दीपक मोहिते,
मत्स्यव्यवसायाच्या समस्यांबाबत मंत्रालयात बैठक,
वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांनी गेल्या काही महिन्यांपासून वसई तालुक्यातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यापैकी अनेक विकासकामाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरीव आर्थिक निधीही दिला आहे.त्यामुळे तालुक्यातील रस्ते,उड्डाणपूल,रिंगरुट,
एसटी सेवेत नव्या वाहनाचा समावेश,गृहनिर्माण संस्थांना ओसी,सीसी उपलब्ध करणे,स्वयंपुनर्विकास व मासेमारी व्यवसायाच्या समस्या,याचा त्यामध्ये समावेश आहे.

काल त्यांनी मत्स्यव्यवसायमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील मासेमारी प्रश्नासंदर्भात भेट घेतली व प्रदीर्घ चर्चा केली.मासेमारी व्यवसायाला कृषी दर्जा दिल्याबद्दल त्यांनी राणे यांचे आभार मानले,तसेच मत्स्यव्यवसायाला भेडसावणाऱ्या समस्या,जेटी,नवीन रो रो सेवा सुरू करणे, मच्छीमारांच्या पारंपारिक जमिनी,मच्छीमारांच्या विविध मागण्या व प्रलंबित समस्या विषयी चर्चा केली.सदर बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन.रामस्वामी,
मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे,सहा.आयुक्त दिनेश पाटील,जितेंद्र मेहेर,विजय मेहेर,देवदत्त मेहेर,महेंद्र पाटील जयराज डावलेकर व संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.दरम्यान आपल्या व्यवसायाच्या विविध अडचणी व समस्याबाबत आ.स्नेहा दुबे पंडित यांनी शासनस्तरावर सुरू केलेल्या प्रयत्नाबाबत विविध मच्छीमार संघटनांनी त्यांचे आभार मानले आहेत.

