दीपक मोहिते,
आ.हितेंद्र ठाकूर वाढदिवस विशेष,
लोकनेते आ.हितेंद्र ठाकूर ; लोकमान्यता असलेला अजातशत्रू,
उद्या वसईचे आमदार लोकनेते यांचा वाढदिवस,कोरोना काळातील दोन वर्षांचा अपवाद वगळता त्यांचा हा वाढदिवस गेली अनेक वर्षे मोठ्या उत्साहात साजरा होत आला.उद्याही तो उत्साही व आनंदी वातावरणात साजरा होणार आहे.आपल्या या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून कार्यकर्ते,राजकीय नेते,मित्रमंडळी,ज्येष्ठ नागरिक,महिला,
आबालवृद्ध व अधिकारीवर्ग यांच्या जुने विवा महाविद्यालयात रांगा लागतील.या दिवशी होणारी गर्दी नियंत्रित करताना त्यांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होत असते.असे हे असामान्य नेतृत्व आता साठीच्या घरात पोहोचले आहे,पण उत्साह व इच्छाशक्ती आजही ” जैसे थे,” स्थितीतच आहे.लाखो लोकांचे आशीर्वाद व
शुभेच्छाच्या शिदोरीवर त्यांनी आजवर यशस्वी वाटचाल केली.एकेकाळी आ.हितेंद्र ठाकूर आणि वसई तालुका असे समीकरण होते,ते आता आ.हितेंद्र ठाकूर आणि पालघर जिल्हा झाले.हे जे स्थित्यंतर झाले ते केवळ त्यांच्या कर्तृत्वामुळे,हे त्यांचे विरोधकही नाकारू शकणार नाही.असो,त्यांच्या या नेत्रदीपक वाटचालीवर आपण एक नजर टाकूया…
गेली अनेक वर्षे राज्याच्या राजकीय क्षितिजावर झळकणारे आ.हितेंद्र ठाकूर हे राजकारणातील एक वेगळेच रसायन आहे.अत्यंत गरीब परिस्थितीतून ते निर्माण झालेले असून ते राज्यस्तरावरील राजकारणात सर्व पक्षाना हवेहवेसे वाटणारे आहे,यामागचे कारणही तसंच आहे.आ.ठाकूर यांनी आपल्या राजकीय वाटचालीत कधीच सूडाच्या राजकारणाला थारा दिला नाही.ज्यांनी मदतीसाठी आपला हात पुढे केला,त्याचा हात आपल्या हातात घेतला व तो कधीही अर्ध्या वाटेत सोडला नाही.त्यामुळे त्यांची राजकीय क्षेत्रात ” अजातशत्रू,” अशी ओळख निर्माण झाली व ती आजही कायम आहे.आपल्या अंगी असलेल्या लढाऊ बाणाचे दर्शन ते केवळ निवडणूकीच्या लढाईमध्ये दाखवतात.उर्वरित पावणेपाच वर्षात ते सर्वसमावेशक,अशा वृत्तीने सामाजिक व राजकीय क्षेत्रात वावरत असतात.त्यामुळे त्यांची ओळख जी ” अजातशत्रू,” अशी ओळख झाली आहे,ती एकप्रकारे सार्थक ठरली आहे,असेच म्हणावे लागेल.त्यामुळे जनता जनार्दनाने त्यांना आप्पा व लोकनेते,अशी टोपण नांवे दिली आहेत.आपला माणूस तो ” आप्पा,” व लोकांच्या सुखदुःखात समरस होतो,संकटप्रसंगी धावून जातो,तो लोकनेता,ही दोन्ही टोपण नांवे त्यांची ओळख पटवून देत असतात.अशा या आप्पाचा उद्या वाढदिवस आहे.आप्पा किती वर्षांचे झाले,यावर विवेचन करण्याऐवजी त्यांची माणूस म्हणून कशी वाटचाल झाली ? यावर प्रकाशझोत टाकणे,संयुक्तिक ठरेल.१९८५ ते आजतागायत म्हणजे गेली चार दशके आ.ठाकूर राजकारणात सक्रिय आहेत.गेल्या काही वर्षात आपल्या देशात राजकारणाला वेगळे वळण मिळाले,ते आता सुडाचे राजकारणाच्या वळणावर येऊन पोहोचले आहे.