दीपक मोहिते,
घडलंय बिघडलंय,
२०२९ ची निवडणूक जिंकणे भाजपला कठीण,
सोळा वर्षांपूर्वी म्हणजे २०१० सालापासून तत्कालीन डॉ. मनमोहनसिंग सरकारचा महागाई, भ्रष्टाचार व बेरोजगारी आदी प्रश्नावरून डाऊनफॉल सुरु झाला होता. त्यामुळे २०१४ साली डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर आता म्हणजे बारा वर्षांनी मोदी सरकारवर तशीच पाळी आली आहे. त्यांच्या या डाऊनफॉल मागची नेमकी कारणे काय आहेत, त्यावर आपण एक नजर टाकूया.
मोदी सरकारची ज्या वेगाने पीछेहाट सुरु झाली आहे, त्यामागे महत्वाची सात ते आठ कारणे आहेत.
कारण क्र. १ – नितीन गडकरी यांचे इथेनॉल प्रकरण, भारतीय जनतेमध्ये प्रचंड असंतोष खदखदतोय.
कारण क्र.२ – तीन वर्षांपूर्वी दिल्लीत झालेले शेतकऱ्यांचे आंदोलन व हे आंदोलन दडपण्यासाठी मोदी सरकारकडून झालेले प्रयत्न, या आंदोलनात हजारो शेतकऱ्यांचा बळी गेला. त्यामुळे मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचे संकेत शेतकऱ्यांमध्ये गेले.
कारण क्र. ३ – नोटबंदी, या नोटबंदीमुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. या नोटबंदीचा लहान उद्योगधंद्याना जबर फटका बसला. महाराष्ट्रातील सुमारे ३६ हजार लघुउद्योगाना टाळी लागली.
कारण क्र. ४ – बेरोजगारी, गेल्या बारा वर्षात बेरोजगाराच्या संख्येत प्रचंड वाढ झाली, त्यामुळे तरुणवर्ग आज विमनस्क स्थितीत सापडला आहे.
कारण क्र.५ – सार्वजनिक उपक्रम, उद्योगपतीच्या घश्यात घालण्याचे मोदी सरकारचे धोरण, संरक्षण विभागाची कंत्राटे खाजगी कंपन्याना बहाल करणे,
कारण क्र.६ – सतत होणारी पेपरफुटी, शिक्षणमंत्र्यांवर राजीनामा देण्याची नामुष्की,
कारण क्र.७ – निवडणूक आयोगाचा गोंधळी कारभार कोट्यावधी मतदारांची नावे वगळणे ( एकट्या प. बंगालमध्ये १३ कोटीहुन अधिक मतदार वगळले )
कारण क्र. ८ – महागाईवर मोदी सरकारचे बिलकुल नियंत्रण नसणे, गेल्या बारा वर्षात महागाई २५० % हुन अधिक वाढली. त्यामुळे सर्वसामान्य नोकरदार व गरीब यांचे प्रचंड हाल झाले.
आज समाजातील प्रत्येक घटक महागाईमुळे मेटाकुटीला आला आहे. हे सरकार प्रत्येक क्षेत्रात अपयशी झाले असून त्यांना आता बदल हवा आहे.त्यामुळे २०२९ ची निवडणूक भाजपला फार कठीण आहे. ज्या मुख्य निवडणूक आयुक्तानी लोकशाही प्रणाली पायदळी तूडवली, त्या आयुक्ताना मोदी सरकार पाठीशी घालते, त्यामुळे भारतीय जनतेमध्ये भाजप विरोधात वातावरण तयार होत चालले आहे.

