दीपक मोहिते,
” मॅडम,तुम्ही ” मेकअप,” का नाही करत ? ”
मॅडम सौ.राणी सोयामोई कॉलेजमधील एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधत होत्या .
त्यांच्या अंगावर हातातील घड्याळाशिवाय दुसरं कुठलही आभूषण नव्हत.इतकंच काय तर विद्यार्थ्यांना सर्वात जास्त आश्चर्य याच वाटल की , त्यांनी तोंडाला पावडरसुद्धा लावली नव्हती.
भाषण इंग्रजीत सुरू होत,त्या फक्त जास्तीत जास्त पाच मिनिट बोलल्या असतील.पण त्यांच्या पाच मिनिटाच्या भाषणातील शब्द,हे समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे तर होतेच आणि दृढ संकल्पाने भरलेले होते.
थोड्यावेळाने विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली.
प्रश्न – मॅडम आपलं नाव काय आहे ?
माझं नाव राणी आहे,सोयमोई,हे माझं कुटुंबातील नाव आणि मी उडीशाची मूळनिवासी आहे….अजुन काही विचारायचं आहे ?
विद्यार्थ्यांमधील एक हाडकुळी मुलगी उभी राहीली,तीने प्रश्न विचारायची परवानगी मागितली.
” विचार , बाळा?”
” मॅडम,तुम्ही ” मेकअप,” का करत नाही ?
मॅडमचा चेहरा अचानक पांढरा फटक पडला,त्यांच्या कपाळावरून घाम ओघळू लागला.चेहऱ्यावर असलेलं हास्य अचानक नाहीस झालं होत.समोर बसलेले विद्यार्थी एकटक मॅडमकडे पाहत होते.
त्यांनी शेजारी टेबलावर ठेवून असलेली पाण्याची बाटली उचलली आणि तोंडाला लावली.आपल्या समोर बसलेल्या विद्यार्थ्यावरून आपली नजर फिरवली आणि प्रश्न विचारलेल्या मुलीला हाताने बसण्याचा इशारा केला.
त्यानंतर मॅडम बोलू लागल्या,सर्वत्र शांतता पसरली होती.
” माझं काळीज पिळवटून टाकणारा प्रश्न विचारला आहेस बाळा तू .. हा असा प्रश्न आहे,ज्याचं उत्तर एका शब्दात देणं कठीण आहे.त्यासाठी तुम्हाला माझ्या आयुष्याची कथा ऐकवावी लागेल.मला सांगा, तुम्ही माझी जीवन कथा ऐकण्यासाठी तुमच्या आयुष्यातील दहा मिनिटे देण्यास तयार आहात का ? ”
” हो…हो….आम्ही तयार आहोत ..”
” माझा जन्म उडीशा राज्यातील एका आदिवासी कुटुंबात झाला.”
त्यांच्या शेजारी बसलेला जिल्हाधिकारी अचानक कान टवकारून बोलत असलेल्या मॅडमवर नजर टाकी तर दुसरी नजर क्षणातच पुढ्यात बसून असलेल्या विद्यार्थ्यावर!!!
” होय,माझा जन्म कोडरमा जिल्ह्यातील एका आदिवासी कुटुंबात झाला होता.आमचे घर हे एक झोपडी होते.त्याच्या बाजूला ” मिका ” नावाची खाण होती.माझे आईवडील दिवसभर या खाणीत काम करायचे.मला दोन मोठे भाऊ आणि एक लहान बहीण होती.आम्ही एका लहानशा झोपडीत राहायचो.पाऊस सुरू झाला कि झोपडीच्या झावळ्यातुन पावसाचे पाणी टपकत असे.माझ्या आई वडिलांना मिळणार पगार हा अत्यन्त तुटपुंजा असायचा व तो संपूर्ण कुटुंबाला पुरेसा नव्हता.त्यांना दुसरं काम ही मिळत नव्हत.खाणीत काम करणं म्हणजे खूपच कष्टप्रद,मेहनती आणि खालच्या दर्जाच काम असायचे…
” मी चार वर्षाची झाले तेंव्हा माझे आई,वडील आणि दोन्ही भाऊ अनेक आजारामुळे त्रस्त झाले होते.पण त्यांना ठाऊक नव्हत की त्यांना झालेला आजार हा खाणीत काम करत असताना त्या खाणीत उडणाऱ्या धुळीमुळे त्यांना झाला होता.
त्यानंतर अवघ्या एका वर्षात माझ्या दोन्ही भावांचा मृत्यू झाला.
शेजारी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एक नजर इकडे तिकडे फिरवली आणि हळूच ते खिशातील रुमाल काढून आपल्या डोळ्यांतील अश्रू पुसू लागले.
” लहानपणी खूप वेळा आमच्या नशिबी साधं पाणी आणि एक किंवा दोन भाकरी बस ..इतकंच जेवण असायचं.माझे दोन्ही भाऊ गंभीर आजारी असायचे,त्यांना वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे व भुकेपायी या जगातून निघून गेले.माझ्या गावात डॉक्टर तर सोडाच,शाळा सुद्धा नव्हती.ज्या गावात डॉक्टर,शाळाच काय वीज आणि शौचालयसुद्धा नव्हते,त्या गावातील लोकांची कशी अवस्था असेल,याची कल्पना करा.
