- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- पालघर येथे डॉक्टरांवर हल्ला ; न्यायालयाने गंभीर दखल घ्यावी,
- नेपाळ नंतर भारताला सर्वाधिक धोका,
- पहिली बुलेट ट्रेन ऑगस्ट २०२७ पासून धावणार,
- अशा लोकांना रस्त्यावर मोकाट फिरण्याचा अधिकार नाही,- सर्वोच्च न्यायालय,
- मी वसई – विरारच्या रस्त्यावरून येऊ तरी कसा ? – बाप्पा
- सर्वप्रथम नालासोपारा शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन सुधारा…
- पर्यटकांची जरूर काळजी घ्या, पण शहरातील करदात्यांना वाऱ्यावर सोडू नका,
- सक्रिय नसलेल्या राजकीय पक्षाना हजारो कोटी रु. च्या देणग्या,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, पालघर येथे डॉक्टरांवर हल्ला ; न्यायालयाने गंभीर दखल घ्यावी, कल्याण – डोंबिवली मागोमाग पालघर येथेही डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. त्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. एकनाथ शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी ही मारहाण केली असून याप्रकरणी हल्लेखोरांवर रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय उपचार त्वरित सुरु न केल्यामुळे संतप्त झालेल्या या हल्लेखोरांनी हा प्रकार केला. न्यायालयाने या प्रकरणी डोंबिवलीचे नगरसेवक रमेश पाटील यांच्याबाबत केलेल्या कठोर कारवाईप्रमाणेच या हल्लेखोरावर कारवाई करण्यात यावी, अशी सर्वत्र मागणी करण्यात येत आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिंदे यांच्या शिवसेनेने जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये, शहरप्रमुख राहुल घरत, उपतालुकाप्रमुख मनीष उर्फ…
दीपक मोहिते, नेपाळ नंतर भारताला सर्वाधिक धोका, गेल्या महिन्यात नेपाळमध्ये आलेल्या नैसर्गिक संकटामध्ये सुमारे ५ हजार लोक अद्याप गायब आहेत. या आपत्तीमध्ये हजारो कुटुंबांची अक्षरशः वाताहत झाली. मदतीचे कार्य अद्याप सुरू आहे. या अस्मानी संकटामुळे नेपाळ हा पार खचून गेला आहे. त्याला सावरण्यासाठी जगभरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. पण झालेल्या विध्वंसाचे प्रमाण लक्षात घेता हिमालयाच्या कुशीत विसावलेल्या या छोटेखानी देशाला सावरायला किमान पाच वर्षे लागणार आहेत. गेल्या काही वर्षापासून हिमालयातील अनेक हिमनद्या वेगाने वितळत आहेत. त्याचा भारतालाही धोका होऊ शकतो. हिमालय हा भारतासाठी ” वॉटर टॉवर,” आहे, पण तो वेगाने वितळू लागला आहे. १९९० ते २०२० या कालावधीत हिमालयातील…
पहिली बुलेट ट्रेन ऑगस्ट २०२७ पासून धावणार, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन बद्दल सविस्तर माहिती :- सध्या या प्रोजेक्टचे ६१% पेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. गुजरातमधील पहिला टप्पा ( सुरत – वापी ) : ऑगस्ट २०२७ पासून पहिली कमर्शियल धाव सुरू होणार आहे. गुजरातचा पूर्ण पट्टा ( वापी ते साबरमती ) : डिसें. २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. संपूर्ण कॉरिडॉर ( मुंबई ते साबरमती ) : डिसें. २०२९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. सुरुवातीचा अंदाजित खर्च रु. १,०८,००० कोटी होता. यापैकी ८१% म्हणजे रु. ८८ हजार कोटी रु.जपानची एजन्सी जे.आय.सी.ए. ( जपान इंटरनॅशनल कॊ – ऑपरेशन एजन्सी ) कर्ज म्हणून…
दीपक मोहिते, अशा लोकांना रस्त्यावर मोकाट फिरण्याचा अधिकार नाही, – सर्वोच्च न्यायालय, डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दात ताशेरे ओढले आहेत. “अशा लोकांना रस्त्यावर मोकाट फिरण्याचा अधिकार नाही,” असे न्या. विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने स्पष्ट शब्दांत म्हटले आहे.” वैद्यकीय क्षेत्राचा आदर न करणाऱ्यांना जामीन मिळू नये,” डॉक्टर, त्यातही महिला डॉक्टरवर जमावाने केलेल्या हल्ल्याचा मानसिक धक्का काय असतो, याची कल्पना करा, असे खंडपीठ म्हणाले.उच्च न्यायालयाने सुओ-मोटो दखल घेऊन जामीन स्थगित करणे ” पूर्णपणे योग्य होते,” असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. राज्य सरकारच्या याचिकेवर न्यायालयाने म्हात्रे यांना नोटीस बजावून तीन आठवड्यात…
दीपक मोहिते, मी वसई विरार रस्त्यावरून येऊ तरी कसा ? – बाप्पा, गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या सहा दिवसावर आले आहे, पण आमचा बाप्पा सध्या विचारत पडला आहे. माझे प्रामाणिक भक्त मला वसई विरारच्या रस्त्यावरील खड्ड्यातून आणायचे कसे, अशा विवंचनेत सापडले आहेत, तर सत्ताधारी पक्षाची माणसे अदानीच्या स्मार्ट मिटरचा बागुलबोवा उभा करण्यात रमले आहेत.माझ्या सजावटीच्या स्पर्धा ते आवर्जून भरवत असतात, त्यासाठी लाखो रु. ची बक्षिसेही देत असतात, पण या मंडळींना रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासंदर्भात जाग येत नाही. झोपलेल्या माणसाला जागा करता येते, पण झोपण्याचे सोंग करणाऱ्याला कधीच जागे करता येत नाही. असे हे झोपल्याचे सोंग करणाऱ्या माझ्या तथाकथित भक्तांना मला कदापि जागे…
