दीपक मोहिते,
” हल्लाबोल, ”
देशाची वाटचाल सध्या आर्थिक संकटातून होत आहे….
देशात आज सर्वत्र अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.सर्वसामान्य नागरिक भांबावलेला स्थितीत सापडलेला आहे.बिकट आर्थिक स्थितीत सापडलेल्या आपल्या देशाला या स्थितीतून बाहेर पडण्यास प्रदीर्घ कालावधी लागणार आहे.कोणत्याही परिस्थितीत सत्ता राखणे,असा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार वाटचाल करत आहे.आजच्या घडीला त्यांच्या सरकारचे आर्थिक व परराष्ट्र धोरण दिशाहीन होऊन हेलकावे खाऊ लागले आहे.
काही मूठभर उद्योगपतीना केंद्र सरकारकडून दिले जाणारे झुकते माप,आपल्या अर्थव्यस्थेच्या गळ्याला नख लावणारे आहे.काँग्रेस सरकारच्या कारकिर्दीत जीएसटीला विरोध करणारा भाजप आपले सरकार सत्तेत आल्यानंतर आपल्या नागरिकांवर भरमसाठ जीएसटी लादतो, याला काय म्हणावे ? मात्र दोन महिन्यापूर्वी याच मोदी सरकारला उपरती होते व त्यांचे अर्थखाते जीएसटी कर आकारणीच्या रचनेत बदल करते.मात्र गेल्या दहा वर्षात जमा झालेली जीएसटीची अब्जावधी रु.च्या रकमांचे काय झाले ? देशात गेल्या दहा वर्षात झालेल्या निवडणुका दरम्यान उद्योगपतीकडून घेतलेल्या देणग्याची उतराई होण्यासाठी मोदी सरकारने हे पाऊल उचलले होते.मोदी सरकारच्या या निर्णयामागे केवळ उद्योगपतींचे हित हेच एकमेव कारण आहे.
घिसाडघाईने घेतलेल्या या भरमसाठ जीएसटी लादण्याच्या निर्णयाचे पडसाद आर्थिक व सामाजिक क्षेत्रावर झाले व ते अनेक वर्षे उमटतील,अशी भिती व्यक्त होत आहे.या सर्वं घडामोडीचे वर्णन ” उद्योगपतीको खुशी और गरीबोंको ढेर सारे गम,”असेच करावे लागेल.आज सर्वसामान्यांचे हाल पाहवत नाहीत,त्याची अवस्था ” भिकारी/कंगाल,” अशी झाली आहे.बेरोजगारी,वाढती महागाई,उद्योगपतीकडून होणारी आर्थिक लूट,अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून होत असलेली आर्थिक कोंडी, त्याचा निर्यातीवर होत असलेले विपरीत परिणाम,त्यामुळे जागतिक स्तरावर आपली पत घसरू लागली आहे.भविष्यात आपल्या देशाची अर्थव्यवस्था विस्कळीत होईल,अशी भिती नामवंत अर्थतज्ञ व्यक्त करत आहेत.मोदी यांच्या सरकारमधील अर्थमंत्री सीतारामन व परराष्ट्रमंत्री जयशंकर,या दोघांचा दिशाहीन कारभार देशाला अडचणीत आणणारा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प,हे आपण भारताचे मित्र असल्याचे भासवत असले तरी ते पाकिस्तानचे कट्टर पाठीराखे आहेत.दुसरीकडे चिनी ड्रॅगन अरुणाचल प्रदेशात आपले हातपाय पसरत आहे.आजच्या घडीला चीनने अरुणाचल प्रदेशात हजारो की.मी.चा भुभाग गिळकृत केला आहे.हे पंतप्रधान मोदी व परराष्ट्रमंत्री जयशंकर या दोघांचे अपयश आहे.परंतु मोदींच्या अंधभक्ताकडून त्याचे कौडकौतुकच होत आहे.या अंधभक्तांनी देशभक्तिची व्याख्याच बदलून टाकली आहे.” मोदीना विरोध म्हणजे देशाला विरोध,” हा नवीन शब्दप्रयोग प्रचलित करण्यात हे अंधभक्त कमी-अधिक प्रमाणात यशस्वी झाले आहेत. या वाक्यावरुन सन १९७५ सालात एका कॉंग्रेस नेत्याने केलेल्या घोषणेची प्रकर्षाने आठवण होते.त्यावेळी इंदीरा कॉंग्रेसचे दिवंगत अध्यक्ष देवकांत बारुआ यानी एक घोषणा दिली होती, ” इंदिरा इज इंडिया,” या घोषणेंनंतर राजकीय क्षेत्रात प्रचंड वादळ उठले,त्यावेळच्या जनसंघाने विरोधी पक्षाच्या सहाय्याने ” न भूतो न भविष्यती,” आकाडतांडव केले होते.आज मात्र नेमके उलटे चित्र पहावयास मिळते.एकेकाळी ” गरीबी हटाव,” चा नारा देणाऱ्या कॉंग्रेसने गरीबालाच वाऱ्यावर सोडले होते,त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आता भाजपाही तेच करत आहे.आश्चर्याची बाब अशी की,आणीबाणीच्या विरोधात ज्या नेत्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते.ते पक्ष सध्या मोदी सरकारचे घटक पक्ष म्हणून भाजप सोबत आहेत.ती मंडळी आता एक अवाक्षरही काढायला तयार नाहीत,यालाच आपण ” काळाचा महिमा,” असे म्हणतो.परंतु या लोकांनी एक लक्षात घ्यायला हवे.देशाच्या राजकीय इतिहासात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधीच्या पाठीलाही माती लागली व अटलबिहारी वाजपेई यांच्या गुढग्यालाही माती लागली होती,नियतीने आजवर कोणालाही अमरपट्टा दिलेला नाही.या सर्व घटनाचा अनुभव घेतल्यानंतर मशहूर शायर मिर्झा ग़ालिब यांचा एक शेर आठवतो.
” मौत तो एक ना एक दिन, सबको आनी है !
आज मेरी,तो कल तेरी बारी है !
हा निसर्गाचा नियम आहे,तो आपल्या सरकारने विसरता कामा नये.

