दीपक मोहिते,
निवडणुकीचे वारे,
आ.ठाकूर रिंगणात नसतील तर माजी महापौर प्रविणा ठाकूर यांना उमेदवारी मिळावी,
पालघर जिल्ह्यातील सहापैकी तीन विधानसभा जागा,आ.हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीकडे आहेत.तर उर्वरित पालघर-एकनाथ शिंदे गट,विक्रमगड- राष्ट्रवादी काँग्रेस ( उबाठा ) व डहाणू- मार्क्स.कम्यु.या तीन पक्षाकडे आहेत.वसई व नालासोपारा या दोन्ही मतदारसंघात ठाकूर कुटुंबियाशिवाय इतर कोणालाही मतदार स्विकारत नाहीत.त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात अनुक्रमे हितेंद्र ठाकूर व क्षितिज ठाकूर यांनीच उभे राहावे,अशी मागणी करण्यात येत आहे.पण हितेंद्र ठाकूर यांनी निवडणूक लढवायची नाही,अस ठरवलं तर त्यांच्या पत्नी प्रविणा ठाकूर यांना उमेदवारी देण्यात यावी,अशी मागणी कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी करत आहेत.यामध्ये व्यापारी,उद्योजक
सामाजिक संस्थांचे पदाधिकारी,ज्येष्ठ नागरिक,नोकरदार मंडळी,महिला मंडळे व महिला बचत गटाचे कार्यकर्ते,बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक व माजी नगरसेविका यांचा समावेश आहे.प्रविणा ठाकूर या माजी महापौर असून त्यांनी आपल्या कार्यकाळात मोठ्याप्रमाणात विकासकामे पार पाडली होती.तसेच त्यांचे विविध संस्था व समाजातील विविध घटकांशी चांगले ऋणानुबंध आहेत.या मतदारसंघात महिला उमेदवाराला आजवर संधी मिळाली नाही,त्यामुळे महिला वर्गाचा त्यांना उमेदवारी मिळावी,यासाठी विशेष आग्रह आहे.जर आ.हितेंद्र ठाकूर यांनी ही निवडणूक लढवायची नाही,असा निर्णय घेतल्यास प्रविणा ठाकूर या त्यांच्या वारस ठरू शकतील,व या मतदारसंघात त्या विक्रमी मताधिक्याने विजयी होतील,असे बविआ कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.त्यांना संधी मिळाल्यास आ.हितेंद्र ठाकूर यांना वसई,नालासोपारासह बोईसर विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करणे शक्य होईल.बोईसर विधानसभा जिंकण्यासाठी भाजप व शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) यंदा आपले सर्वस्वी पणाला लावणार आहेत.त्यामुळे आ.ठाकूर यांनी या मतदारसंघाच्या निवडणुकीची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेण्याची गरज आहे.ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन वसई येथे त्यांनी प्रविणा ठाकूर यांना मैदानात उतरवण्याची गरज आहे.प्रविणा ठाकूर या पक्षाचा चेहरा असून त्यांचे प्रत्येक भाषण हे वक्तृत्व कसे असावे,याचा आदर्श नमुना असतो.मराठी,गुजराती व हिंदी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व वाखाणण्याजोगे आहे.आ.ठाकूर याविषयी काय निर्णय घेतात,याकडे वसईच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.