दीपक मोहिते, सर्वप्रथम नालासोपारा शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन सुधारा… वसई विरार शहर महानगरपालिकेने वसईचे ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी तसेच स्मारकाची उभारणी करण्यासाठी पावले उचलण्याचे ठरवले आहे. सदर बाब कौतुकास्पद असून या ऐतिहासिक नगरीतील प्रत्येक नागरिकांनी त्याचे स्वागत करायलाच हवे. या महानगरपालिकेला सोळा वर्षे पूर्ण झाल्यानंतर ही उपरती का व्हावी ? असा प्रश्न नक्कीच तुमच्या आमच्या मनात उभा राहतो. सर्वप्रथम या ऐतिहासिक नगरीचे वैभव गेल्या ४० वर्षात कोणी हिरावून घेतले. या निसर्गसंपन्न परिसराला सिमेंट – काँक्रिटचे ओंगळ स्वरूप कसे आले ? विकास या गोंडस शब्दाखाली या ऐतिहासिक नगरीची वाताहत कोणी केली ? याचा सर्वप्रथम अंतर्मुख होऊन विचार व्हायला हवा. वसई विरार महापालिकेच्या…
दीपक मोहिते, पर्यटकांची जरूर काळजी घ्या, पण शहरातील करदात्यांना वाऱ्यावर सोडू नका, काल वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी राजोडी समुद्रकिनारी भेट देऊन नुकतीच पाहणी केली. यावेळी स्वच्छतेविषयी विविध उपाययोजनेची माहिती घेतली. या समुद्रकिनारी बीच क्लीनिंग मशीनच्या साहाय्याने सुरु असलेल्या स्वच्छता कामाची त्यांनी पाहणी केली. आयुक्तानी दिलेल्या या भेटीचे नक्कीच कौतुक करायला हवे. पण त्याचबरोबर शहरातील अस्वच्छता, नाल्यातील कचरा व रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्याचे साम्राज्य इ. नागरी असुविधाचे काय ? असा प्रश्न तुमच्या आमच्या समोर उभा राहतो, यावर आयुक्ताची भूमिका काय ? आयुक्ताना समुद्रकिनारी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची काळजी आहे. पण शहरातील करदाते, भरमसाठ कर देऊनही मरणयातना भोगत असतात,…
दीपक मोहिते, सक्रिय नसलेल्या राजकीय पक्षाना हजारो कोटी रु. च्या देणग्या, आपल्या देशात अनेक आरयूपीपी पक्ष ( नोंदणीकृत गैर – मान्यताप्राप्त राजकीय पक्ष ) आहेत जे स्वतंत्रपणे किंवा नेहमीच्या म्हणजेच सामान्य राजकीय पक्षांप्रमाणे काम करत नाहीत. पण, त्यांना वर्षाकाठी हजारो कोटी रु. च्या देणग्या मिळतात. या विषयी एका अधिकाऱ्याने सांगितलं की, या पक्षांचं कामकाज एकमेकांशी संबंधित किंवा जोडलेलं आहे. तसेच, करदाते आणि हे पक्ष यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करणारे चार्टर्ड अकाउंटंट्सच हे सारे व्यवहार पाहत असतात. राष्ट्रीय पक्षाना ज्या भल्यामोठ्या देणग्या मिळतात, त्या बड्या उद्योगसमूहाकडून मिळत असतात. या उद्योग समूहाची अब्जावधी रु. ची कर्जे माफ होतात, त्याचा या देणग्याशी संबंध…
दीपक मोहिते, दादांच्या जाण्यावर कोणी राजकारण करू नये – सुनेत्राताई पवार अजितदादाच्या अकाली जाण्यावर राजकारण करू नका, या प्रकरणी अधून मधून जी मिडिया ट्रायल होत असते, ती योग्य नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी खा. सुप्रिया सुळे यांचे नांव न घेता टीका केली. गेल्या आठवड्यात खा. सुप्रिया सुळे यांनी ” माझा भाऊ गेला, आणि काही आमदार सत्ता भोगत आहेत,” अशी खोचक टीका केली होती. त्यास उत्तर देताना सुनेत्रा पवार यांनी काल माध्यमाशी बोलताना सुळे यांच्या त्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. त्या पुढे म्हणाल्या, दादांच्या जाण्याबाबत सर्वाना वस्तुस्थिती जाणून घ्यायची आहे आणि त्यादृष्टीने आम्ही पाठपुरावा करत आहोत. दादाच्या जाण्याने महाराष्ट्रासह…
दीपक मोहिते, वाढवण बंदर ; तिढा अधिक जटील होत चालला आहे, वाढवण बंदरासंदर्भात केंद्र व राज्य सरकार बाधित शेतकऱ्यांकर पैश्याची खैरात करत असले तरी स्थानिकांचा विरोध मावळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या बंदराच्या उभारणीमुळे पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर अनेक संलग्न उद्योग व प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामुळे कृषी व मासेमारी व्यवसाय उद्ध्वस्त होण्याची भिती सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय संरक्षणाच्या प्रश्नांसह किनारपट्टीची होणारी संभाव्य धूप व मासेमारी क्षेत्रावर परिणाम आदीं प्रश्नाकडे प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे गेला महिनाभर सुरु असणाऱ्या आंदोलनात प्रकल्पग्रस्त राजकीय पक्षांना सहभागी करून घेण्याचे नियोजन करत आहेत.विरोधी पक्षांच्या मदतीने आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी आंदोलक प्रयत्नशील आहेत. वाढवण…
