- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- राज्य कर्जाच्या खाईत आखंड बुडाले आहे…
- शेतकरी कंगाल तर विमा कंपन्या मालामाल…
- नालासोपाऱ्याचा बकालपणा कायम, विद्यमान आमदार निष्क्रिय,
- भविष्यात पर्यावरणाचा प्रश्न अधिक गंभीर होणार आहे…
- ५०० कोटीचा आरोप ; रामदास कदम यांचा शिंदे यांची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न,
- नालासोपारा येथे घडलेले लव जिहाद प्रकरण ; पोलीस यंत्रणेचे दारुण अपयश,
- वसईचे राजकीय चित्र बदलतंय…
- रिझर्व्ह बँकेने सोने विकले नाही, उलट सोन्याच्या साठ्यात वाढ झाली,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, घडलंय बिघडलंय, राज्य कर्जाच्या खाईत आखंड बुडाले आहे… आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती भक्कम असल्याची ग्वाही सत्ताधारी मंडळी सतत देत असले तरी प्रत्यक्षात राज्याचे चित्र मात्र भयावह असेच आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे राज्य सरकारला सुमारे ३०५ तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा लागला आहे. गेल्या पाच वर्षात महायुती सरकारने राज्याच्या हिताला बाधा आणणाऱ्या अनेक योजना सुरु केल्या. त्यामुळे राज्याची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली गेली. आपल्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालावर नजर टाकल्यास आपले राज्य कर्जात कसे आखंड बुडाले आहे, हे पाहायला मिळते. २०२५-२६ च्या अहवालानुसार राज्यावर असलेले कर्ज ९.३२ लाख कोटी रु.वर गेले आहे. हे कर्ज २०२६-२७ मध्ये ११.०२ लाख…
दीपक मोहिते, हल्लाबोल,” ” शेतकरी कंगाल तर विमा कंपन्या मालामाल… विमा क्षेत्रात पूर्वी पंतप्रधानमंत्री फसल बिमा योजना पूर्णपणे सरकारी होती. २०१६ मध्ये मोदी सरकारने खाजगी विमा कंपन्यांना रान मोकळे करून देण्याचा निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांच्या गळ्याला फास लागला. शेतकऱ्यांना परतावा देण्यास,या विमा कंपन्यांची मानसिकता नसल्यामुळे राज्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून हवालदील झाला आहे.या प्रश्नी राज्य सरकारही डोळ्यावर कातडे ओढून बसले आहे.यंदा दुष्काळामुळे तर ग्रामीण भागात हाहाकार उडाला आहे.त्यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.विमा योजनेचा मूळ उद्देश चांगला होता.शेतकऱ्यांनी २ % ( खरीप )आणि १.५ % ( रब्बी ) प्रीमियम भरायचा उरलेला ९० % पेक्षा अधिक केंद्र व राज्य…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” नालासोपाऱ्याचा बकालपणा कायम, आमदार निष्क्रिय १३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघ हा विविध कारणामुळे सतत चर्चेत असतो. या मतदारसंघाची निर्मिती होऊन दीड दशकाचा काळ लोटला, पण येथील नागरिकांना अद्याप मोकळा श्वास घेता आला नाही, तसेच शहराचा बकालपणाही दूर होऊ शकला नाही. अनधिकृत बांधकामे, फेरीवाले, रिक्षा, अमली पदार्थाची बेसुमार विक्री, हत्या, अपहरण, लव जिहाद, बलात्कार, चोऱ्या व खंडणी वसुली असे गैरप्रकार येथील नागरिकांच्या पाचवीला पुजली आहेत. पायभूत सुविधाचा अभाव ( पाणी टंचाई, कचरा निर्मूलन, वाहतूककोंडी, अनधिकृत फेरीवाले व रिक्षावाले व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा मनमानी व भ्रष्ट कारभार ) अशा कारणामुळे नागरिक त्रस्त आहेत. या विधानसभा मतदारसंघातून २००९, २०१४ व २०१९…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” भविष्यात पर्यावरणाचा प्रश्न अधिक गंभीर होणार आहे… जगभरात अल निनो संकटामुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तापमान सतत वाढत आहे, त्याचा परिणाम कृषी क्षेत्रावर जाणवू लागला आहे. जगातील सर्व देशांनी ग्लोबल वॉर्मिंगचा चांगलाच धसका घेतला आहे. अशावेळी आपण मात्र विविध प्रकल्पासाठी झाडांची कत्तल करत आहोत. या वृक्षतोडीसाठी राष्ट्रीय हरित लवाद बेसुमार परवानग्या देत सुटले आहे. स्थानिक लोकांचा सरकारच्या या धोरणाला विरोध आहे. स्थानिक ग्रामपंचायती, ग्रामसभा यांना डावलून सरकार हा गैरप्रकार करत आहे. पालघर जिल्ह्यात ३८ हजार ९०५ व रायगड जिल्ह्यात ३२ हजार ४९० अशी एकूण ७१ हजार ३९५ झाडे तोडण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने परवानग्या दिल्या…
