दीपक मोहिते,
रात्र वैऱ्याची आहे…
स्थानिक भूमीपुत्राच्या जमिनी लुटण्यासाठी धनदांडगे सरसावले,
डहाणू-नाशिक रेल्वे,हा महत्वाकांक्षी प्रकल्प आता मार्गी लागला आहे.हा प्रकल्प गेली ४० वर्षे कसा रखडला ? त्याला राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधी यांचा नाकर्तेपणा कसा जबाबदार आहे,व आता प्रकल्प मार्गी लागत असल्याचे पाहून या भागातील जमिनी खरेदी करण्यासाठी मड्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे नतद्रष्ट लोक कसे सरसावले आहेत,यावर प्रकाशझोत टाकणारा व राज्यकर्त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकणारा लेख लवकरच आपल्या news27.in या वेब पोर्टलवर प्रकाशित करत आहे.वाढवण बंदर होणार असल्याची खात्री पटल्यानंतर अनेक धनदांडग्यांनी वरोर व वाढवण गावातील जमिनी मातीमोल भावाने गिळंकृत केल्या.त्याच धनदांडग्यांनी आपला मोर्चा आता डहाणू -नाशिक रेल्वे प्रकल्प परिसरातील आदिवासी समाजाच्या जमिनीकडे वळवला आहे.स्थानिक भूमीपुत्राकडून मातीमोल किमतीने जमिनी खरेदी करून त्या सरकारला प्रचंड दराने विकण्याचा गोरखधंदाच सध्या सुरू झाला आहे,या सर्व गैरप्रकारात प्रांत,तहसीलदार,तलाठी व प्रकल्पाचे उच्चस्तरीय अधिकारी सामील आहेत,त्यांचा आपण नावासह पर्दापाश करणार आहोत.सध्या मी दोन्ही प्रकल्पाच्या अधिकऱ्यांच्या संपर्कात आहे,पण हे अधिकारी बोलायला तयार नाहीत,त्यामुळे आजवर कधीही माहिती अधिकाराचा वापर न करणाऱ्या माझ्यासारख्या पत्रकारांवर ती पाळी आली आहे.त्यामुळे लवकरच पोर्टलवर जो लेख माझा प्रसिद्ध होणार आहे,तो वाचकांनी आवर्जून वाचावा,असे मी आवाहन करतो.

