- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मी ज्या नालासोपारा मतदारसंघातून येतो…
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मी ज्या नालासोपारा मतदारसंघातून येतो …. एकेकाळी गौतम बुद्ध, सम्राट अशोक व शंकराचार्य यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक शुर्पारक नगरीला आज अक्षरशः बकाल स्वरूप आले आहे. सरकार दरबारी केवळ प्रश्न उपस्थित करणे, सोशल मीडियावर रिल्स व्हायरल करणे आणि कॅमेऱ्यासमोर उभे राहून मगरीचे अश्रू ढाळण्याने लोकांची सहानुभूती मिळत नाही, तर लोक आपल्या दारातून हाकलून देतात.अवघ्या एका वर्षात आपल्यावर अशी वेळ का आली, याविषयी लोकप्रतिनिधीने आत्मपरीक्षण केले पाहिजे. नालासोपारावासीयांनी गेल्या वर्षी, अगोदरच्या सत्ताधाऱ्यांना बाजूला सारत नव्यांना संधी दिली. त्याबदल्यात त्यांच्या पदरात काय पडले,तर अतोनात त्रास, रोजचे मरण, अवहेलना व उपेक्षा होय… सोपारा हे एकेकाळी नावाजलेले बंदर होते, या…
दीपक मोहिते, रणसंग्राम, ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व, बहुचर्चित ठाणे जिल्हा मध्य.सह.बँकेच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या सहकार पॅनेलने २१ पैकी १६ जागा जिंकून बँकेवर झेंडा फडकवला. ही निवडणूक अत्यंत चुरशीची अशी झाली. निवडणुक होण्यापूर्वी शिंदे गटाचे आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित १३ जागासाठी काल मतदान पार पडले. आज या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. पहिले दोन निकाल हे परिवर्तन पॅनलच्या बाजूने लागले. त्यांच्या पॅनेलचे अनिल गावड व ज्योती दिलीप पटेकर तर जिजाऊचे निलेश सांबरे हे विजयी झाले. त्यानंतर मात्र सहकार पॅनेलने मुसंडी मारत उर्वरित सर्व जागा जिंकल्या. या निवडणुकीचे विशेष म्हणजे बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे, पत्रकारांना धमकावणे, त्यांच्याशी असभ्य भाषेत बोलणे, त्यांना मारहाण करणे व वेळप्रसंगी त्यांना जगातूनच नाहीसे करणे, असे प्रकार सध्या वाढीला लागले आहेत. चार दिवसांपूर्वी ईशान्य मुंबईचे खा. संजय दीना पाटील,यांनी पत्रकारांना जी काही वागणूक दिली ती राजकारणात गुंड प्रवृत्तीच्या लोकांची घुसखोरी झाली आहे, हेच अधोरेखीत करणारे आहे.” माझ्या *** बोट घालू नका,” असे धमकी देणारा हा आपला खासदार आहे,आणि आपण त्याला निवडून दिले आहे,याची खर तर ईशान्य मुंबईच्या मतदारांना नक्कीच लाज वाटली असावी. आज हे खासदार हात जोडून माफी मागत फिरत आहेत. मी चुकून बोललो, मला माफ करा, अशी आर्जवे करत फिरत…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही,” ठाणे जिल्हा मध्य.सह. बँकेच्या निवडणुकीवरून वसई विरार भागातील राजकारण सध्या ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे ती आता चुरशीची झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत ही बँक आपल्याकडे खेचून घेण्यासाठी भाजपने गेल्या तीन दिवसांपासून विविध हातखंडे वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सहकार पॅनलच्या उमेदवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत वसई, नालासोपारा, बोईसर व विक्रमगड या चार विधानसभा जिंकून भाजपने जिल्ह्यावर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. त्यानंतर झालेल्या वसई- विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत ४४ जागा जिंकून बविआची चांगलीच दमछाक केली. आज…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणींना उजाळा, ५१ वर्षांपूर्वी म्हणजे २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली. प्रगल्भ लोकशाहीचा पुरस्कार करणारा, मानवी हक्क व अधिकार यास सर्वोच्च प्राधान्य देणारा देश म्हणून जगभरात ओळख असलेल्या भारतात या दिवशी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली. सुमारे २१ महिने आपला देश अंधारात चाचपडत होता. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आल्याचे कारण सांगून इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळाने देशव्यापी आणीबाणीची शिफारस केली. तत्कालीन राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांनी संविधानातील कलम ३५२ (१) नुसार देशभरात आणीबाणी जारी केली. पण लोकशाही व्यवस्थेवर दृढविश्वास असणाऱ्या भारतीय जनतेने या आणीबाणीला कडाडून विरोध…
