वसंत भोईर,वाडा,
माझी शेती,माझा सातबारा,
मीच नोंदवणार पीक पेरा,
ई-पिक पाहणीसाठी राज्यात एक डिसें.पासून डीसीएस प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यासाठी अँड्रॉइड ॲप अपडेट करावे लागणार आहे.या नव्या ॲपच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला ई-पीक पाहणी सहजरीत्या नोंद करता येणार आहे.शेतातील बांधावरची झाडे देखील या ॲपच्या माध्यमातून सातबारावर नोंदविता येणार आहेत.प्रत्येक शेतकऱ्याला एक नवीन आयडी मिळणार आहे.विविध योजना दिल्यास त्याची सर्व माहिती मिळणार आहे.
ई- पिक पाणी कशासाठी?
खरीप रब्बी हंगामात पेरणी केलेल्या पिकांचे क्षेत्र अचूक नोंद करण्यासाठी ई-पिक पाहणी महत्वाची आहे.
नव्या डीसीएस ऍपमध्ये काय आहे?
ॲपमध्ये सर्व नोंदी शेतावर जाऊन करायचे आहेत.दीप व रब्बी पिकांची नोंद या ॲप च्या माध्यमातून वैयक्तिक स्वरूपात होणार आहे.
५० मीटरपेक्षा दूर असलेला फोटो नाही चालणार!
या ॲपमध्ये प्रत्यक्षात शेतात उभे राहून पीकविरा नोंदवावा लागणार आहे.पूर्वी घरबसल्या कोणत्याही पद्धतीचा पीक पेरा लावता येत असे.आता शेतात त्या गटात कोणते पीक आहे,याची नोंद होणार आहे.
बांधावरची झाडे ही नोंदवता येणार
शेतात वृक्ष लागवड केली असेल तर,या ॲपमुळे त्या झाडाची,त्या गट नंबर मध्ये नोंद करता येणार आहे.
… तर मिळणार नाही नुकसान भरपाई
ई- पिक पाहणी नोंदी शिवाय अतिवृष्टी व कोणत्याही कारणाने झालेल्या नुकसानीचे नुकसान भरपाई मिळणार नाही.पुढे बँक कर्ज देणार नाही.
शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीची ई- पीक पाहणी करून घ्यावी. अतिवृष्टी, शेती संदर्भात शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी हे आवश्यक आहे. या ॲपच्या माध्यमातून नोंदी कराव्यात.
-संजय घरत, कृषी अधिकारी