दीपक मोहिते, ” राजकीय उलथापालथी,” ५०० कोटींचा आरोप ; रामदास कदम यांचा शिंदेची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न, जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटीच्या व्यवहार प्रकरणी आरोप केल्यानंतर रामदास कदम चांगलेच पिसाळले. एवढे पिसाळले कि त्यांना आपण काय बरळत आहोत, याचे भान देखील राहीले नाही. आज त्यांनी शिंदे यांची भेट घेऊन माझ्याशिवाय इतर कोणीही तुमची बाजू भक्कमपणे मांडली नाही, अशी शेखी मिरवली. त्यावर शिंदे कसे रिऍक्ट झाले ते मात्र कळू शकले नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले रामदास कदम हे गेल्या दहा वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून बाहेर फेकले गेले आहेत. बाळासाहेबांच्या जाण्यानंतर पक्षाची सूत्रे उद्धव ठाकरे…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” नालासोपारा येथे घडलेले लव जिहाद प्रकरण ; पोलीस यंत्रणेचे दारुण अपयश, नालासोपारा शहरातील वाढती गुन्हेगारी व कायदा / सुव्यवस्थेची ढासळती स्थिती, यावर आजवर बरंच काही लिहिले गेले. पण, त्याची दखल शासकीय यंत्रणांनी कधीही घेतली नाही. पण, नवरात्रोत्सव काळात नुकतेच घडलेल्या लव जिहाद प्रकरणाने पोलीस, स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली गेली. १२ ऑक्टो. रोजी नालासोपारा पोलीस ठाण्यात २३ वर्षे वयाच्या हिंदु तरुणीने तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरीफ अयुब शेख – २२, ( जिम ट्रेनर ) त्याची आई रुखसाना खान व त्याचा मावस भाऊ साहिल खान या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. मैत्री व…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” वसईचे राजकीय चित्र बदलतंय, वसई व नालासोपारा मतदारसंघाचे राजकीय चित्र आता बदलत चालले आहे. वर्ष – दीड वर्षांपूर्वी येथील मतदारांनी या दोन मतदारसंघात जे परिवर्तन घडवून आणले, आज त्यांच्यावर पश्चाताप करण्याची पाळी आली आहे. बहुजन विकास आघाडीच्या कारभाराला कंटाळून येथील मतदारांनी भाजपला डोक्यावर घेतले. पण आज त्याच मतदारांवर कपाळावर हात मारून घ्यायची पाळी आली आहे. वसईच्या आ. स्नेहा दुबे पंडित यांनी आपल्या सुरवातीच्या कारकिर्दीत वसईच्या विकासाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. त्यानंतरच्या काळात त्या राज्य पातळीवरील राजकारणात वावरू लागल्या. त्यामुळे त्यांचा आपल्या मतदारसंघाशी फारसा संपर्क राहीला नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना धोका होण्याची शक्यता आहे. वसईचा मतदार…
दीपक मोहिते, रिझर्व्ह बँकेने सोने विकले नाही, उलट सोन्याच्या साठ्यात वाढ झाली, एका वृत्तवाहिनीने गेल्या मे महिन्यात, रिझर्व्ह बँकेने १२ अब्ज डॉलर्स किमतीचे सोने विकले व ७.५ बिलियन विदेशी चलन मालमत्ता खरेदी केली, जेणेकरून डॉलर्सची किंमत १०० रु. च्या आत राहील, असा दावा केला होता. याविषयी रिझर्व्ह बँकेने सदर वृत्त निखालस खोटे असल्याचा खुलासा केला आहे. बँकेने प्रेस रिलीज काढून सांगितले कि ” सोने विक्रीच्या बातम्या बरोबर नाहीत. आपल्याकडे भौतिक सोन्याचा साठा ८८०.५२. टन इतकाच कायम आहे. बँकेच्या खुलाश्यानंतर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेकने पण या बातमीला ” फेक, ” असे म्हंटले आहे. रिझर्व्ह बँकेच्या २०२५ – २६ च्या वार्षिक…
दीपक मोहिते, विशेष सखोल पुनरीक्षण अंतर्गत कामकाजाचा आढावा, महाराष्ट्र राज्याचे अप्पर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली शनि.२४ ऑक्टो.२०२६ रोजी वसई-विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात पालघर जिल्हा तसेच वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने संबंधित निवडणूक यंत्रणेच्या कामकाजाबाबतची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी पालघर जिल्हा आणि वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती जाणून घेतली. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती, मतदारयादी पुनरीक्षणाशी संबंधित कामकाज, दावे व हरकती दाखल करण्याच्या टप्प्यात प्रलंबित नमुने तसेच मतदारांना बजावण्यात येणाऱ्या नोटिशीं बाबतची…
दीपक मोहिते, ” स्पॉटलाईट,” युरोपमधील आंदोलनामागे स्थलांतरण व बेरोजगारी ही दोन कारणे, अनेक दशके शांत राहिलेला युरोप सध्या धुमसत आहे. या महिन्यात फ्रान्स, इटली, स्पेन, पोर्तुगाल, बेल्जियम, अल्बेनियामध्ये आंदोलने सुरू झाली आहेत. या आंदोनावर नियंत्रण आणण्यात या देशाच्या सरकारांना अद्याप यश आलेले नाही. गेल्या पंधरा दिवसात अब्जावधी रु. चे नुकसान झाले. या आंदोलनामागे एकच कारण नाही, तर अनेक कारणांचा एकत्रित स्फोट झाला आहे. जगण्याच्या खर्चाचा स्फोट, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. याविषयी प्रसिद्ध झालेल्या अहवालात वाढते इंधन दर, घरभाडे परवडत नसणे, शिक्षण आणि सार्वजनिक सेवांची घसरण इ. महत्वाची कारणे आहेत. स्पेन – पोर्तुगालमध्ये तर लोकांनी भाडेवाढी विरोधात तंबू ठोकून आंदोलन…
