दीपक मोहिते,
बी.आर.गवई देशाचे ५२ वे सरन्यायाधीश,
न्ययव्यवस्थेतील एक आदर्श व्यक्तिमत्व असलेले बी.आर. गवई यांची देशाचे ५२ वे सरन्यायधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
न्यायमूर्ती बी.आर.गवई यांनी काल देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली.माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती.संजीव खन्ना यांच्यानंतर न्यायमूर्ती गवई हे सर्वात वरिष्ठ न्यायमूर्ती आहेत.
भूषण रामकृष्ण गवई हे महाराष्ट्राचे सुपत्र आहेत.
२३ नोव्हेंबर २०२५ रोजी ते निवृत्त होईपर्यंत सरन्यायाधीश या पदावर कार्यरत असतील.
न्यायमूर्ती गवई हे मुळचे अमरावतीचे आहेत.त्यांनी ऑगस्ट १९९२ ते जुलै १९९३ या काळात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात विविध पदावर काम केले.१७ जाने.२००० पासून त्यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले.१४ नोव्हें.२०२३ रोजी न्यायमूर्ती गवई यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशपदी नेमणूक करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना अनेक ऐतिहासिक निकाल देणाऱ्या विविध खंडपीठात त्यांचा समावेश होता.
२४ मे २०१९ रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळाली.५०० आणि १००० रु.च्या चलनी नोटा सरकारने रद्दबातल केल्या होत्या.सरकारचा हा निर्णय कायम ठेवण्याचा निर्णय देणाऱ्या खंडपीठातही त्यांचा समावेश होता.

