिकाचे सहसंपादक,” म्हणून काम केलं. १९८० मध्ये भाजपचे पूर्णवेळ कार्यकर्ता झाले. कोकण विभागाचे संघटन मंत्री, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अशी पदे भूषवली.१९९७-२००१ – सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उपाध्यक्ष, २००८ ते २०१४ संपूआच्या या काळात जेव्हा भाजप विरोधात होता, तेव्हा माधव भंडारी हेच टीव्हीवर भाजपचा चेहरा होते.अत्यंत अभ्यासू, शांत, पण टोकदार युक्तिवादाने ते विरोधकांना उत्तर देत असत. गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” २०२९ मध्येही भाजपचा पराभव होणे अशक्यच… भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपच्या सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी सध्या देशभरात रान उठवले आहे. भारत जोडो यात्रा, ईव्हीम मशीन घोटाळा,मतदारयाद्यातील त्रुटी, वाढती महागाई व निर्गुणवंतुणूक धोरण व वाढती बेरोजगारी इ. प्रश्नावर मोदी सरकारला चांगलेच घेरले आहे.पण त्याचे अपेक्षित परिणाम होताना मात्र पाहायला मिळत नाहीत. राहुल गांधी हे मोदी सरकारच्या कारभाराला लक्ष्य करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करत असतात. सदर बाब भारतीय जनतेच्या गळी उतरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प. बंगाल, आसाम, बिहार या तीन राज्यात झालेल्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या हाती काही लागले नाही. उलट…
दीपक मोहिते, ” स्पॉटलाईट,” दसरा मेळावे आता केवळ सोपस्कार ठरले आहेत… काल विजयादशमीच्या मुहूर्तावर शिवसेना ( उबाठा ) व शिवसेना ( शिंदे ) या दोघांचे सालाबादप्रमाणे दसरा मेळावे पार पडले. या दोन्ही मेळाव्यात शिवसैनिकांना आपले दोन्ही नेते नेहमीप्रमाणे एकमेकांवर चिखलफेक करताना पाहायला मिळाले. गेल्या सहा वर्षांपासून हे असंच सुरु आहे. त्यामुळे हल्ली होणाऱ्या दसरा मेळाव्याचा नेमका उद्देश काय ? असा प्रश्न साहजिकच तुमच्या आमच्या मनात उभा राहतो. काल शिवाजी पार्क येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या ( उबाठा ) मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात ” नेमेची येतो पावसाळा,” या युक्तीनुसार शिंदे व शहा यांना लक्ष केले. आपल्या भाषणात रिजीम चेंज का…
दीपक मोहिते, नेहासिंह राठोर, बदनामी करणाऱ्या वृत्तवाहिनीच्या विरोधात कायदेशीर लढाई लढणार, प्रसिद्ध भोजपुरी लोकगायिका नेहा सिंह राठौर सध्या प्रामुख्याने दोन प्रकरणे आणि वादांमुळे सध्या चर्चेत आहेत. ऑक्टो. २०२६ मध्ये, एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर एक बातमी दाखवण्यात आली होती. त्यामध्ये नेहा सिंह राठौर यांच्याशी संबंधित एका हॉस्टेलवर पोलिसांनी छापा टाकून ‘सेक्स रॅकेट,’ चा पर्दाफाश केल्याचा खोटा दावा करण्यात आला होता. नेहा सिंह राठौर यांनी या बातमीचा तीव्र निषेध केला. त्यांनी आरोप केला की, सरकारला प्रश्न विचारते म्हणून त्यांचे चारित्र्यहनन आणि बदनाम करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. वाद वाढल्यानंतर ‘ एबीपी न्यूज,’ने आपली चूक मान्य करत जाहीर माफी मागितली. तसेच…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” ५ हजार रु.त दिवाळी साजरी करून दाखवा… दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे देवाभाऊच्या सरकारला आव्हान, ” देवाभाऊच्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? ” असा सवाल सध्या ग्रामीण भागातील दुष्काळग्रस्त शेतकरी विचारत आहेत. या सरकारने दिवाळीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात ५ हजार रु. जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम तात्पुरती मदत म्हणून देत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. केंद्र सरकारची पूर्ण मदत व पंचनाम्यासाठी वेळ लागणार असल्यामुळे हा तात्पुरता निर्णय घेण्यात आल्याचे सरकारतर्फे सांगण्यात येत आहे. दुष्काळी तालुक्यातील सुमारे सव्वा कोटी शेतकऱ्यांसाठी ६ हजार कोटी रु. लागणार आहेत. तसेच पंचनाम्याची कामे देखील धिम्यागतीने होत असल्यामुळे सरकारकडून तातडीने हे…
दीपक मोहिते, मोदी सरकारने दडपशाहीचा अवलंब न करता विद्यार्थ्याशी संवाद साधावा, भारतासह जगातील अनेक देशात सर्वत्र हिंसक आंदोलने सुरु झाली आहेत.या देशातील नागरिक आपल्या सरकार विरोधात रस्त्यावर उतरले असून अनेक शहरात लोकांनी जाळपोळीचे सत्र आरंभले आहे. महागाई, बेरोजगारी व शिक्षण व्यवस्थेतील सावळागोंधळ व अन्य काही कारणे, या घटनाच्या मागे आहेत.फ्रान्समध्ये जे काही चालले आहे, त्यामागे इस्लामिक कट्टरवादी असून काल त्यांनी देशातील १४३ वर्षे जुना ऐतिहासिक टाउनहाल बेचीराख केला.आज हा देश आगीत होरपळत आहे.या आंदोलनात सुमारे १० लाख लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यानंतर आता ब्राझील,अल्बनिया, स्पेन, अर्जेंटीना,बेल्जीएम व इटली या देशातही आंदोलनाचा भडका उडाला आहे. आपल्या देशातही विविध शहरात विद्यार्थ्यांनी सरकार…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” बविआ मधून भाजपमध्ये गेलेल्या गयारामांची अवस्था ” सांगता येत नाही,आणि सहनही होत नाही,” अशी झाली आहे, विधानसभा निवडणुकीत वसई, नालासोपारा व विरार या तीन मतदारसंघात पराभव झाल्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यामध्ये चलबिचल निर्माण झाली होती. त्यानंतर पक्ष सोडून जाणाऱ्या गयारामाच्या संख्येत वाढ होत गेली. आपल्याला बविआकडून उमेदवारी मिळणार नाही, तसेच भाजपच्या वादळासमोर बविआचा टिकाव लागणार नाही, असे गृहीत धरून अनेकानी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा तंबू गाठला. त्यापैकी आठ ते दहा जणांना भाजपकडून उमेदवारी देखील मिळाली.त्यापैकी केवळ चार ते पाच जणांना निवडणूक जिंकता आली. गेल्या सहा महिन्यात या गयारामाची भाजपमध्ये आजच्या घडीला काय स्थिती आहे ? हे…