दीपक मोहिते, “हल्लाबोल,” ( उत्तरार्ध ) ठाकुर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ? काल प्रसिद्ध झालेल्या माझ्या लेखात ” ठाकुरको आखिर गुस्सा क्यों आया ? ” सदराखाली मी सविस्तर विवेचन केले होते. आजच्या भागात माजी आ. हितेंद्र ठाकूर यांचा संयम का सुटला ? आणि त्यामागची नेमकी काय कारणे आहेत ? यावर प्रकाश टाकणार आहे. भाजपच्या परिवर्तन पॅनल )मधून निवडणूक लढवणारे माजी नगरसेवक हार्दिक राऊत हे कधीच स्वयंप्रकाशित असे व्यक्तिमत्व नव्हते व आजही नाही. नगरसेवक म्हणून त्यांची कारकिर्दही फारशी चर्चेत राहिली नाही.” दोन मामांचे वलय,” असलेला नवखा तरुण, अशी त्यांची ओळख होती व आजही ती तशीच आहे. गेल्या…
दीपक मोहिते, ” ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?” खूप दिवसानंतर आज पुन्हा मी एका राजकीय उलथापालथीवर लेख लिहीत आहेत. मी अनेकदा लिहीत आलो की राजकारणात कधीही काहीही घडू शकते. कारण, राजकारणात कोणीच कोणाचे नसते.आज राज्यस्तरावर जे काही घडत आहे,तसाच काहीसा प्रकार ठाणे जिल्हा मध्य.सह.बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीतही आपल्याला पाहायला मिळत आहे. आजच्या घडीला राजकारणात ” स्वार्थ,” हा नातेसंबंधाच्या सतत आड येऊ लागला आहे. त्याचा अनुभव वसई – विरार भागात पावलोपावली अनुभवायला मिळत आहे. काल या निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या सभेत पक्षाचे सर्वेसर्वा माजी आ.हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या भाषणात तीव्र संताप व्यक्त केला.या संतापाचे कारण होते,त्यांचा भाचा,पक्षाचा माजी…
दीपक मोहिते, फ्रँटलाईन, देशात श्रीमंत – गरीब दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक… स्वातंत्र्यानंतर भारतात लोकशाही यशस्वीरीत्या रुजली आणि ती सातत्याने परिपक्व होत आहे, असे अनेक घटनातज्ञाचे म्हणणे आहे. मात्र समाजात सध्या जी आर्थिक व सामाजिक विषमता पाहायला मिळत आहे, त्यावरून आपल्या देशात लोकशाही व्यवस्था अपेक्षेनुसार रुजू शकली नाही, असेच म्हणावे लागेल. गेल्या आठ दशकाच्या काळात श्रीमंत व गरीब यांच्यामधील दरी सतत रुंदावत गेली.जगात अनेक देश आपल्या लोकशाहीचे गोडवे गात असतात. पण, प्राप्त परिस्थिती लक्षात घेता गेल्या काही वर्षात लोकशाहीच्या आडून आपण एकाधिकारशाही स्विकारल्याचे पाहायला मिळत आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सध्या नरेंद्र मोदी या…
दीपक मोहिते, फ्रंटलाईन, यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला… जून महिना संपत आला तरी अद्याप मान्सूनचा पत्ता नाही. त्यामुळे राज्याच्या शहरी व ग्रामीण भागात सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्याची जी काही चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, ती अल निनोच्या प्रभावामुळे असे हवामान तज्ञाचे म्हणणे आहे. राज्यात केवळ २३ % टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी हा आकडा ३२ % इतका होता. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यावर फार मोठे संकट येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. पाऊस रखडल्यामुळे सरकारकडून पाणीकपातीचे संकेत देण्यात आले आहेत. राज्याच्या अनेक शहरात २० % पाणी कपात करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे सरकारने शहरी भागातील नागरिकांना पाणी जपून…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” सेनेच्या वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र,” आज १९ जून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा ६० वा वर्धापनदिन साजरा करण्यात येत आहे.त्याचवेळी त्यांच्या पक्षाचे सहा खासदार शिंदे गटाच्या तंबूत दाखल झाले आहेत. ही घटना उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी ठरली आहे. दुसरीकडे शिवसेनाही ( शिंदे गट ) त्याच दिवशी आपला वर्धापनदिन साजरा करत आहे.निवडणूक आयोगाने तीन वर्षांपूर्वी ( १७ फेब्रु.२०२३ ) रोजी एकनाथ शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता दिली व कालांतराने सेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हही त्यांना बहाल केले.अशा सर्व परिस्थितीमध्ये हे दोन्ही पक्ष आपापले वर्धापनदिन साजरा करत आहेत.या चार वर्षाच्या काळात एकनाथ शिंदे यांनी…
