- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?” खूप दिवसानंतर आज पुन्हा मी एका राजकीय उलथापालथीवर लेख लिहीत आहेत. मी अनेकदा लिहीत आलो की राजकारणात कधीही काहीही घडू शकते. कारण, राजकारणात कोणीच कोणाचे नसते.आज राज्यस्तरावर जे काही घडत आहे,तसाच काहीसा प्रकार ठाणे जिल्हा मध्य.सह.बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीतही आपल्याला पाहायला मिळत आहे. आजच्या घडीला राजकारणात ” स्वार्थ,” हा नातेसंबंधाच्या सतत आड येऊ लागला आहे. त्याचा अनुभव वसई – विरार भागात पावलोपावली अनुभवायला मिळत आहे. काल या निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या सभेत पक्षाचे सर्वेसर्वा माजी आ.हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या भाषणात तीव्र संताप व्यक्त केला.या संतापाचे कारण होते,त्यांचा भाचा,पक्षाचा माजी…
दीपक मोहिते, फ्रँटलाईन, देशात श्रीमंत – गरीब दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक… स्वातंत्र्यानंतर भारतात लोकशाही यशस्वीरीत्या रुजली आणि ती सातत्याने परिपक्व होत आहे, असे अनेक घटनातज्ञाचे म्हणणे आहे. मात्र समाजात सध्या जी आर्थिक व सामाजिक विषमता पाहायला मिळत आहे, त्यावरून आपल्या देशात लोकशाही व्यवस्था अपेक्षेनुसार रुजू शकली नाही, असेच म्हणावे लागेल. गेल्या आठ दशकाच्या काळात श्रीमंत व गरीब यांच्यामधील दरी सतत रुंदावत गेली.जगात अनेक देश आपल्या लोकशाहीचे गोडवे गात असतात. पण, प्राप्त परिस्थिती लक्षात घेता गेल्या काही वर्षात लोकशाहीच्या आडून आपण एकाधिकारशाही स्विकारल्याचे पाहायला मिळत आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सध्या नरेंद्र मोदी या…
दीपक मोहिते, फ्रंटलाईन, यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला… जून महिना संपत आला तरी अद्याप मान्सूनचा पत्ता नाही. त्यामुळे राज्याच्या शहरी व ग्रामीण भागात सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्याची जी काही चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, ती अल निनोच्या प्रभावामुळे असे हवामान तज्ञाचे म्हणणे आहे. राज्यात केवळ २३ % टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी हा आकडा ३२ % इतका होता. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यावर फार मोठे संकट येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. पाऊस रखडल्यामुळे सरकारकडून पाणीकपातीचे संकेत देण्यात आले आहेत. राज्याच्या अनेक शहरात २० % पाणी कपात करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे सरकारने शहरी भागातील नागरिकांना पाणी जपून…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” सेनेच्या वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र,” आज १९ जून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा ६० वा वर्धापनदिन साजरा करण्यात येत आहे.त्याचवेळी त्यांच्या पक्षाचे सहा खासदार शिंदे गटाच्या तंबूत दाखल झाले आहेत. ही घटना उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी ठरली आहे. दुसरीकडे शिवसेनाही ( शिंदे गट ) त्याच दिवशी आपला वर्धापनदिन साजरा करत आहे.निवडणूक आयोगाने तीन वर्षांपूर्वी ( १७ फेब्रु.२०२३ ) रोजी एकनाथ शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता दिली व कालांतराने सेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हही त्यांना बहाल केले.अशा सर्व परिस्थितीमध्ये हे दोन्ही पक्ष आपापले वर्धापनदिन साजरा करत आहेत.या चार वर्षाच्या काळात एकनाथ शिंदे यांनी…
दीपक मोहिते, फ्रंटलाईन, तुझ्या गळा,माझ्या गळा, गुंफू कोट्यांच्या माळा, महाराष्ट्र व प.बंगाल या दोन राज्यात सध्या फोडाफोडीच्या राजकारणाला चांगलाच वेग आला आहे. केंद्र व राज्यस्तरासोबत जिल्हा,तालुका व ग्रामस्तरावर देखील या प्रकाराला अक्षरशः उत आला आहे. अशा या गैरप्रकाराला राजकीय पक्ष मिशन लोटस व टायगर मिशन,अशी गोंडस नांवे देत असतात. कमळ हे चिखलात उगवत असले तरी ते आपल्या पाकळ्याना कधी चिखल लागू देत नाही, पण भाजपने ते आता चिखलाने पार माखून टाकले आहे. टायगर ( वाघ ) हा एकेकाळी जंगलावर आपले वर्चस्व राखून असायचा, आज त्या टायगरला जंगलात राहणे कठीण झाले आहे. त्यामुळे तो नागरी वस्तीमध्ये मुक्तसंचार करू लागला आहे. जंगलात…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” १९८० चा