दीपक मोहिते,
जातीपातीचे राजकारण,
नालासोपारा विधानसभा ; बाहेरचा उमेदवार लादल्यास भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज होणार,
१३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंधात भाजपचा उमेदवार कोण ? या चर्चेला सध्या ऊत आला असून भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमावस्थेत सापडले आहेत.अशावेळी भाजप मात्र या विधानसभा मतदारसंघात हिंदी भाषिकांची लोकसंख्या लक्षात घेऊन उत्तर भारतीय उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे.डहाणूचे विद्यमान नगराध्यक्ष भरत राजपूत व भाजपच्या स्थानिक पदाधिकारी ऍड.नेहा सुरेश दुबे या दोघांची नांवे चर्चेत आघाडीवर आहेत.डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांची राजकीय पार्श्वभूमी ही वादग्रस्त असून एका बँक घोटाळ्याप्रकरणी ते अडचणीत आले होते.तसेच त्यांचा राजकीय प्रवास हा देखील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो.राजपूत राष्ट्रवादी,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,असा प्रवास करत भाजपमध्ये स्थिरावले आहेत.त्यांना एका माजी केंद्रीयमंत्र्यांचे पाठबळ आहे.त्यामुळे त्यांची बाजू मजबूत आहे.पण येथील मतदार त्यांना स्विकारणार नाहीत.त्यांची पहिली पसंती ही स्थानिक उमेदवारांनाच मिळते,त्यामुळे ते विद्यमान आ.क्षितिज ठाकूर याना आव्हान देऊ शकतील, असे वाटत नाही.त्यांना केंद्रीय नेत्याकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यामुळे त्यांनी आतापासूनच मतदारसंघात बॅनर्स,होर्डिंगचा धुमधडाका लावला आहे.जर त्यांना उमेदवारी मिळाली तर भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारापासून दूर राहण्याची शक्यता अधिक आहे.दुसऱ्या उमेदवार ऍड.नेहा दुबे यांनाही उत्तर भारतीय खासदारांच्या लॉबीचा भरभक्कम पाठिंबा आहे.या लॉबीने त्यांच्या नावाची केंद्रीय नेतृत्वाला शिफारस केली आहे.तसेच धडक कामगार सेनेचे अभिजित राणे हे त्यांचे कट्टर समर्थक असून त्यांना उमेदवारी मिळावी, म्हणून तेही प्रयत्नशील आहेत.माजी कृपाशंकरसिंह यांचा दुबे कुटूंबियाशी चांगला घरोबा आहे.त्यांचीही ऍड.नेहा दुबे यांना मदत होऊ शकते.त्यामुळे या दोघांपैकी ऍड.नेहा दुबे याना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे.
भाजपमध्ये अशी रस्सीखे सुरू असतानाच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये उमेदवारी मिळू नये,यासाठी भाजपमधील एक मोठा गट सक्रिय झाला आहे.अशा परिस्थितीमुळे पक्षाची उमेदवारी ही ऍड.नेहा दुबे यांना,मिळण्याची शक्यता आहे.त्यांना जर उमेदवारी
मिळाली तर मराठी भाषिक मतदार त्यांना मतदान करतील कि नाही,यावर भाजपचे यश-अपयश अवलंबून आहे.

