संजय लांडगे,वाडा शहर,
मांडा-वावेघर ग्रामपंचायत सरपंचपदी अमृता ठाकरे,
वाडा तालुक्यातील मांडा – वावेघर ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी असलेल्या वेदिका दळवी यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला होता.त्यामुळे मागील काही दिवसापासून ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त होते.सरपंचपद काही काळ रिक्त राहिल्यामुळे ग्रामपंचायतची अनेक विकासकामे खोळंबली होती.त्यामुळे निवडणुकीद्वारे थेट सरपंचपदाची निवडणूक होईपर्यंत सरपंचपदाचा तात्पुरता कारभार उपसरपंच असलेल्या ठाकरे यांच्याकडे देण्यात आला होता.
मांडा- वावेघार ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी थेट निवडणूक झाली होती.या निवडणुकीत वेदिका दळवी या बहुमताने निवडून आल्या होत्या. मात्र त्यांनी २० ऑक्टों.रोजी आपल्या वैयक्तिक कारणांमुळे
सरपंचपदाचा राजीनामा वाडा पंचायत समितीच्या सभापतींकडे दिला होता.२१ नोव्हें. २०२४ रोजी झालेल्या मासिक सभेत हा राजीनामा मंजूर करण्यात आला.त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३८ (२) अन्वये गट विकास अधिकारी, वाडा यांच्याकडून उपसरपंच असलेल्या अमृता अजित ठाकरे यांच्याकडे सरपंचपदाची निवड होईपर्यंत सरपंच पदाचा कार्यभार सोपवण्यांत आला.
अमृता अजित ठाकरे यांची सरपंच म्हणून निवड झाल्यामुळे त्यांचे वाडा तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

