दीपक मोहिते,
विरोधी पक्षाचे उमेदवार …..पाय लावून का पळ काढतात ?
वसई तालुक्यातील नावाजलेली सामाजिक संस्था अशी ओळख असलेली जागरूक नागरिक संस्था,ही निवडणुकीच्या काळात परिसंवादाचे आयोजन करत असते.आयोजक या परिसंवादात निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांना एकमेकांशी चर्चा करणे व आपली मते परखडपणे मांडकण्यासाठी पाचारण करत असते.या परिसंवादात उमेदवारांनी आपली उमेदवारी कशासाठी ? यावर आपली मते मांडणे व भविष्यात वसईतील जनतेसाठी काय करणार आहोत ? यावर आपले म्हणणे मांडणे,अशी या उपक्रमा मागची संकल्पना आहे.
काल सांयकाळी वसई गावातील न्यू इंग्लिश स्कूल येथे हा उपक्रम संस्थेने आयोजित केला होता.वसईचे आ.हितेंद्र ठाकूर हे या कार्यक्रमासाठी वेळेवर उपस्थित राहिले.मात्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार विजय पाटील व भाजपच्या स्नेहा दुबे हे दोघेही वसईमध्ये असूनही त्यांनी या उपक्रमास दांडी मारली.विजय पाटील यांनी आपला प्रतिनिधी म्हणून आपले सहकारी जिमी गोंसालविस यांना पाठवले.उमेदवार व प्रतिनिधी यामधील फरक त्यांनी समजून घ्यायला हवा होता.हल्ली गृहनिर्माण संस्थेच्या सभेलाही मूळ मालकाचा प्रतिनिधीही चालत नाही.त्यामुळे त्यांची ही कृती वसईकरांच्या पचनी पडली नाही.२०१९ सालच्या निवडणुकीच्या काळात झालेल्या या कार्यक्रमास विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी दांडी मारली होती.त्यामुळे वसईच्या विकासाबाबत विरोधी पक्षाकडे व्हिजन नसल्याचे स्पष्ट झाले आहे.एरवी विरोधी पक्षनेते आ.हितेंद्र ठाकूर यांच्यावर तोंडसुख घेत असतात.विकासाच्या प्रश्नावर आ.ठाकूर यांना घेरण्याचे सातत्याने प्रयत्न करत असतात.त्यांच्या या खोडसाळपणाला आ.ठाकूर उत्तर देत बसत नाहीत.पण विरोधकांनी माझ्यासमोर येवून फेस टू फेस चर्चा करावी,अशी त्यांची अपेक्षा असते.तशी संधी ही जागरूक नागरिक संस्था,दर निवडणुकीत उपलब्ध करून देत असते.पण केवळ टीका करण्यात धन्यता मानण्यात समाधान मानणारे विरोधक हे विकासाच्या प्रश्नावर आ.हितेंद्र ठाकूर यांचा सामना करू शकत नाही,हे २०१९ व यंदा २०२४ च्या या परिसंवादात स्पष्ट झाले आहे.कालची घटना म्हणजे विरोधकांनी …..पाय लावून पळ काढला,असेच म्हणावे लागेल.

