मनिष म्हात्रे,वसई
शिवसेना ( उबाठा ) महिला आघाडीतर्फे महायुती सरकारचा जाहीर निषेध,
विधानसभा निवडणूकीत महायुती सरकारने लाडक्या बहिणींच्या मतांवर डोळा ठेऊन लाडकी बहिण योजनेत ६०० रु.ने वाढ करून २१०० रु देणार असे आश्वासन देत सत्ता मिळवली.आता त्याच बहिणींचा १५०० रु. चा हप्ता रडत खडत देणा-या सरकारचा शिवसेना ( उबाठा ) पालघर जिल्हा महिला आघाडीने आज जोरदार निषेध केला.
वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे,अशा महिलांच्या उन्नतीसाठी दरमहा १५००/ रु.अशी लाडकी बहिण योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली. विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींचे मानधन १५०० रु.वरून २१००/ रु. करण्याचे जाहीर आश्वासन दिले.आणि त्यांच्या मतांवर सत्ताही मिळवली,पण प्रत्यक्षात गेले दोन महिने लाडक्या बहिणींचे मानधन रखडत रखडत जमा झाले,पण १५००/ इतकेच.
२१००/ चे आश्वासन देऊन सत्ता मिळवली आणि खात्यात प्रत्यक्षात १५००/ रु.जमा करून लाडक्या बहिणींचा राज्य सरकारने अपेक्षाभंग केला आहे.
त्यामुळे या अपेक्षाभंग करणाऱ्या राज्य सरकारच्या या कृत्याचा पालघर जिल्हा शिवसेना ( उबाठा ) महिला आघाडीने, तीव्र निषेध केला आहे.तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस व तहसीलदार,वसई यांना लाडक्या बहिणींची फसगत केल्याप्रकरणी निवेदन दिले आहे.ज्यामध्ये थकीत अनुदान त्वरीत खात्यात जमा करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
याप्रसंगी महिला जिल्हा संघटक किरण चेंदवणकर यांच्या पुढाकाराने उपजिल्हा संघटक भारती गावडे,तालुका संघटक अँजेला तांडेल, विधासनभा समन्वयक नयना वर्तक,शहर संघटक संगीता भोईर,जशिंथा पिंच,चरणा म्हात्रे,रुचिता विश्वासराव,वंदना नांदविकर,शीला लष्करे,उपशहर संघटक रश्मी नायर,प्रणाली दरडे,सुदेशना मकासरे,विभाग संघटक सपना कदम,उपविभाग संघटक सुलोचना मुसगे,शाखा संघटक मालिनी म्हात्रे तसेच अनेक महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होत्या.
राज्य शासनाच्या या निदर्शनाच्या कार्यक्रमास वसई तालुकाप्रमुख प्रथमेश राऊत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

