- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- महिला बचत गटाच्या उत्पादानाची विक्रमी विक्री,
- राज्यातील अंगणवाड्याची अवस्था अत्यंत दयनीय,
- … तर एकनाथ शिंदे यांना दुसरा उमेदवार शोधावा लागणार,
- झाडांची कत्तल ; राज्य सरकार अस्मानी संकटाला आमंत्रण देतेय…
- राज्य कर्जाच्या खाईत आखंड बुडाले आहे…
- शेतकरी कंगाल तर विमा कंपन्या मालामाल…
- नालासोपाऱ्याचा बकालपणा कायम, विद्यमान आमदार निष्क्रिय,
- भविष्यात पर्यावरणाचा प्रश्न अधिक गंभीर होणार आहे…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, महिला बचत गटांच्या उत्पादनांची विक्रमी विक्री, जिल्हा परिषद पालघर येथे सुरू करण्यात आलेल्या ‘उमेद मार्ट,’ ला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, सुरुवातीपासूनच येथे स्वयंसहायता महिला गटांनी तयार केलेल्या उत्पादनांची विक्रमी विक्री होत आहे. उमेद मार्ट सुरू झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसांत एकूण २२ हजार रु.च्या वर विक्री झाली. त्यानंतरही विक्रीचा वेग कायम असून, पुढील दिवसात पहिल्या दिवशी १५ हजार रु, तर दुसऱ्या दिवशी १० हजार रु.ची विक्री नोंदवण्यात आली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उमेद मार्टमध्ये विविध प्रकारचे दिवाळी फराळाचे पदार्थ तसेच सणासाठी आवश्यक असलेल्या भेटवस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्वयंसहायता महिला गटांनी तयार केलेले खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू आणि स्थानिक उत्पादनांसोबतच…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” राज्यातील अंगणवाड्याची अवस्था अतिशय दयनीय, आजपासून बरोबर ५१ वर्षांपूर्वी २ ऑक्टो. १९७५ रोजी महात्मा गांधी जयंतीच्या दिनी भारत सरकारने एकात्मिक बाल विकास सेवा योजना सुरू केली. सुरुवातीला फक्त ३३ प्रकल्प आणि ४ हजार ८९१ अंगणवाड्या होत्या. २००८-०९ मध्ये संपूर्ण देशभर या योजनेचे सार्वत्रिकीकरण झाले. ७ हजार ०७६ प्रकल्प आणि १४ लाख अंगणवाड्या, मंजूर करण्यात आल्या. आज देशात १३.९ लाख अंगणवाड्या कार्यरत आहेत. २०२५ मध्ये या योजनेला ५० वर्षे ( सुवर्ण जयंती ) पूर्ण झाली. २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात याचे रुपांतर ” मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.०” या नव्या नावाने करण्यात आले. गावाच्या अंगणात असलेले बालसंगोपन केंद्र,…
दीपक मोहिते, राजकीय वार्तापत्र, ( १३१ बोईसर विधानसभा ) … तर एकनाथ शिंदे यांना दुसरा उमेदवार शोधावा लागणार, *१३१ बोईसर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेल्या आ. विलास तरे यांची कारकीर्द फारशी प्रभावी राहिली नाही. त्यामुळे हा मतदारसंघ विकासाच्या बाबतीत कायम मागासलेलाच राहीला. २००९, २०१४ व २०२४ मध्ये त्याना विजय मिळाला. २०१५ – २०१६ दरम्यान बहुजन विकास आघाडीच्या वरिष्ठासोबत मतभेद झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला व २०१९ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मात्र त्यांच्या विरोधात भाजपचे बंडखोर उमेदवार संतोष जनाठे उभे राहीले व तरे यांचा २ हजार ७७३ मतांनी पराभव झाला. सेना व भाजपकडून एकमेकांचे उमेदवार पाडण्याच्या खेळात तरे यांचा…
दीपक मोहिते, ” घडलंय बिघडलंय,” झाडांची कत्तल ; राज्य सरकार अस्मानी संकटाला आमंत्रण देतेय… *जगभरात ओझोन व पर्जन्यमानाचे प्रमाण सतत कमी होत चालले आहे. त्यामुळे पृथ्वीवरील सजीवाना आता सभोवतालच्या बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घ्यावे लागत आहे. ज्या सजीवाना आपल्यामध्ये बदल घडवण्यात यश मिळते, ते तग धरून राहतात व ज्याना ते शक्य होत नाही,अशाना आपले प्राण गमवावे लागतात.ही स्थिती का निर्माण झाली ? यावर जगभरात गेल्या शंभर वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर लाखोकार्यशाळा,चर्चासत्रे,उपक्रम पार पडले, परंतु पर्यावरणाचा होत असलेला विनाश मात्र रोखणे,एकाही देशाला शक्य झाले नाही. आज आपल्या राज्यात विविध प्रकल्पासाठी मोठ्याप्रमाणावर झाडांची कत्तल होत आहे. पालघर व रायगड जिल्ह्यात हा प्रकार सर्रास चालू…
दीपक मोहिते, घडलंय बिघडलंय, राज्य कर्जाच्या खाईत आखंड बुडाले आहे… आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती भक्कम असल्याची ग्वाही सत्ताधारी मंडळी सतत देत असले तरी प्रत्यक्षात राज्याचे चित्र मात्र भयावह असेच आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे राज्य सरकारला सुमारे ३०५ तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा लागला आहे. गेल्या पाच वर्षात महायुती सरकारने राज्याच्या हिताला बाधा आणणाऱ्या अनेक योजना सुरु केल्या. त्यामुळे राज्याची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली गेली. आपल्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालावर नजर टाकल्यास आपले राज्य कर्जात कसे आखंड बुडाले आहे, हे पाहायला मिळते. २०२५-२६ च्या अहवालानुसार राज्यावर असलेले कर्ज ९.३२ लाख कोटी रु.वर गेले आहे. हे कर्ज २०२६-२७ मध्ये ११.०२ लाख…
