दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
महायुतीचे आमदार सध्या भितीच्या सावटाखाली आले आहेत…
महाराष्ट्र राज्य आपल्या हातून निसटणार,या भितीमुळे मोदी व शहा या जोडगोळीची सध्या झोप उडाली आहे.उद्धव ठाकरे व शरद पवार या दोघांनी महायुतीची ” पळता भुई थोडी,” केली आहे.या दोघांच्या जाहीर सभांना मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस व अजित पवार या तिघांचीही त्रेधातिरपिट उडाली आहे.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रत्येक जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले असून त्यांच्या टीकेची धार सतत वाढत आहे.ज्या आक्रमक पद्धतीने उद्धव ठाकरे व शरद पवार हे दोघे महायुतीच्या कारभारावर हल्ले चढवत आहेत,ते पाहून महायुतीच्या उमेदवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.अनेक उमेदवारांना झक मारली अन् यांच्यासोबत गद्दारी केली अशा निर्णयाप्रत आले आहेत.आपल्या नेत्यांनी राज्याला आर्थिक अराजकाच्या खाईत ढकलल्याची भावना भावना वाढीला लागली आहे.त्यामुळे या निवडणुकीत आपले अस्तित्वच नाहीसे होईल,अशा भितीने त्यांना ग्रासले आहे.राज्यात सतत होणारे बलात्कार,अपहरण,हिट अँड रनच्या वाढत्या घटना,शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे,बदलापूर बलात्कार प्रकरण,आरोपीचे फेक एन्काऊंटर व एकमेकांशी सुरू असलेले पाडापाडीचे राजकारण,नेत्यांमध्ये असलेले तीव्र स्वरूपाचे मतभेद इ.कारणामुळे महायुती या निवडणुकीच्या निकालानंतर फुटीच्या मार्गावर जाण्याची शक्यता महायुतीचे उमेदवारच आता व्यक्त करू लागले आहेत.अनेक उमेदवार या निवडणुकीनंतर माघारी फिरण्याच्या मनःस्थितीत आले आहेत.अशावेळी उद्धव ठाकरे व शरद पवार हे दोघेही टीकेची झोड उठवण्याची एकही संधी सोडत नाहीत.या निवडणुकीत या हे दोघे एकनाथ शिंदे व अजित पवार गटाच्या आमदारांचे मतदारसंघ पिंजून काढत आहेत.त्यामुळे हे सर्व आमदार सध्या भितीच्या सावटाखाली आले आहेत.

