नदीम शेख,पालघर,
पालघर येथे क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन,
१५ जाने.रोजी खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त राज्य क्रीडा दिन दरवर्षी साजरा करण्यात येतो.
यंदाही या जयंतीचे औचित्य साधून पालघर येथे १४ व १७ वर्षाखालील मुलांकरिता क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.स्पर्धेत पालघर जिल्ह्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच शासनमान्य खासगी अनुदानित विनाअनुदानित स्वयं अर्थसहायित प्राथमिक व माध्यमिक शाळा कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय,शासकीय तसेच शासनमान्य खासगी विद्यापीठ क्रीडा संस्था, असोसिएशन,क्रीडा मंडळ, क्रीडा अकॅडमी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवावा,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी केले.१५ जाने.रोजी स्पर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात होणार असून,स्पर्धकांनी सकाळी १०.३० वाजता उपस्थित राहावे,असे क्रीडा विभागाकडून कळवण्यात आले आहे.