दीपक मोहिते, हल्लाबोल,” ” शेतकरी कंगाल तर विमा कंपन्या मालामाल… विमा क्षेत्रात पूर्वी पंतप्रधानमंत्री फसल बिमा योजना पूर्णपणे सरकारी होती. २०१६ मध्ये मोदी सरकारने खाजगी विमा कंपन्यांना रान मोकळे करून देण्याचा निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांच्या गळ्याला फास लागला. शेतकऱ्यांना परतावा देण्यास,या विमा कंपन्यांची मानसिकता नसल्यामुळे राज्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून हवालदील झाला आहे.या प्रश्नी राज्य सरकारही डोळ्यावर कातडे ओढून बसले आहे.यंदा दुष्काळामुळे तर ग्रामीण भागात हाहाकार उडाला आहे.त्यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.विमा योजनेचा मूळ उद्देश चांगला होता.शेतकऱ्यांनी २ % ( खरीप )आणि १.५ % ( रब्बी ) प्रीमियम भरायचा उरलेला ९० % पेक्षा अधिक केंद्र व राज्य…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” नालासोपाऱ्याचा बकालपणा कायम, आमदार निष्क्रिय १३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघ हा विविध कारणामुळे सतत चर्चेत असतो. या मतदारसंघाची निर्मिती होऊन दीड दशकाचा काळ लोटला, पण येथील नागरिकांना अद्याप मोकळा श्वास घेता आला नाही, तसेच शहराचा बकालपणाही दूर होऊ शकला नाही. अनधिकृत बांधकामे, फेरीवाले, रिक्षा, अमली पदार्थाची बेसुमार विक्री, हत्या, अपहरण, लव जिहाद, बलात्कार, चोऱ्या व खंडणी वसुली असे गैरप्रकार येथील नागरिकांच्या पाचवीला पुजली आहेत. पायभूत सुविधाचा अभाव ( पाणी टंचाई, कचरा निर्मूलन, वाहतूककोंडी, अनधिकृत फेरीवाले व रिक्षावाले व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा मनमानी व भ्रष्ट कारभार ) अशा कारणामुळे नागरिक त्रस्त आहेत. या विधानसभा मतदारसंघातून २००९, २०१४ व २०१९…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” भविष्यात पर्यावरणाचा प्रश्न अधिक गंभीर होणार आहे… जगभरात अल निनो संकटामुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तापमान सतत वाढत आहे, त्याचा परिणाम कृषी क्षेत्रावर जाणवू लागला आहे. जगातील सर्व देशांनी ग्लोबल वॉर्मिंगचा चांगलाच धसका घेतला आहे. अशावेळी आपण मात्र विविध प्रकल्पासाठी झाडांची कत्तल करत आहोत. या वृक्षतोडीसाठी राष्ट्रीय हरित लवाद बेसुमार परवानग्या देत सुटले आहे. स्थानिक लोकांचा सरकारच्या या धोरणाला विरोध आहे. स्थानिक ग्रामपंचायती, ग्रामसभा यांना डावलून सरकार हा गैरप्रकार करत आहे. पालघर जिल्ह्यात ३८ हजार ९०५ व रायगड जिल्ह्यात ३२ हजार ४९० अशी एकूण ७१ हजार ३९५ झाडे तोडण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने परवानग्या दिल्या…
दीपक मोहिते, ” राजकीय उलथापालथी,” ५०० कोटींचा आरोप ; रामदास कदम यांचा शिंदेची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न, जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटीच्या व्यवहार प्रकरणी आरोप केल्यानंतर रामदास कदम चांगलेच पिसाळले. एवढे पिसाळले कि त्यांना आपण काय बरळत आहोत, याचे भान देखील राहीले नाही. आज त्यांनी शिंदे यांची भेट घेऊन माझ्याशिवाय इतर कोणीही तुमची बाजू भक्कमपणे मांडली नाही, अशी शेखी मिरवली. त्यावर शिंदे कसे रिऍक्ट झाले ते मात्र कळू शकले नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले रामदास कदम हे गेल्या दहा वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून बाहेर फेकले गेले आहेत. बाळासाहेबांच्या जाण्यानंतर पक्षाची सूत्रे उद्धव ठाकरे…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” नालासोपारा येथे घडलेले लव जिहाद प्रकरण ; पोलीस यंत्रणेचे दारुण अपयश, नालासोपारा शहरातील वाढती गुन्हेगारी व कायदा / सुव्यवस्थेची ढासळती स्थिती, यावर आजवर बरंच काही लिहिले गेले. पण, त्याची दखल शासकीय यंत्रणांनी कधीही घेतली नाही. पण, नवरात्रोत्सव काळात नुकतेच घडलेल्या लव जिहाद प्रकरणाने पोलीस, स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली गेली. १२ ऑक्टो. रोजी नालासोपारा पोलीस ठाण्यात २३ वर्षे वयाच्या हिंदु तरुणीने तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरीफ अयुब शेख – २२, ( जिम ट्रेनर ) त्याची आई रुखसाना खान व त्याचा मावस भाऊ साहिल खान या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. मैत्री व…