पण आप्पाने अशा सूडाच्या राजकारणाला कधीही आपल्या आसपासही फिरकू दिले नाही.अनेक राजकारणी व स्वकीयांनी देखील त्यांच्या विरोधात वेळोवेळी सुडाचे राजकारण केले,पण त्यांनी कधीही पलटवार केला नाही.कायम स्थितप्रज्ञ राहून त्यांनी अशा लोकांकडे कायम दुर्लक्ष केले.आज ते सारे एकतर भूतकाळात जमा झाले आहेत किंवा राजकारणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले गेले आहेत.हाताच्या बोटावर मोजण्याइतके काही जण त्यांची साथ सोडून गेले,तेही राजकीय पटलावरून कायमचे नाहीसे झाले.ज्यांनी त्यांना पराभूत करण्याची दिवास्वप्ने पाहिली,त्यांना वसईकर जनतेने पार झिडकारले.आज त्यांना स्वतःचे अस्तित्व देखील आप्पाच्या झंझावातापुढे टिकवता आले नाही.कोरोना काळात त्यानी केलेल्या कार्याची राज्यभरात प्रशंसा झाली.या अशा अस्मानी संकटाच्या काळात वसईच्या जनतेची सेवा केली,त्या सेवेला तोड नाही.आप्पा स्वतः रिंगणात उतरलेच,पण आपली संपूर्ण यंत्रणा व टीम सलग दोन वर्षे कामाला लावली व ७५ लाख लोकांसाठी दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली.त्यांना या मानवतावादी कामात मित्रमंडळी,सामाजिक संस्था व स्वतःच्या अनेक ट्रस्टची मोलाची मदत झाली.स्वतःला कोरोनाची लागण होऊनही आप्पा दिवसाचे अठरा तास या कामात सक्रिय होते.त्यांची दांडगी इच्छाशक्ती व मेहनत पाहून त्यांचे कार्यकर्ते पण त्यांच्यासारखेच त्या काळात जोमाने काम करत होते.त्यामुळे या काळात वसई तालुक्यातील लोकांची उपासमार टळू शकली.कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचार करणाऱ्या केंद्रासाठी त्यांनी विरार पूर्व भागात आपल्या कॉलेजची वास्तू देऊ केली.परिणामी अनेकांचे प्राण वाचू शकले.त्यांच्या या मानवतेच्या कार्याचे जनतेने तोंडभरून कौतुक केले.वास्तविक अशावेळी इतर पक्षाच्या अनेक नेत्यानी त्यांना साथ द्यायला हवी होती,पण त्यावेळी कोणीही फारसे पुढे आले नाही,पण अशा परिस्थितीमध्येही आप्पानी एकाकी लढा देत आपला किल्ला शाबूत ठेवला. १९९० पासून त्यांनी सलग सहावेळा विधानसभा निवडणुका एकहाती जिंकल्या.त्यांच्याशिवाय किंवा ठाकूर घराण्यातील व्यक्तिशिवाय वसई व नालासोपारा मतदारसंघात इतर कोणी जिंकू शकत नाही,हे आजवर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत सिद्ध झाले आहे.२००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्याचा अनुभव आ.ठाकूर यांनीही घेतला.त्यावेळी त्यांनी आपल्या एका विश्वासू सहकाऱ्याला विधानसभा निवडणुकीत उतरवले होते,पण त्यांना मतदारांनी साफ नाकारले.त्यांनतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा रिंगणात उतरले व त्यांनी इतिहास घडवला.त्यामुळे वसई तालुका व ठाकूर कुटुंब,हे जे नातं निर्माण झाले आहे,किंवा या कुटुंबाची नाळ सर्वसाधारण वसईच्या नागरिकांशी जुळलेली आहे,ती आणखी निदान २५ वर्षे तरी तुटणार नाही.
