दीपक मोहिते,
निवडणूक पर्व,
आ.राजेश पाटील ; ” आपल्या हक्काचा माणूस,”
विकासकामांवर ८३० कोटी रु.खर्च करणारा लोकप्रतिनिधी,
बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी आपल्या मतदारसंघात सुमारे ८३० कोटी रु.चा निधी खर्च केला असून हा एक विक्रमच म्हणावा लागेल.या निधीतून त्यांनी केलेली विकासकामे,ही विरोधी उमेदवारांची झोप उडवणारी ठरली आहेत.
या निधीतून त्यांनी बोईसर मतदारसंघाच्या ग्रामीण व शहरी भागात रस्ते,स्मशानभूमी,समाज मंदिरे,पाणीपुरवठा,साकव,पूल,वसतीगृहे इमारती,तरंगती जेट्टी,जेट्टीची दुरुस्ती,चक्रीवादळ निवाराकेंद्र व अन्य पायाभूत सुविधा विकास कामावर खर्च केला.त्यांनी केलेल्या विकासकामामुळे बोईसरच्या ग्रामीण भागाचा चेहरा मोहराच बदलला गेला.मेरिटाईम बोर्ड,जलजीवन मिशन,पर्यटन,भौतिक पायाभूत सुविधा,मुख्यमंत्री ग्रामसडक योजना,अल्पसंख्यांक विकास कार्यक्रम,सार्व.बांधकाम विभाग,डोंगरी विकास,आदिवासी विकास विभाग व अन्य विभागाकडे आ.राजेश पाटील यांनी आर्थिक निधी मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला व तो मिळवून अनेक विकासकामे मार्गी लावली.गेल्या पाच वर्षांत मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यावर सिमेंट-काँक्रीटचे रस्ते,समाज मंदिरे बांधली तसेच विविध सरकारी योजनेतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून दिली.विशेष म्हणजे आदिवासी पाड्यांवर पिण्याच्या पाण्याची सोय केली.यापूर्वी अनेक पाडे पाण्यावाचून तहानलेले होते.आज याम पाड्यावरील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत नाही.जलजीवन व जलशिवार योजनेचा आपल्या मतदारसंघातील गोरगरीब जनतेला फायदा मिळावा,यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करणारे ठरले.अवकाळी व परतीच्या पावसामुळे शेती व बागायतीचे झालेल्या नुकसानीची शासनाने त्वरेने पाहणी करावी व आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी,यासाठी त्यांनी लोकनेते आ.हितेंद्र ठाकूर व आ.क्षितिज ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली संबधित मंत्र्याची भेट घेऊन वेळोवेळी चर्चा केली व त्यांना दिलासा मिळवून दिला.त्यामुळे बोईसरवासीयांना आ.राजेश पाटील हे ” आपला हक्काचा माणूस,” वाटतात.या निवडणुकीत आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत.यावेळी ते विक्रमी मताधिक्य घेत निवडून येणार,नानिवली,चहाडे व अन्य गावातील ग्रामस्थांनी माध्यमांना सांगितले.

