जव्हार प्रतिनिधी,
जव्हार येथे तालुकास्तरीय शेतकरी मार्गदर्शन व पशुपालक प्रशिक्षण शिबिर संपन्न,
जव्हार तालुक्यातील मौजे कशिवली नं.२ ( जुनी जव्हार ) येथे जिल्हा परिषद पालघर व पंचायत समिती जव्हार,यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शेतकरी मार्गदर्शन शिबीर व पशुपालक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद पालघरचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती संदिप पावडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.तर अध्यक्षीय स्थान पंचायत समिती जव्हारच्या सभापती विजयाताई लहारे यांनी भूषवले.यावेळी पंचायत समिती जव्हार गटविकास अधिकारी दत्तात्रय चित्ते,सहा. गटविकास अधिकारी संदेश दुमाडा,जुनीजव्हार ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच निलेश भोये,उपसरपंच संजय भोये,वाळवंडा सोसायटीचे चेअरमन दैनात लहारे,पेसा समिती अध्यक्ष राजू भोये,विभागप्रमुख अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी सभापती कृषी व पशुसंवर्धन समिती ड्रॉ संदीप पावडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शेतकरी व पशुपालकांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा आणि शेतीमध्ये अत्याधुनिक व यांत्रिक तंत्रज्ञानाचा वापर करावा,असा आग्रह व्यक्त केला.त्यांनी सेंद्रिय शेतीच्या फायद्यांवर प्रकाश टाकत, रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचे आवाहन केले. तसेच,पशुपालन व शेती यांची सांगड घालत शेतीसाठी पूरक जोडधंदा म्हणून शेळीपालन, कुक्कुटपालन यांसारख्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.कार्यक्रमात पंचायत समिती सभापती विजयाताई लहारे यांनी गावातील स्थलांतर थांबवण्यासाठी रोजगारनिर्मिती व लघुउद्योगांना चालना देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.त्यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतमाल प्रक्रिया व विक्रीसाठी बचत गटाना प्रोत्साहन देण्याचा उल्लेख केला.कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली व त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. पशुसंवर्धन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जयकुमार सातव यांनी पशुपालन क्षेत्रात उपलब्ध योजनांची माहिती दिली व शेतकऱ्यांच्या अडचणीसंदर्भात मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात महिला बचतगटांनी रानभाज्यांचे पाककृती प्रदर्शन भरवले, ज्याचे मान्यवरांनी कौतुक केले.याशिवाय दिव्यांग लाभार्थी व महिला शेतकऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका कृषि अधिकारी,पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी,तसेच ग्रामपंचायत कशिवलीच्या पदाधिकाऱ्यांचा विशेष सहभाग होता.पुरुष व महिला शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

