दीपक मोहिते,
उशीरा सुचलेले शहाणपण,
गोड्या पाण्यातील मासेमारी ; राज्य सरकारकडून महत्वाचे पाऊल,
काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात मत्स्यव्यवसाय विभागाच्या आगामी १०० दिवसाच्या नियोजनाचा आढावा घेतला.त्यांनी या आढावा बैठकीत गोड्या पाण्यातील मासेमारी संबधित विविध विषयांवर चर्चा केली.
त्यामध्ये मत्स्यबीज उपलब्धता,व्यवसायाला प्रोत्साहन व आर्थिक निधी देणे,सागरी मासेमारी वाढीसाठी सर्वसमावेशक धोरण तयार करणे,धरण क्षेत्रातील मासेमारीला प्रोत्साहन देणे व मासेमारी सहकारी संस्थांचा कारभार पारदर्शक करणे,इ. महत्वाच्या विषयांचा समावेश होता.
सरकारने राज्यातील मासेमारी व्यवसायासंदर्भात उचलेले हे महत्वाचे पाऊल असून भविष्यात सागरी मासेमारी व्यवसायासोबत गोड्या पाण्यातील मासेमारीलाही सुगीचे दिवस येतील,अशी अपेक्षा आहॆ.आपले राज्य व केंद्र सरकार कृषी क्षेत्रातील सुधारणाना जेवढे महत्व देते,त्या तुलनेत मासेमारी क्षेत्र कायम उपेक्षितच राहिले.त्यामुळे याविषयी नुकतीच झालेली आढावा बैठक,हे एक सकारात्मक पाऊल ठरावे.मत्स्यविभागाचे सचिव यांनी या बैठकीत सविस्तर माहिती सादर केली.त्यामध्ये प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना,समुद्रात होणारे ड्रोनद्वारे सर्वेक्षण,व्यवसायाला देण्यात येणारे अनुदान व सोयी-सुविधा,याचा समावेश होता.त्यावर अत्यंत उपयुक्त अशी चर्चा झाली.मात्र या आढावा बैठकीत राज्यातील मत्स्यव्यवसायाला केंद्रसरकारच्या कृषी दर्जा देण्याच्या पार्श्वभूमीवर काय करता येईल,यावर विचारविनिमय व्हायला हवा होता.तसेच समुद्रात सतत बदलणारे हवामान,समुद्रात होणारे प्रदूषण,समुद्राक्षेत्रात वाढत असलेले तेलक्षेत्र,लादण्यात येणारे विनाशकारी प्रकल्प व त्याचे समुद्रधनावर होणारे विपरीत परिणाम,याविषयी चर्चा होण्याची गरज होती.मात्र गोड्या पाण्यातील मासेमारी वाढावी,यासाठी करण्यात येणारे प्रयत्न हे स्तुत्य असे असून सरकारने त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.जर तसं घडलं तर मासेमारी क्षेत्रात क्रांती होऊ शकेल.


