Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ‘अमृत-सक्षम,’ मधून हरित उद्योजकतेला चालना, कचरा म्हणजे केवळ विल्हेवाट लावण्याची समस्या नसून, त्याचे योग्य व्यवस्थापन आणि पुनर्वापर केल्यास तो उत्पन्नाचे प्रभावी साधन ठरू शकतो. याच संकल्पनेला उद्योजकतेची जोड देत ‘अमृत-सक्षम,’ उपक्रमाच्या माध्यमातून युवक-युवती, महिला बचत गट, नवउद्योजक तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांना कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यातून मूल्यनिर्मिती करून नियमित उत्पन्नाचा स्रोत आणि शाश्वत व्यवसाय उभारता येतो. सुकलेल्या फुलांपासून अगरबत्ती व धूप तयार करणे, प्लास्टिक, कागद आणि काचेचे पुनर्वापरासाठी संकलन व प्रक्रिया करणे तसेच ‘रिसोर्स रिकव्हरी सेंटर’ (आरआरआर ) सुरू करणे, अशा विविध व्यवसायांच्या संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत. संकल्पनेपासून…

Read More

दीपक मोहिते, चारोटी येथे स्मार्ट मीटर विरोधात महा रास्ता रोको, हजारो महिला रस्त्यावर, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग ठप्प, आज १० सप्टें.२०२६ रोजी सकाळी चारोटी नाका, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात प्रचंड रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे हजारो आदिवासी आणि शेतकरी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार पट्ट्यातील महिला पारंपारिक साड्यांमध्ये रस्त्यावरच ठिय्या मारून बसल्या होत्या. हातात सिपीएमचे लाल झेंडे, ‘स्मार्ट मीटर हटाओ,’च्या जोरदार घोषणा देण्यात येत होत्या. चारोटी नाका येथे अंदाजे ८ ते १० हजार लोक या आंदोलनात सहभागी झाले होते.त्यामध्ये ७०% महिला होत्या.पावसाळी ढगाळ वातावरण असताना लोक…

Read More

दीपक मोहिते, अबू सालेमची सुटका नाही, सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली, सर्वोच्च न्यायालयाने आज कुख्यात गँगस्टर अबू सालेमची तातडीने सुटका करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने वरील निर्णय दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एप्रिल २०२६ मध्ये त्याची याचिका ” अकाली आणि गैरसमजुतीची,” म्हणून फेटाळली होती, तोच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज कायम ठेवला आहे. अबू सालेमने दावा केला होता की भारत-पोर्तुगाल प्रत्यार्पण करारानुसार त्याला २५ वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात ठेवता येणार नाही आणि त्याने ती शिक्षा पूर्ण केली आहे. त्याने चांगल्या वर्तणुकीसाठी मिळालेली ३ वर्ष २ महिन्यांची सूट ( रीमिशन ) आणि विचाराधीन कैदी…

Read More

दीपक मोहिते, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग ( एनएच – ४८ ) हा महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारा सर्वात महत्त्वाचा आर्थिक कॉरिडॉर आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून हा महामार्ग वाहतूककोंडीमुळे सतत चर्चेत आहे. येथे होत असलेल्या वाहतूककोंडीवर लिहून लिहून माध्यमे थकली पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी मात्र झोपेतून जागे होऊ शकले नाहीत. सर्वात जास्त त्रास वसई-विरार, पालघर, काजूपाडा ते बापाणे फाटा, वर्सोवा ब्रिज, मिरा-भाईंदर पट्ट्यात होत असतो. जिल्ह्याचे पालकमंत्री देखील याच महामार्गावरून येजा करत असतात. पण त्यांनाही प्रवाशांचे दुःख कधी कळू शकले नाही.एकदा वाहतूककोंडी झाली की १० कि.मी.पर्यंत रांगा लागतात. ५ दिवस सलग जाम राहिल्याच्या घटनाही यापूर्वी…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जांभूळविहीर पूर्व येथे भंगार दुकानामुळे रहिवासी त्रस्त, जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत रायतळे हद्दीतील हिल टॉप रेसिडेन्सी, जांभूळविहीर पूर्व येथे निवासी परिसरात सुरू असलेल्या भंगार व्यवसायामुळे नागरिकांना सध्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. भंगार साठवणूक, कचऱ्याचे ढिगारे, मोठ्या आवाजातील मशिनरी तसेच अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून संबंधित भंगार दुकान व कचरा साठा तातडीने हटवण्याची मागणी रहिवाशांनी प्रशासनाकडे केली आहे. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, नबी रसूल सय्यद हे या परिसरात सन २०१२-१३ पासून भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करीत असून परिसरातील मोकळ्या प्लॉटवर मोठ्या प्रमाणात भंगाराची साठवणूक केली जाते. त्यामुळे निवासी वसाहतीतील मोकळ्या जागा तसेच रस्त्यांच्या परिसरात पत्र्याचे तुकडे, लोखंडी तारा, काचेचे…

