दीपक मोहिते,
भाकरी फिरणार,
अमित शहा आता धक्का देण्याच्या तयारीत,
महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून धमासन सुरू असताना गृहमंत्री अमित शहा आता याप्रकरणी धक्का देण्याच्या तयारीत आहेत.पुण्याचे खा.मुरलीधर मोहोळ यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत आल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.असं जर घडलं तर एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस या दोघांची अवस्था ” माका नका,तुका नका,घाल कुत्र्याला,” अशीच होणार आहे.
निवडणुका झाल्यानंतर भाजप आपली वाघनखे बाहेर काढतील,असा अंदाज आम्ही लेखातून व्यक्त केला होता आणि धडले देखील तसंच,त्यांची वाघनखे बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना आपले जन्मगाव असलेलं ” दरे,” गाव गाठावे लागले.खा.मुरलीधर मोहोळ यांचे नाव अचानक स्पर्धेत आलेले नाही.राज्यात भाजपला विजय मिळवून देण्यात देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा असला तरी त्यांना राज्यातील बहुजन समाजाचा असलेला विरोध लक्षात घेऊन अमित शहा आता अशी तिरकी चाल खेळण्याच्या तयारीत आहेत.एकनाथ शिंदे यांना जनमानसात मिळणारी वारेमाप प्रसिद्धी,विशेष म्हणजे ” लाडकी बहीण योजना,” यशस्वीपणे राबवण्याचे श्रेय त्यांना मिळाल्यामुळे भाजपचे नेते सावध झाले व त्यांनी त्यांच्या हाती नारळ दिला.त्यामुळे शिंदे यांना विमनस्क स्थितीत आपले ” दरे,” गाव गाठावे लागले.ते जवळपास सहा दिवस आपल्या गावात होते,त्या दरम्यान खा.मुरलीधर मोहोळ यांचे नाव चर्चेत आले.ही चर्चा सुरू झाल्याबरोबर शिंदे यांचे विश्वासू सहकारी दीपक केसरकर हे दरे गावाला रवाना झाले आणि त्यानंतर शिंदे यांच्या हेलिकॉप्टरने मुंबईच्या दिशेने उड्डाण केले.महायुतीचे तिसरे नेते अजित पवार हे मात्र या काळात परिस्थितीचे चुपचाप अवलोकन करत राहिले.आपण पण शिंदे सारखे हट्ट केला तर आपल्यालाही बारामतीला जाऊन आराम करावा लागेल,अशा भितीमुळे त्यांनी आपल्या पदरात जे काही पडेल,त्यामध्ये समाधान मानण्याचे ठरवले.राज्यात ” लाडकी बहीण योजना,” राबवण्यात आली नसती तर महायुतीच काही खरं नव्हतं, कारण गेल्या अडीच वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी बहुजन समाजाची प्रचंड नाराजी ओढवून घेतली होती.कायदा व सुव्यवस्थेची ढासळती स्थिती,बदलापूर बलात्कार प्रकरण,मराठा आंदोलकांवर बेछूट लाठीहल्ला,पुण्यासारख्या विद्यानगरीत कोयता गँगचा धुमाकुळ,इ.कारणामुळे महायुती बदनाम झाली,त्यामुळे त्यांना दिल्लीत आणण्याचा शहा यांचा प्रयत्न आहे.पण देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट्टर समर्थक असल्यामुळे अमित शहा हे निवडणूक होईपर्यंत थांबले व आता ते सावधपणे पावले टाकत आहेत.येत्या ५ डिसें.म्हणजे शपथविधी होणार,त्या तारखेपर्यंत महायुतीच्या अंतर्गत राजकारणात अनेक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

