दीपक मोहिते,
नॅशनल डेस्क,
अजितदादाच्या जाण्यानंतर राजकीय हालचालींना वेग,सुनेत्रा पवार आज सांयकाळी शपथविधी होणार,
अजितदादा यांच्या अपघाती मृत्यूनंतर महायुतीमधील सत्तास्पर्धेला चांगलाच वेग आला आहे.उपमुख्यमंत्री व अर्थ व नियोजन खाती कोणाकडे सोपवण्यात येणार ? यावर खलबते सुरू झाली आहेत.उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा पवार यांना देण्यात यावी,अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यानी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही मागणी मान्य करतील,अशी शक्यता आहे.पण अर्थ व नियोजन खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाऊ देणार नाहीत.
कारण अर्थमंत्रीपद हे गृहमंत्रीपदा इतकेच महत्वाचे आहे. २०२४ मध्ये पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर गृहमंत्रीपद आपल्याला मिळावे,त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रयत्न केले होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी त्यांची डाळ शिजू दिली नव्हती व त्यांनी गृह खाते स्वतःकडे ठेवले. तसेच अर्थ खाते देखील अजितदादा यांना देण्यास शिंदे यांनी विरोध केला होता. पण अजितदादांनी महत्प्रयासाने हे खाते मिळवले. अजितदादा पवार हे निधीवाटपात दुजाभाव करतात, असा महायुतीच्या आमदारांनी आरोप केला होता, म्हणून हे खाते त्यांच्याकडे सोपवण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. पण फडणवीस यांनी आमदारांचा विरोध डावलून हे खाते अजितदादा यांच्याकडे सोपवले होते.मात्र आता अजितदादा यांच्या जाण्यानंतर हे खाते एकतर भाजपच्या एखाद्या ज्येष्ठ मंत्र्यांकडे किंवा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण झाल्यास आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याकडे सोपवण्याची शक्यता आहे. जयंत पाटील यांनी यापूर्वी या पदावर काम केले आहे. त्यांना अर्थ खात्याचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे फडणवीस त्यांना पुन्हा संधी देतील, असे वाटते. आज संध्याकाळी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार आहे.त्यामुळे त्यांच्याकडे कोणत्या खात्याचा भार देण्यात येतो,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

