दीपक मोहिते,
राज्यावर भीषण पाणीटंचाईचे सावट,धरणातील पाणीसाठा खालावत चालला आहे,
राज्याच्या तलावातील पाण्याची स्थिती चिंताजनक असुन यंदा जनतेला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.उन्हाळ्याची तीव्रता वाढताच राज्याच्या धरणांतील पाण्याची पातळी खालावत चालली आहे.मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांतच राज्यातील सुमारे साडेतीन हजार मोठ्या आणि मध्यम आकाराच्या धरणांतील पाणीसाठा ५१ टक्क्यांवर आला आहे.
पुढील काही दिवसांत उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन महिन्यांत महाराष्ट्रावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.फेब्रु.च्या अखेरीस सुरू झालेल्या उन्हाच्या कडाक्याने पाण्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे.धरणांतील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवनही होत आहे.परिणामी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत चालली आहे.पावसाळ्याला अद्याप तीन महिने बाकी आहेत,त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यावर नागरिकांना आपली तहान भागवावी लागणार आहे.धरणातील पाणीसाठा खालावल्यानंतरच राखीव कोट्यातील पाणीसाठ्याचा वापर केला जातो.दरम्यान राज्याच्या धरणांमध्ये सध्या किती जलसाठा आहे पाहू या.
सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांत एकूण ४२ टक्के म्हणजेच ६ लाख १६ हजार ५५४ दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे. मोडक सागर धरणाची पाणीसाठवण क्षमता १ लाख २८ हजार ९२५ दशलक्ष लिटर आहे.आता यामध्ये २२ टक्के म्हणजेच २९ हजार २०१ दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे.तानसा धरणाची साठवण क्षमता १ लाख ४४ हजार ८० दशलक्ष लिटर आहे.यामध्ये सध्या ५० हजार ६२९ दशलक्ष लिटर म्हणजेच ३४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
राज्यातील धरणांचा १५ मार्चपर्यंत पाणीसाठा,
कोयना
६३.६४ टक्के,
तिलारी
४४.२३ टक्के,
गंगापूर
७१.४२ टक्के,
जायकवाडी
६२.१७ टक्के,
राधानगरी
६५.०७ टक्के,
पानशेत
५५.०८ टक्के,
खडकवासला
७०.०१ टक्के,
नागपूर विभागातील पाणीसाठा
नागपूर
४८.८३ टक्के,
अमरावती
५७.३९ टक्के,
नाशिक
५२.८९ टक्के,
पुणे
५२.२२ टक्के
कोकण,
५७.६३ टक्के
छत्रपती संभाजीनगर
५१.११ टक्के,
इतका पाणीसाठा शिल्लक आहे.त्यामुळे राज्यातील प्रमुख शहरासह ग्रामीण भाग यंदा भीषण पाणीटंचाईमध्ये होरपळून निघणार आहे.