अटलबिहारी वाजपेयी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही… ” सत्तेसाठी काय पन,” सध्या या वाक्याचा आपण पावलोपावली अनुभव घेतोय. ज्या ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा भारतीय राजकारणात दबदबा होता, तो नुकत्याच झालेल्या पराभवानंतर ओसरत चालला आहे. बंगालची शेरनी आणि भावी पंतप्रधान म्हणून सतत गुणगान गाणारे त्यांचे सहकारी आता त्यांना सोडचिट्ठी देत आहेत. दोन महिन्यांपूर्वी जे भाजपला लाखोली वाहत होते, ते आज भाजपच्या तंबूत विसावले आहेत. सयानी घोष या ममता बॅनर्जी अत्यंत विश्वासू सहकारी, त्यांनी या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसची खिंड एकट्याने लढवली. मुळात प.बंगालच्या सिनेजगतातील त्या नावाजलेल्या पार्श्वगायिका व अभिनेत्री, ममता बॅनर्जी यांनी त्यांना राजकारणात आणले…
दीपक मोहिते, ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे… गेल्या काही दिवसापासून ” अल निनो,” ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. हे अल निनो म्हणजे नक्की काय ? त्याची जगभरात इतकी दहशत का आहे ? या दोन प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. अल निनो हा एक स्पॅनिश शब्द असून त्याचा शब्दशः अर्थ आहे ” लहान मुलगा किंवा बाल येशू,” असा आहे. दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि इक्वाडोर या दोन देशाच्या किनारपट्टीवर ख्रिसमसच्या दरम्यान तप्त असा सागरी प्रवाह येतो. हे पाणी जेंव्हा उष्णतेचे उच्चतम पातळी गाठते, तेंव्हा जागतिक स्तरावर हवामान बदलत असते. या अल निनो च्या प्रभावामुळे…
दीपक मोहिते, केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत, नीट पेपर फुटीवरून सध्या देशभरात वादळ उठले आहे. सरकारला शिक्षण, उद्योग, व्यापार, कृषी व रोजगार क्षेत्रात आलेले अपयश लक्षात घेता तरुण वर्गात सरकारविरोधात प्रचंड चीड निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. बेरोजगारीमुळे देशातील सुमारे २ कोटी तरुण सध्या नैराश्यात सापडले आहेत. शेतमालाला किमान हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकरीवर्गही संताप व्यक्त करत आहे. दुसरीकडे शिक्षण क्षेत्राची मोठ्या प्रमाणात अवहेलना होत असल्यामुळे विद्यार्थी देखील आता आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून शिक्षण व्यवस्थेची रया पार बिघडून गेली आहे. पेपर फुटणे, हे आपल्या पाचवीला पुजले आहे. मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने…
दीपक मोहिते, इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला, इराण – अमेरिका व इराण दरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या मागे अनेक कारणे आहेत. आखाती देशातील खनिज तेलाचा विपुल साठा व पॅलेस्टाईनच्या भूमीवरून मूळ निवासी असलेल्या अरबाची हकालपट्टी, अशी दोन कारणे असली तरी गेल्या काही वर्षात इराणची अणुबॉम्ब तयार करण्याच्या दिशेने सुरू झालेली वेगवान वाटचाल हे मुख्य कारण आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हट्टाला पेटले आहेत. इराणच्या या कथित अणुबॉम्बची सर्वाधिक भिती इस्त्रायलला आहे. त्यामुळे इस्त्रायल हा गेल्या अनेक वर्षांपासून मध्यपूर्वेतील मुस्लिम राष्ट्रविरोधात अमेरिकेला सतत उसकावत असतो. अमेरिकेची अर्थव्यवस्था गेल्या काही दशकापासून ज्यू उद्योगपतींच्या लॉबीच्या हातात असून ही लॉबी अमेरिकेच्या अर्थ,व्यापार,उद्योग व…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” महिलांना डावलणे ; ” देवाभाऊ,” चे ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण, गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने ” लाडकी बहीण, ” योजना कार्यान्वित करून विरोधी पक्षाचे सारे मनसूबे धुळीला मिळवले. दरमहा २ कोटी ४० लाख महिलांच्या बँक खात्यात १५०० /- रु. जमा करून महायुतीने. निवडणुकीत महाविकास आघाडीचा निवडणुकीत अक्षरशः पालापाचोळा केला. या धक्यातून विरोधक अद्याप स्वतःला सावरू शकलेले नाहीत. त्या निवडणुकीत राज्यातील समस्त महीला मतदारांनी महायुतीला डोक्यावर घेतले. महिलांचा मिळालेला उदंड प्रतिसाद लक्षात घेऊन महायुतीने “नारीशक्ती,” ” मातृवंदना,” ” लाडकी बहीण,” अशा गोंडस शब्दाचा वापर करत महायुती सरकार महिलांच्या सक्षमीकरण करत असल्याचा दावा करू…
