अविनाश मढवी,नालासोपारा,
मनपाच्या करवाढीविरोधात सेनेचा ( उबाठा ) आंदोलनाचा इशारा,
वसई विरार शहर महानगरपालिकेने सन २०२५ – २६ या आर्थिक वर्षासाठी पाणीपट्टीदरात २५ %, व निवासी आणि व्यवसायिक मालमत्ता करात ५ ते ७ % दरवाढ केली आहे.त्या संदर्भात विरोध करणारे निवेदन पालघर जिल्हाप्रमुख प्रविण म्हाप्रळकर यांच्या नेतृत्वाखाली वसई विरार महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्ताना देण्यात आले.येत्या पंधरा दिवसात ही दरवाढ अग्रक्रमाने रद्द करण्यात यावी,अन्यथा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने वसई विरार शहर महानगरपलिका विरोधात ‘’ तीव्र निदर्शने,’’ करेल असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर नाना पाटील,जिल्हा सचिव राजाराम बाबर,तालुकाप्रमुख वसई प्रथमेश राऊत,बोईसर तालुका प्रमुख काकासाहेब मोटे,उपतालुका प्रमुख सचिन म्हात्रे,उपतालुका प्रमुख राजन पाटील,वसई विधानसभा संघटक शशिभूषण शर्मा,राज सिंह,शहरप्रमुख प्रदीप सावंत, संजय गुरव,विवेक पवार,उदय जाधव,जेष्ठ पदाधिकारी नरेश वैद्य,महिला आघाडी व युवासेना पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