गेली तीन दशके राजकारण करताना त्यांनी आपल्या कार्याला समाजकरणाची जोड दिली.सांस्कृतिक,
कला-क्रीडा,शिक्षण व विविध उपक्रमाचा त्यामध्ये समावेश आहे.त्यांनी सुरू केलेला वसई तालुका कला-क्रीडा महोत्सव गेली तीन दशकाहून अधिक काळ सुरू आहे.दरवर्षी होणाऱ्या या महोत्सवात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या संख्येचा वेलू आता ७५ हजार स्पर्धकावर पोहोचला आहे.तर मॅरेथॉन स्पर्धेतही राष्ट्रीय पातळीवरील धावपटू सहभागी होत असतात.त्यांच्या यंग स्टार ट्रस्टतर्फे महिला व मुलींसाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येत असतात.त्यामध्ये मंगळागौर,हळदीकुंकू,
भोंडला,फॅशन शो,पिरॅमिडस व अन्य उपक्रमाचा समावेश असतो.शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी,ही दैदिप्यमान अशी असून ती इतर शैक्षणिक संस्थांसाठी ती ” रोलमॉडेल,” ठरली आहे.एकेकाळी वसई तालुक्यात उच्च व दर्जेदार शिक्षण उपलब्ध नव्हते,ते आप्पामुळे तालुक्यात मिळू शकले.आज त्यांच्या महाविद्यालयात सुमारे पन्नास हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.तीस वर्षांपूर्वी वसई तालुक्यातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती,अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारने तालुक्यातील लाखो हे.जमिनी नागरीकरणासाठी मोकळ्या केल्या व येथील जनतेच्या माथी सिडकोचे भूत बसवले.वसई तालुक्याच्या नियोजनबद्ध विकासाला हे प्राधिकरण हातभार लावेल,अशी सर्वसाधारण अपेक्षा असताना या भुताने विकास करण्याऐवजी तालुका भकास केला.तर सरकारनेही पाणी,सांडपाणी निचरा,वाहतूक व्यवस्था,आरोग्य व शिक्षण इ.पायाभूत सुविधा उपलब्ध न करता सरसकट बांधकाम परवानग्या देण्यास सुरुवात केली.परिणामी जनतेच्या हालअपेष्टाना पारावर उरला नाही.अशावेळी आ.हितेंद्र ठाकूर यांनी तत्कालीन आघाडी सरकारच्या उरावर बसून सूर्या पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली व जनतेला दिलासा मिळवून दिला.या योजनेचा दुसरा टप्पाही आता सुरू झाला आहे.या प्रश्नी विरोधकांनी कायम आ.ठाकूर याना लक्ष्य केले.त्यांच्यावर अनेक आरोप केले,पण त्या आरोपाला उत्तर देत न बसता आ.ठाकूर यांनी ” करून दाखवले,” अशा असामान्य लोकप्रतिनिधींचा उद्या वाढदिवस असून सकाळपासून विवा महाविद्यालयात त्यांच्या चाहत्यांची तुफान गर्दी होणार आहे.त्यामध्ये राजकीय नेते,आमदार,खासदार,
कार्यकर्ते,आबालवृद्ध,
विद्यार्थी,व्यापारी,
चाकरमानी,महिला,
शासकीय अधिकारी व समाजातील प्रत्येक घटकांचा समावेश असतो.अशा या ” जाणत्या राजा,” ला वाढदिवसाच्या आमच्या News27.in या वेबपोर्टलच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा,
त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या पोर्टलने एक घोषवाक्य तयार केले आहे.
” माझी राजकीय दहशत,”
” द,”- दम असेल तर लढा,
” ह,”- हरण्याची तयारी ठेवा,
” श,”- शत प्रतिशत,आमचीच सरशी,
” त,” – तडीपार झालात,नाहीत तर मिळवलं ही आहे आमची खरी ” दहशत,”

