दीपक मोहिते,
निवडणूक विश्लेषण ( बिहार )
बिहारमध्ये भाजप – जेडीयूचा डंका वाजला,आरजेडी – काँग्रेसचा सुपडा साफ,
अपेक्षेप्रमाणे बिहार राज्यातील निवडणुकीचा निकाल लागला आहे.या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षांचा सुपडा साफ झाला आहे.या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला १९५ जागा मिळाल्या असून त्यामध्ये भाजप – ८९,जेडीयू – ७९, लोकजनशक्ती पक्षाला २१,जागा जिंकता आल्या.तर इतर ०७ जण निवडून आले आहेत.येथे महागठबंधनला ४१ जागा जिंकता आल्या.त्यामध्ये आरजेडी – ३२,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – ०४,विआयपी – ०,सिपीआय – ०,मार्क्स.कम्यु.- ०,सिपीआय ( मार्क्सवादी व लेनिनवादी ) – ०५,या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ५३ % तर महागठबंधनला ३५ % तर अपक्षाना १२ % मते मिळाली.
प्रशांत किशोर यांनी आपल्या जनसुराज पक्षाची निवडणुकी दरम्यान चांगली हवा निर्माण केली होती.पण आज लागलेल्या निकालात त्यांचा बार फुसका निघाला.त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.भाजपने सर्वाधिक जिंकत मुख्यमंत्री पदावरील आपला दावा निश्चित केला आहे.यावेळी बिहारच्या जनतेने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला साफ नाकारले आहे.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी आघाडी करून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या आरजेडीनेही यंदा खराब प्रदर्शन केले.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोबत त्यांनी सोयरीक करणे,हे बिहारी जनतेच्या पचनी पडले नाही,त्यामुळे त्यांना अनेक जागांवर जबर फटका बसला.तर बिहारी मतदारांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अवस्था पार बिकट करून टाकली.जनसुराज पक्षाची या निवडणुकीत पार दैनावस्था झाली.त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.
या निवडणुकीच्या निकालाचे पडसाद महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निकालावर उमटण्याची दाट शक्यता आहे.
टीप – सदर आकडेवारी
दु.१.०० वाजेपर्यंतची आहे…

