मनिष म्हात्रे,वसई
चौथ्या राज्यस्तरीय शुटींगबाॅल स्पर्धेत टेंभुर्णी,सोलापूर संघ
अंतिम विजेता,
वसईतील रंजन क्रीडा मंडळ, देवाळेतर्फे ८ मार्च रोजी चौथी कै.मनिष वर्तक स्मृती चषक भव्य राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा पार पडली.
राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत राज्यातील अनेक दिग्गज संघ उतरले होते.त्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण २४ नामवंत संघाचा समावेश होता.या स्पर्धेत टेंभुर्णी,सोलापूर संघाने आपला दबदबा सुरुवातीपासुन कायम ठेवला,तर मालेगाव संघ उपविजेता ठरला.
या शूटिंग बॉल स्पर्धेच्या उद्घाटनास पालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती सुदेश चौधरी,बसीन कॅथोलिक बॕकेचे संचालक ओनिल आल्मेडा,सोमवंशी क्षत्रिय समाज महामंडळ वसईचे अध्यक्ष नरेंद्र राऊत,कार्यकारी विश्वस्त सुरेश वर्तक आदी मान्यवर उपस्थित होते.स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास वसई विकास सहकारी बँकेचे संचालक अवनीश वर्तक,समाज मंदिर ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी केवल वर्तक,वसई विकास बॕकेचे तज्ञ संचालक संजय वर्तक,आंतरराष्ट्रीय क्रीडापटू विजय चौधरी,भारत वर्तक,उषा वर्तक,प्रशांत म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा निरीक्षक म्हणून दिपक सावंत यांनी काम पाहिले.स्पर्धा नियंत्रक म्हणून प्रफुल्ल वाईरकर व तांत्रिक निर्णय अधिकारी म्हणून रत्नदीप रावराणे यांनी जबाबदारी पार पाडली.उत्कृष्ट शूटिंगबॉल खेळाडू तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातनाम शूटिंग बॉल पंच अशोक दाभोळकर यांनी स्पर्धेस जातीने उपस्थित राहून मंडळास मार्गदर्शन केले. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अनेकांनी बहुमोल सहकार्य केले.
वसंईतील देवाळे येथील मनिष वर्तक हा उत्कृष्ट शुटींगबाॕलपटू होता.त्याच्या अकाली निधनानंतर कुटुंबीय व मित्र परीवार यांनी त्याच्या स्मुतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय शुटींग बाॕल स्पर्धा आयोजित करण्यास सुरुवात केली.यंदा या स्पर्धेचे चौथे वर्ष होते.विजेत्या व उपविजेत्या संघास रोख रक्कम व चषक देण्यात आला.तसेच स्पर्धेत सहभागी सर्व संघ,बेस्ट शुटर,बेस्ट डिफेंन्सर,बेस्ट नेटमन,सर्वोत्कृष्ट खेळाडू,अशी वैयक्तीक बक्षिसे देण्यात आली.शूटिंग बॉल स्पर्धेत प्रथम विजेता जयंत घोरपडे स्पोर्टस् ,टेंभुर्णी,सोलापूर हा संघ ठरला.उपविजेता संघ
इस्तियाक,मालेगाव तर तिसरा क्रमांक कै.राधा दामोदर,अलिबाग यांनी पटकावला. बेस्ट शूटर व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू नाना चौगुले- सोलापुर,बेस्ट डिफेन्सर
इम्रान-मालेगाव, बेस्ट नेटमन -निहाल म्हात्रे यांना गौरवण्यात आले.

