जव्हार प्रतिनिधी,
जव्हार येथे सौर उपसा सिंचन प्रणालीचे थाटामाटात उदघाट्न,
खडखड येथे सौर उपसा सिंचन प्रणालीचे उद्घाटन, शाश्वत शेतीस चालना,
शेतकऱ्यांसाठी पाण्याची उपलब्धता वाढवून शाश्वत शेतीस चालना देण्यासाठी खडखड येथे सौर उपसा सिंचन प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले.हा प्रकल्प असीम इंफ्रास्ट्रक्चर फायांनान्स लि.मुंबई यांच्या सीएसआर निधीतून बायफ संस्थेच्या सहकार्याने राबवण्यात आला.आहे.
या उद्घाटन समारंभात एआयएफएल -आयवीडीपीच्या सीएसआर प्रमुख विनया क्षीरसागर, खडखड गावच्या सरपंच सुनंदा घाटाळ,डावखरे आणि बायफ संस्थेचे सीपीएम प्रदीप खोसे यांच्या हस्ते सौर उपसा सिंचन प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले.कार्यक्रमाचे नियोजन आणि यशस्वी आयोजन करण्यासाठी प्रकल्प पथकातील राहुल रूपवते, सुनील घुगे,पूनम ठोंबरे,हेमंत सरोडे आणि वैभव कापडणीस यांनी विशेष मेहनत घेतली.या सौर उपसा सिंचन प्रणालीमुळे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असून शेतीसाठी स्वच्छ व सक्षम ऊर्जेचा वापर शक्य होणार आहे.
जलसंधारण वाढवून पाण्याचा कार्यक्षम वापर होईल,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.तसेच महिला व शेतकरी गटांना शेतीसाठी अधिक संधी निर्माण होतील.
कृषी क्षेत्र भेटी आणि निरीक्षणे
समारंभानंतर कृषी हस्तक्षेपांचे मूल्यमापन करण्यासाठी मान्यवरांनी विविध ठिकाणी क्षेत्रभेटी दिल्या.यामध्ये
पीक विविधीकरण,भूखंड भेट, जेथे विविध प्रकारच्या पिकांची लागवड आणि त्याचे फायदे दाखवण्यात आले.
सुगंधी फुलशेतीतून उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने राबवण्यात आलेल्या उपक्रमाची पाहणी करण्यात आली.
जलसंधारणच्या माध्यमातून जलसंपत्तीची वाढ कशी करता येईल,याविषयी निरीक्षण करण्यात आले.यावेळी महिलांच्या स्वयंरोजगारासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घेण्यात आली.
गट विहिरीना भेटी देऊन खडखड गाव सामूहिक पाणीसाठ्याच्या व्यवस्थापनाचे फायदे तपासण्यात आले.
स्थानिक शेतकऱ्यांनी या प्रकल्पाचे भरभरून स्वागत केले असून,सौरऊर्जेवर आधारित सिंचनामुळे शेतीत अधिक उत्पादन मिळणार आहे,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.भविष्यात अशा योजनांचा अधिकाधिक विस्तार करून पाण्याचा शाश्वत विकास आणि कृषी उत्पादन वाढवण्यावर भर द्यावा,अशी मागणीही त्यांनी केली.
बायफ संस्था आणि एआयएफएल यांच्या सहकार्याने भविष्यात अधिक शेतकऱ्यांना या सुविधेचा लाभ मिळावा,यासाठी नवीन योजना राबवण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.

