Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” नैसर्गिक संकट,” पालघर जिल्ह्याला दुष्काळ यादीतून का वगळले ? शेतकऱ्यांचा आक्रोश, राज्य सरकारने २६ सप्टें. २०२६ रोजी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती ( ट्रिगर -१ ) जाहीर केली. या यादीत ठाणे विभागातील १२ तालुके आहेत.रायगड ( श्रीवर्धन १ ), रत्नागिरी ( ३ ) आणि सिंधुदुर्ग ( ८ ). ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नाही. सरकारने महाराष्ट्र दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार निकष लावला आहे. जून ते सप्टें.या खरीप हंगामात पर्जन्यमानात १८% पेक्षा जास्त तूट असणे आवश्यक होते.पालघर जिल्ह्यात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे सरासरी आकडेवारीवर तूट १८ % पेक्षा कमी दाखवण्यात आली. त्यामुळे…

Read More

दीपक मोहिते, राज्याच्या धरणातील पाण्याची स्थिती चिंताजनक, राज्यातील एकूण ९२९ मोठ्या धरणांमध्ये सरासरी फक्त ४४ % पाणीसाठा शिल्लक आहे, गेल्या वर्षी आजच्या दिवशी हा साठा ९०.५५ % इतका होता. त्यामुळे राज्यात यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण होईल, अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. मराठवाडा विभागात सर्वात गंभीर परिस्थिती असून यंदा फक्त २९ % पाणीसाठा शिल्लक आहे.गेल्यावर्षी तो ८५.८६ % इतका होता. बीड जिल्ह्यात पाणीसाठा तर १६.३८ % पर्यंत खाली आला आहे. विदर्भ विभागातील अमरावती – ६२.९२ %, नागपूर – ७२ %, गेल्या वर्षी तो ८५ ते ८९ % इतका होता. पुणे जिल्ह्याच्या खडकवासला साखळी धरणात ९१.९४ % असला तरी पुणे शहरात…

Read More

दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन, ” आपण कुठे निघालो आहोत ? मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा सरकारने राजीनामा घ्यावा, यासाठी कॉक्रोच जनता पार्टी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गेल्या चार दिवसापासून दिल्लीत जोरदार आंदोलन चालवले आहे. हे आंदोलन चिरडण्यासाठी मोदी सरकार कठोर उपाययोजना करत आहे. पण आंदोलक मात्र दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आंदोलन दडपून टाकण्यासाठी उपाययोजना करताना मोदी सरकारकडून अनेक चुका झाल्या. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी सरकारचे कान चांगलेच उपटले. आंदोलक दिल्लीत दाखल होऊ नये, यासाठी सरकारने तब्बल ४५ मेट्रो रेल्वे स्थानके बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सरकारच्या चांगलाच अंगलट आला. सरकारच्या या निर्णयाबाबत…

Read More

दीपक मोहिते, पालघर जिल्ह्याचा गौरव, संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेसाठी खा.डॉ.हेमंत विष्णू सवरा यांची निवड, भारत सरकारतर्फे १९ ते २३ ऑक्टो.२०२६ दरम्यान न्यूयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ८१ व्या सत्रासाठी पाठवण्यात येणाऱ्या २० खासदारांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळात पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांची विशेष निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची ही अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या शिष्टमंडळात देशभरातील निवडक आणि अभ्यासू खासदारांचा समावेश करण्यात आला असून, त्यामध्ये डॉ. हेमंत सवरा यांना स्थान मिळणे, ही पालघर जिल्ह्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. या दौऱ्यात ते संयुक्त राष्ट्रसंघात होणाऱ्या विविध जागतिक विषयांवरील चर्चा,…

Read More

दीपक मोहिते, शिवसेना नांव व चिन्हाचा वाद ; न्यायाला विलंब म्हणजे न्याय नाकारण्यासारखेच चार वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडून शिवसेना ( उबाठा ) व शिवसेना ( शिंदे ) असे दोन निर्माण झाले. त्यानंतर पक्षाचे चिन्ह व नांव यावरून या दोन्ही गटात तीव्र संघर्ष निर्माण झाला. सदर प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोग व सभापती राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवले. या दोघांनी सदर प्रकरणी पक्षपात केल्यामुळे सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला आले आहे. लवकरच या प्रकरणाचा निकाल लागेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दोन महिन्यापासून खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुरू झाली आहे आणि न्यायालयाने नुकतेच म्हटले आहे. या प्रकरणात उशीर…

