वसंत भोईर,वाडा,
कुयलू ग्रामपंचायत कार्यालयावर निषेध मोर्चाचे आयोजन,
आपल्या विविध मागण्यांसाठी ग्रामविकास संघर्ष समितीतर्फे कुयलू ग्रामपंचायत कार्यालयावर उद्या सकाळी १०.३०वाजता आपल्या न्याय हक्कांसाठी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
कुयलू ग्रामपंचायत हद्दीतील प्रदूषणकारी टायर कंपन्यांचे सर्व काम तात्काळ थांबवण्यात यावे,बंद पडलेली जलस्वराज्य व नळपाणी पुरवठा योजना सुरु करण्यात यावी,रोजगार हमी योजनेची थकीत मजुरी तातडीने मजुरांना देण्यात यावी,घरकुल लाभार्थ्यांना पावसाळ्यापूर्वी बांधकामासाठी निधी द्यावा, महीला ग्रामसभा न घेता फक्त सह्या घेतल्या जातात,याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी,ग्रामस्थांच्या माहीती अधिकार अर्जावर मुदतीत उत्तर दिले जात नाही, त्याचीही चौकशी करण्यात यावी.अशा विविध मागण्यांसंदर्भात ग्रामविकास संघर्ष समितीचा कुयलू ग्रामपंचायत कार्यालयावर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन संघर्ष समितीतर्फे करण्यात आले आहे.