Read More

दीपक मोहिते, विरार पूर्वेस मौजे भालीवली, ता. वसई, जि. पालघर येथील सिंचन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याचा आरोप करत सदर अतिक्रमणाची तात्काळ पाहणी करून ते हटवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते एलायस जोसेफ डिसिल्व्हा यांनी तहसीलदार, वसई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनानुसार, भालीवली येथील गट क्र. ३६, क्षेत्र १२ गुंठे, हिस्सा क्र. २३, क्षेत्रफळ ५.८ आर. ही सिंचन विभागाची शासकीय जागा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या जमिनीवर काही व्यक्तींनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याचा दावा करण्यात आला असून, त्यामुळे शासकीय जमिनीचा वापर बाधित होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणाची महसूल विभाग, सिंचन विभाग व संबंधित यंत्रणेकडून संयुक्त पाहणी करून वस्तुस्थितीची खातरजमा करण्यात यावी,…

Read More

दीपक मोहिते, एकमेकांच्या उरावर बसणे सोडा व करदात्यांचे हीत जोपासा, वसई विरार शहर महानगरपालिकेतील सत्ताधारी व विरोधी पक्षात सध्या वारंवार जे मानापमानाचे नाट्य रंगते, त्यामुळे क्षेत्राच्या विकासाचा बट्ट्याबोळ होत आहे. या महानगरपालिकेची प्रत्येक महासभा गोंधळात पार पडत असते. आता विषय समित्याच्या बैठकावर देखील बहिष्कार टाकण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये समन्वय साधून परिसर विकासाचा गाडा पुढे नेण्यात महापौर यांची भूमिका महत्वाची असते, पण विद्यमान महापौर देखील ती पार पाडत नसल्याचे दिसून आले आहे. एकमेकांची मदत व सहकार्य, यावर आम्ही विकासाची कामे करू,अशा हाणाभाका घेणारे व आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी आता विकासाच्या प्रश्नावर एकमेकांच्या उरावर बसताना पहायला मिळत आहे. सोळा…

Read More

दीपक मोहिते, आम्ही वसईकर दूधखुळे नाहीत, राज्य सरकारच्या स्मार्ट मीटर लावण्याच्या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये सध्या संतापाचे वातावरण आहे. ग्राहकांच्या अनेक संघटना याप्रकरणी न्यायालयात गेल्या आहेत. तर अनेक ग्राहक हे वीजग्राहक संस्थांकडे दाद मागत आहेत. परंतु ज्या उद्योगपतीकडे या स्मार्टमिटरचे दायित्व आहे,ते अदानी तुमच्या आमच्या मागणीला भीक घालतील, अशी सुतराम शक्यता नाही. तसेच त्यांच्यासमोर गुडघे टेकणाऱ्या आपल्या सरकारकडून याविषयी काही निर्णय होईल, अशी शक्यताही नाही. या प्रकरणी विरोधी पक्षांनी राज्यसरकार विरोधात जोरदार टीकेची झोड उठवली असली तरी एकाही राजकीय पक्षाने रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याचे ऐकिवात नाही. पण, वसई तालुका मात्र त्यास अपवाद ठरला. दोन दिवसापूर्वी वसई येथे सरकारच्या या निर्णयाविरोधात सर्व…

Read More

दीपक मोहिते, पालघर येथे डॉक्टरांवर हल्ला ; न्यायालयाने गंभीर दखल घ्यावी, कल्याण – डोंबिवली मागोमाग पालघर येथेही डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. त्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. एकनाथ शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी ही मारहाण केली असून याप्रकरणी हल्लेखोरांवर रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय उपचार त्वरित सुरु न केल्यामुळे संतप्त झालेल्या या हल्लेखोरांनी हा प्रकार केला. न्यायालयाने या प्रकरणी डोंबिवलीचे नगरसेवक रमेश पाटील यांच्याबाबत केलेल्या कठोर कारवाईप्रमाणेच या हल्लेखोरावर कारवाई करण्यात यावी, अशी सर्वत्र मागणी करण्यात येत आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिंदे यांच्या शिवसेनेने जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये, शहरप्रमुख राहुल घरत, उपतालुकाप्रमुख मनीष उर्फ…

Read More

दीपक मोहिते, नेपाळ नंतर भारताला सर्वाधिक धोका, गेल्या महिन्यात नेपाळमध्ये आलेल्या नैसर्गिक संकटामध्ये सुमारे ५ हजार लोक अद्याप गायब आहेत. या आपत्तीमध्ये हजारो कुटुंबांची अक्षरशः वाताहत झाली. मदतीचे कार्य अद्याप सुरू आहे. या अस्मानी संकटामुळे नेपाळ हा पार खचून गेला आहे. त्याला सावरण्यासाठी जगभरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. पण झालेल्या विध्वंसाचे प्रमाण लक्षात घेता हिमालयाच्या कुशीत विसावलेल्या या छोटेखानी देशाला सावरायला किमान पाच वर्षे लागणार आहेत. गेल्या काही वर्षापासून हिमालयातील अनेक हिमनद्या वेगाने वितळत आहेत. त्याचा भारतालाही धोका होऊ शकतो. हिमालय हा भारतासाठी ” वॉटर टॉवर,” आहे, पण तो वेगाने वितळू लागला आहे. १९९० ते २०२० या कालावधीत हिमालयातील…

Read More