दीपक मोहिते,
शुद्ध नालायकपणा…
सारं काही संपल्यात जमा..भाजप नेते विनोद तावडे तावडीत सापडले,
निवडणुकीची आचारसंहिता पूर्व व ती लागू झाल्यापासून राज्याच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पैश्याचा ओघ सुरू झाला आहे. हा पैसा कोण व कशासाठी पाठवण्यात हे आता लपून राहिलेले नाही.गेल्या महिन्याभरात राज्यात सुमारे एक हजार कोटीहून अधिक रकमा जप्त करण्यात आल्या आहेत.पालघर जिल्ह्यात तर गेल्या काही दिवसात २५ कोटी रु.पकडण्यात आले.हा सारा पैसा शेजारच्या गुजराथ व केंद्रशासित प्रदेशातून येत असतो.
आज विरार पूर्व भागात नव्याने सुरू झालेल्या विवांता हॉटेलमध्ये दिवसाढवळ्या भाजपचे लोक पैसावाटप करत असल्याची माहिती मिळाली.त्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हॉटेलवर हल्लाबोल करत भाजपच्या लोकांना रंगेहाथ पकडले.आश्चर्याची बाब म्हणजे या हॉटेलमध्ये भाजपचे नेते विनोद तावडे कार्यकर्त्याच्या तावडीत सापडले.या घटनेची खबर लागताच आयोगाचे अधिकारी व पोलीस धटनास्थळी दाखल झाले व त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.निवडणुका जाहीर झाल्यापासून वसई व नालासोपारा,या दोन विधानसभा मतदारसंघात बाहेरून कोट्यवधी रु आणण्यात आले आहेत.निवडणूक आयोगाने जागोजागी तपासणी नाके उभारून येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली आहे.मग या रकमा विविध ठिकाणी पोहोचतात कशा ? पोलिसांनी ॲम्ब्युलन्स,बँकेच्या एटीएम साठी रकमा घेऊन येणारी वाहने व कंटेनर्स यांची तपासणी होणे गरजेचे होते.याप्रकरणी निवडणूक शाखेकडे तक्रार करण्यात आली आहे.पण येथील निवडणूक अधिकारी सुरुवातीला तक्रार नोंदवून घेण्यास तयार होत नव्हते.या ठिकाणी भाजप नेते विनोद तावडे सापडल्यामुळे भाजपचा खरा चेहरा आता उघड झाला आहे.

