दीपक मोहिते,
निवडणूक पर्व,
१३२ नालासोपारा विधानसभा ; आ.क्षितिज ठाकूर या निवडणुकीत रेकॉर्डब्रेक मताधिक्य घेतील,
गेल्या सात दिवसांपासून पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा मतदारसंघात सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा धूमधडाका उडवून दिला आहे.उमेदवार,पदाधिकारी व कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत.जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असताना घामाच्या धारांनी ओथंबून गेलेले कार्यकर्ते आपापल्या उमेदवारासाठी जीवाचे रान करत आहेत.
पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात बविआ -०३,राष्ट्रवादी काँग्रेस,( उबाठा,) -०१,मार्क्स.कम्यू.-०१ व शिवसेना ( शिंदे गट,) असे बलाबल आहे.१३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघात बविआचे आ.क्षितिज ठाकूर यांच्या विरोधात भाजपने राजन नाईक यांना रिंगणात उतरवले आहे.यापूर्वीही नाईक यांनी आपले नशीब अजमावले होते,पण त्याना त्यावेळी तीसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.भाजपने या निवडणुकीत त्यांना पुन्हा संधी दिली आहे.पण आ.क्षितिज ठाकूर यांच्या समोर त्यांची डाळ शिजू शकणार नाही.आजच्या घडीला आ.क्षितिज ठाकूर यांनी प्रचारात चांगली आघाडी असून त्याना मतदारसंघात सर्व जाती – धर्मातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.कुणबी,मराठा,आगरी – कोळी समाजानी त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.तर वाढवण व मुरबे येथे उभारण्यात येणाऱ्या बंदरामुळे मांगेला – कोळी समाज आजच्या घडीला भाजपपासून दुरावला आहे.

तत्कालीन केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी या समाजाची अनेक कामे आपल्या कार्यकाळात मार्गी लावली होती.त्यामुळे नाईक यांना हा समाज त्याकाळी भरभरून मते देत होता.आता परिस्थिती बदलली आहे.केंद्र सरकार आमच्या जीवावर उठले आहे,अशी भावना या समाजात पसरली असून त्यांच्या मनात असलेली खदखद या निवडणुकीत बाहेर पडण्याची शक्यता आहे.तसेच गुजराती,मुस्लिम,केरळीय व उत्तर भारतीय मतदारांमध्ये आ.हितेंद्र ठाकूर व आ.क्षितिज ठाकूर हे दोघेही प्रचंड लोकप्रिय आहेत.या समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न,हे या निवडणुकीत त्यांना फायदेशीर ठरू शकतात.तसेच या मतदारसंघातील दलित समाज हा कायम ठाकूर कुटुंबियांचा पाठीराखा राहिला.आ.हितेंद्र ठाकूर यांनी या समाजाचे रुपेश जाधव यांना उपमहापौर व महापौरपद बहाल केले होते.त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत या समाजाची एकगठ्ठा मते बविआच्या पारड्यात जात असतात.सध्या प्रचारात आघाडी घेणारे आ.क्षितिज ठाकूर,या निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य घेतील,असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

