दीपक मोहिते,
” बॉटमलाईन,”
पवार याच्या गोरखधंद्यातील वाटेकरीची नांवे उघड झाली पाहिजेत….
वसई विरार शहर
महानगरपालिकेचा बदमाश आयुक्त अनिलकुमार कुमार याच्या भ्रष्टाचाराचे धागेदोरे थेट मंत्र्यापर्यंत पोहोचल्यामुळे आताअनेक जण अडचणीत येण्याची शक्यता आहे.सुमारे २ हजार कोटी रु.च्या भ्रष्टाचारात किती जण वाटेकरी आहेत,याचा शोध ईडी घेत आहेत.या शोधातून बरेच काही बाहेर येऊ शकते.तशी शक्यता असल्यामुळे अनेक बिल्डर्स,ठेकेदार व दलालांची रात्रीची झोप उडाली आहे.
बदली झाल्यानंतर या पवारने चार दिवसात अनेक फायली हातावेगळ्या केल्या.या काळात किती बिल्डर्सना परवानग्या,सीसी व ओसी दिल्या,त्याची सध्या पडताळणी करण्यात येत आहे.या पवाराच्या चौकशीतून बरेच काही उघड होण्याची शक्यता आहे.पवार याच्या जबानीतून अनेक छुप्या रुस्तमचे चेहरे लोकांसमोर येणार आहेत.

या छापेमारीनंतर मनपाचा सार्वजनिक बांधकाम विभाग ईडीच्या रडारवर आहे.एक सेवानिवृत्त अभियंता ईडीच्या रडारवर आहे.ईडीच्या भितीने अन्य एका अभियंत्याने नुकतीच सेवानिवृत्ती घेतली आहे.या महानगरपालिकेतील गटार व रस्ते डागडुजीच्या कामात गेल्या पंधरा वर्षात हजारो कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे.१०० फुटाच्या गटार कामांपैकी ६० फूट बांधकाम करून १०० फुटाचे बिल वसूल करायचे,असा गोरखधंदा या महानगरपालिकेत सर्रास होत आला आहे.तत्कालीन आयुक्त लोखंडे यांनी ठेक्यावरील एका अभियंत्याला हाकलून दिले होते.या महानगरपालिकेत काही वर्षांपूर्वी ठेकेदारांकडून ठेक्यात झालेला १२२ कोटी रु.चा भ्रष्टाचार दडपण्यात आला होता.यामध्ये काही नगरसेवकांचा देखील सहभाग होता.आता पवार यांच्यामुळे शिक्षणमंत्री दादा भुसे हे देखील अडचणीत आले आहेत.पवार हा त्यांचा नातेवाईक असून लायकी नसताना,त्याला मोक्याच्या जागांवर नियुक्त्या मिळत आल्या.गेल्या चार वर्षात प्रचंड बदनामी होऊन देखील त्याला ठाण्याच्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागात वर्णी लागली होती.यावरून त्याच्यामागे कोण होते,हे सांगायला नको.या महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा,इलेक्ट्रिक व महिला बालकल्याण विभागात गेल्या पंधरा वर्षांत झालेल्या खरेदी व्यवहाराचा तपास ईडीने केल्यास त्यांचे डोळे पांढरे होतील.तसेच एसटीपी प्रकल्पावर खर्च झालेले ३०० कोटी रु.कुठे खर्च झाले,याचा देखील ईडीने शोध घ्यायला हवा.कोरोनाच्या काळात खरेदी झालेल्या रुग्णवाहिका,पोलिसांसाठी खरेदी करण्यात आलेल्या पायलट बाईक्स,अग्निशमन दलाची वाहने व परदेशातून आणले स्नोर्केल शिड्या यांच्या व्यवहाराची चौकशी व सखोल तपास व्हायला हवा.तरच या महानगरपालिकेच्या गटारगंगेत कोण कोण लोळले,हे नक्कीच लोकांसमोर येऊ शकेल.