एके दिवशी वडिलांनी भुकेमुळे हाडांना चिकटलेली चामडी सोकॉल्ड कुपोषित झालेला माझा हात पकडला आणि मला पत्र्यांच काम चालू असलेल्या खाणीत घेऊन गेले.ही एका अभ्रकाची खाण होती,ज्या खाणीच नाव दिवसेंदिवस खराब होत चाललं होत,एक मोठी खाण होती ती,खूपच प्राचीन खाण,जी खोदून खोदून अगदी पाताळात जाऊन पोहचली होती.माझं काम त्या खोल खाणीत उतरून त्यातील भुयारी मार्गात असलेले अभ्रकाचे तुकडे जमा करून एका ठिकाणी ढीग बनवायच होत.हे काम फक्त दहा वर्षाखालील मुलांसाठीच शक्य होणारे होते.
आयुष्यात त्या दिवशी रात्री मी पहिल्यांदाच पोटभरून जेवले,पण त्यादिवशी मला उलटी झाली .
ज्यावेळी मला शाळेत असायला हवं होत,तेंव्हा मी अंधाऱ्या खोलीत अभ्रकाचे तुकडे गोळा करण्यात रममाण झाले होते.तेथे मी खाणीतील विषारी वायू शरीरात घेऊ लागले होते.
कधी कधी तर ” भूस्खलन ” होऊन लहान बालके मृत्युमुखी पडायची आणि कधी कधी तर विषारी वायू आत गेल्याने मुले मेलेली मी बघितली.या साऱ्या आयुष्यातील घटना जणू माझ्यासाठी सामान्य झाल्या होत्या.
दिवसाचे आठ तास काम करून,कमीतकमी एका वेळेचं पोटभरून जेवण मिळत असायचं.त्या दरम्यान मी भुकेपायी आणि विषारी वायू आत घेतल्याने अत्यंत कृश व कुपोषित झाली होती.
एका वर्षानंतर माझी लहान बहीणसुद्धा या खाणीत काम करायला लागली.त्यानंतर माझ्या वडिलांना आता कुठे थोडं बर वाटायला लागलं होत , मग काय ..वडील , आई , बहीण आणि मी….आम्ही सार कुटुंब खाणीत काम करायला लागलो.
पण नियतीने पुन्हा डाव साधला आणि नशिबाने आता दुसऱ्या पद्धतीने आमची परीक्षा घ्यायची ठरवलं.त्यादिवशी मला भयंकर ताप आला होता आणि मी कामाला जाऊ शकले नव्हते.अचानक पाऊस सुरू झाला होता ..खाणीत काम करत असलेले हजारो कामगार अंगावर खाण कोसळल्याने मृत्युमुखी पडले ..त्यात माझे वडील , आई आणि बहिण सुद्धा होते.आता
मॅडमच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले होते . शेजारी असलेली मंडळी व विद्यार्थी श्वास रोखून सारं काही विसरून स्तब्ध झाले होते.बऱ्याच लोकांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले होते.
” मी तेव्हा फक्त सहा वर्षाची होते,शेवटी मी सरकारी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली जवळच असलेल्या मंदिरात पोहचले.तेथेच मी शिकले . माझ्या पूर्ण गावातून शिकलेली मी पहिली मुलगी होती आणि शेवटी आज ही मॅडम तुमच्या समोर उभी आहे.”
” तुम्ही विचारात पडला असाल की याचा आणि त्याचा काय संबंध ? बरोबर ना …..प्रश्न विचारला होता ना …मेकअप का नाही करत ? ”
मॅडमने पुन्हा एक नजर चारही बाजूंनी फिरवली .
” शाळेत शिकत असताना मला जाणवलं की , लहानपणी अंधारात अभ्रक गोळा करण्याचं काम जे माझ्या नशिबी आल होत , त्याचाच उपयोग मेकअप उत्पादनांमध्ये केला जात आहे.अभ्रक हे पहिल्या श्रेणीतील मोतीसारखं दिसणार सिलेकेट खनिज आहे.कित्येक मोठ्या कंपन्यांद्वारे दाखवल्या जाणाऱ्या खनिज मेकअपमध्ये तुमच्या त्वचेला जो सर्वात चमकदार रंग दिसतो तो या बहुरंगी अभ्रकातून मिळत असतो.ज्या अभ्रकाला जवळपास वीस हजार बालके आपला जीव धोक्यात घालून जमा करत असतात.
गुलाबाच्या पाकळ्यासारखी कोमलता,त्यांची जळून गेलेली स्वप्ने,भटकते जीवनमान आणि खाणीत त्यांचं तुडवले गेलेले शरीर आणि रक्त तुमच्या गालांवर स्वार होत असत.खाणीत मुलांच्या हातून उचलल्या गेलेल्या लाखो डॉलरच्या अभ्रकाचा उपयोग आजही करण्यात येत आहे …आपल्या सुंदर त्वचेला चमकवण्यासाठी…
आता तुम्हीच सांगा ..
मी चेहऱ्याला मेकअप का व कसा काय करू ?
स्वतः च्या भावांच्या आठवणीत पोटभरून कस जेवण करू ? जे भुकेपायी देवाघरी गेलेत.मी माझ्या आईच्या आठवणीत महागडे कपडे कसे अंगावर घालवून मिरवू,ज्या आईने कधी विचार ही केला नव्हता की,तिच्या नशिबात फाटलेल्या कपड्याव्यतिरिक्त काहीही नसेल .”
जेव्हा राणी मॅडम भाषण संपवून निघाल्या,तेव्हा उपस्थित सर्व नागरिक उभे राहिले.त्यांच्या चेहऱ्यावर स्मित तरळत होत .डोळ्यातील अश्रू न पुसता,त्यांची मान समोर ताठ होती.
काही वर्षानंतर ….
त्या मॅडम,भारत गणराज्य देशाच्या पहिल्या नागरिक बनल्या …
महामहीम ….
द्रौपदी मुर्मु….
भारत गणराज्य, राष्ट्रपती ….