Read More

दीपक मोहिते, संसदेत घटनादुरुस्ती केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणे कठीण ; हट्टीपणामुळे आरक्षणाची लढाई भरकटली, कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचे आंदोलन सध्या निवांत झाले आहे. मात्र आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा कधी उचकी लागेल, हे सांगता येत नाही. मात्र या आंदोलनाला पूर्वीसारखी आता गर्दी होत नाही.कारण, समाजाच्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे, असे सतत पालूपद लावणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचे हे आंदोलन आता हायटेक होत चालले आहे. दस्तूरखुद्द जरांगे पाटील हे आता आलिशान अशा डिफेन्डर कारमधून हिंडू लागले आहेत.त्यामुळे त्यांचे हे आंदोलन भरकटत चालले आहे.या संपूर्ण वाटचालीत जरांगे पाटील यांनी कधीही कायदेशीर बाजू नीट समजून घेतली नाही.त्यामुळे…

Read More

दीपक मोहिते, सरकारने समंजसपणा दाखवायला हवा, चर्चेचे दरवाजे त्वरित उघडायला हवेत, देशात बदलत चाललेल्या वातावरणामुळे देश विस्कळीत होण्याच्या मार्गांवर आहे. मोदी सरकारने, देशभरात पेटलेला वणवा अधिक पसरू नये, यासाठी ताठरपणा सोडून विद्यार्थ्याशी चर्चा करायला हवी. अन्यथा देशातील या अशांत परिस्थितीचा फायदा इतर देश घेऊ शकतात.आजच्या घडीला अमेरिका हा पाताळयंत्री देश आपल्या शत्रूराष्ट्राला हाताशी धरून कारवाया करू पाहत आहे.त्यामुळे या आंदोलनात सरकारने दोन पावले मागे जात विद्यार्थ्यांच्या नेत्यांशी खालील विषयी चर्चा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, १ ) विद्यार्थ्याशी चर्चा करणे, २ ) मुख्य निवडणूक आयुक्ताचा राजीनामा घ्यावा, ३ ) शिक्षण व्यवस्थेतील बजबजपुरी दूर करून सुधारणा करावी, ४ ) इंदिरा गांधी यांनी अशाच…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” क्रीडासंकुल व नाट्यगृह ; अद्याप १५ ते २० % कामे अपूर्णांवस्थेत… वसई – विरार शहर महानगरपालिकेचे विरारस्थित क्रीडा संकुल व नालासोपारा पूर्व भागातील नाट्यगृह,या दोन्ही विकासकामाचे काम अपूर्ण असताना नुकतेच संघर्षपूर्ण वातावरणात उदघाट्न करण्यात आले. या दोन्ही विकासकामाचे श्रेय उपटण्यासाठी सत्ताधारी बहुजन विकास आघाडी व भाजप या दोन्ही पक्षाच्या लोकांनी जो हावरटपणा दाखवला, त्यामुळे या सुशिक्षित नगरीतील नागरिकांची मान शरमेने खाली गेली. या दोन्ही विकासाकामाचे ३ ऑक्टो. रोजी उदघाट्न झाले असले तरी अद्याप १५ ते २० % कामे अपूर्णांवस्थेत आहेत. हे दोन्ही प्रकल्प तब्बल १४ वर्षे रखडली होती, या काळात एकाही राजकीय पक्षाने या प्रकरणाला…

Read More

दीपक मोहिते, २८० लाभार्थ्यांच्या ₹२३.८० कोटींच्या भरपाई वितरण प्रक्रियेस प्रारंभ, पालघर जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी तसेच प्रकल्पबाधित लाभार्थ्यांना भरपाईची रक्कम जलद, पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीने वितरित करण्याच्या उद्देशाने युनियन बँक ऑफ इंडियाच्या युनीपे प्लस प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. कोकण विभागीय आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत या प्रणालीद्वारे २८० लाभार्थ्यांच्या एकूण ₹२३.८० कोटी रु.च्या भरपाई वितरण प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला. या बैठकीस पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, डहाणूच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती अनन्या रेड्डी, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी तेजस चव्हाण, पालघरचे उपविभागीय अधिकारी श्याम मदनुरकर, सर्व उपजिल्हाधिकारी तसेच…

Read More

दीपक मोहिते, कॉक्रोच आंदोलन ; सर्वोच्च न्यायालयात सरकार पराभूत, कॉक्रोच जनता पार्टीच्या अनेक नेत्यांना सरकारने गजाआड केले असले तरी तरुणाचे आंदोलन अद्याप थांबलेले नाही. तुम्ही आमच्यावर कितीही अन्याय करा, पण हे आंदोलन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देईपर्यंत चालूच राहणार असल्याचे आंदोलकांनी जाहीर केले आहे. त्यामुळे हे आंदोलन अधिक काळ चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या कृतीवर कडक ताशेरे ओढले आहेत.त्याला उत्तर देतांना केंद्र सरकारचे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता अडचणीत आल्याचे पाहायला मिळाले. सरकारच्या दडपशाही विरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी झाली असता सरन्यायधीश सूर्यकांत, न्या. जॉयमाल्या व न्या. व्ही. मोहाना यांच्या खंडपीठाने सरकारच्या कृतीवर नाराजी व्यक्त…

Read More