दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
जनतेची फसवणूक करणे,थांबवा आता…
स्वार्थ,व राजकीय लाभ,अशा जीवघेण्या स्पर्धेत आता माणुसकी हरवत चालली आहे.सांगली जिल्ह्यात एका विद्यर्थिनीला कमी गुण मिळाल्यामुळे तिच्या जन्मदात्या बापाने बळी घेतला.ग्रामीण भागातील शेतकरी दिवसागणिक मृत्यूला कवटाळत आहे.पण आपल्या राज्यकर्त्यांच्या हृदयाला पाझर फुटत नाही.फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा दिवसेंदिवस काळवंडत चालला आहे.
राज्यात सर्वसामान्य माणसाचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत.त्यामध्ये प्रामुख्याने आरोग्य,शिक्षण,रोजगार,
कृषी,महागाई,पायाभूत सोयी-सुविधा व ग्रामविकास इ.क्षेत्राचा समावेश आहे.पण
दुर्देवाने आपले राज्यकर्ते समाजकारणाऐवजी धर्मकारणाला सर्वोच्च प्राधान्य देत आहेत.समाजात गोरगरीब जनतेची पिळवणूक करणाऱ्या मूठभर शेठजींचा अपवाद वगळता प्रत्येक घटक आज उपेक्षित जीवन जगत आहे.महागाईने परमसीमा गाठली आहे.जीवनावश्यक वस्तूवर लादण्यात आलेल्या जीएसटीने तर सर्वसामान्यांचे कंबरडे मोडून पडले आहे.गरिबी कमी केल्याचा दावा करण्यात येतो,पण ८० कोटी जनता ५ किलो धान्यासाठी तासनतास रांगेत उभा असतो.८० कोटी जनता आजही गरिबी रेषेखाली जीवन जगतोय,हे सिद्ध झालंय.आणि आपले पंतप्रधान ८ हजार कोटीच्या विमानातून जगभराचा प्रवास करत आमचा देश पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेला देश बनण्याच्या मार्गावर असल्याचे सांगत सुटले आहेत.आपले परराष्ट्र धोरण आजच्या घडीला हेलकावे खात आहे.आपल्याला चारही बाजूनी शत्रूराष्ट्रानी घेरले आहे. नेपाळ,मालदीव व बांगला देश या लहान देशांनीही डोळे वटारण्यास सुरुवात केली आहे. माणसाचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत.त्यामध्ये प्रामुख्याने आरोग्य,शिक्षण,रोजगार,
कृषी,महागाई,पायाभूत सोयी-सुविधा व ग्रामविकास इ.क्षेत्राचा समावेश आहे.पण
दुर्देवाने आपले राज्यकर्ते समाजकारणाऐवजी धर्मकारणाला सर्वोच्च प्राधान्य देत आहेत.समाजात गोरगरीब जनतेची पिळवणूक करणाऱ्या मूठभर शेठजींचा अपवाद वगळता समाजातील प्रत्येक घटक आज उपेक्षित जीवन जगत आहे.महागाईने परमसीमा गाठली आहे.जीवनावश्यक वस्तूवर लादण्यात आलेल्या जीएसटीने तर सर्वसामान्यांचे कंबरडे पार मोडून पडले आहे.गरिबी कमी केल्याचा दावा सतत करण्यात येतो,पण ८० कोटी जनता ५ किलो धान्यासाठी तासनतास रांगेत उभे असल्याचे पाहायला मिळते.हा जो काही विरोधाभास आहे,तो पावलोपावली पाहायला मिळतो.८० कोटी जनता आजही गरिबी रेषेखाली जीवन जगतेय,हे सिद्ध झालंय.आपले पंतप्रधान ८ हजार कोटीच्या विमानातून जगभराचा प्रवास करत आमचा देश पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेला देश बनण्याच्या मार्गावर असल्याचे सांगत सुटले आहेत.आपले परराष्ट्र धोरण आजच्या घडीला हेलकावे खात आहे.आपल्याला चारही बाजूनी शत्रूराष्ट्रानी घेरले आहे. नेपाळ,मालदीव व बांगला देशासारख्या लहान देशांनीही डोळे वटारण्यास सुरुवात केली आहे.अरुणाचल प्रदेशात चीनने सुमारे ८ हजार चौ.की. मी.चा भुभाग व्यापला असुन तो परिसर आपला नाहीच,असे सांगत केंद्र सरकारने सध्या भारतीय जनतेची फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे. ” अमृतकाल व सिंदूर,” अशी तुमच्या – आमच्या भावनेला हात घालणारी नांवे देऊन सरकार लोकांची दिशाभूल करत आहे.
महासत्ता होण्याची स्वप्ने रंगवणाऱ्या मोदी यांनी गेल्या बारा वर्षात आपल्या देशावर असलेल्या कर्जाने किती व कसा टप्पा ओलांडला ? याबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेले अन्नधान्य राजधानी दिल्लीत येऊ शकते,पण शेतकरी नाही. त्यांना अडवण्यासाठी सरकार रस्त्यावर खिळे ठोकते, पाण्याच्या फवाराचा मारा करते व निर्लज्जपणे म्हणते, आम्ही अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहोत.कृषिप्रधान देश म्हणून आपण जगभरात नावारूपाला आलो आहोत. औद्योगिक आघाडीवर सारं काही आलबेल आहे,हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ” मन की बात,” या कंटाळवण्या कार्यक्रमात अधून मधून सांगत असतात. पण मोदी सरकारचे ” औद्योगिक धोरण,” हे अदानी व अंबानी या दोघांच्या दावणीला बांधले गेले आहे. त्यामुळे मोदी यांची ” अबकी बार ४०० पार,” ही गगनभेदी घोषणा, गेल्या निवडणुकीत प्रत्यक्षात उतरू शकली नाही.

