नवीन पाटील,सफाळे
केळवे येथे ज्येष्ठ नागरिकांचे स्वास्थ शिबिर संपन्न,
सफाळा परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचे एक दिवसीय स्वास्थ्य शिबिर केळवा रोड, रोठे येथील श्री अंबिका योग सेवा केंद्र,येथे नुकतेच पार पडले.विजय पाटील,नरेश पाटील,आणि भिका सोनवणे यांच्या संयुक्त सहकार्याने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात २७ सदस्य सहभागी झाले होते.
शिबिराची सुरुवात प्रार्थना,दीप प्रज्वलन, संस्थेची माहिती,प्रस्तावना तसेच संस्थेच्या कार्याची प्रत्यक्ष पाहणी,त्यानंतर अजित भाईनी ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त माहिती देऊन मार्गदर्शन केले.योग शरीरातील प्रत्येक पेशीला बरे करण्यासाठी आणि वाढवण्याचे कार्य करत असल्याने,तुमचे शरीर आपोआप अधिक रोगप्रतिकारक बनते,असे सांगितले.डायबेटिस हा रोग नाही,आपल्या आत्मशक्तीच्या जोरावर व डायबिटीसला इतर रोगाला दूर करू शकतो असे पुढे त्यांनी स्पष्ट केले.दामोदर चव्हाण,सुहास सुभाष पाटील यांनीही मार्गदर्शनपर भाषणे केली.श्रद्धा पालांडे,वैशाली ताई यांनी नाष्टा,चहा व सहभोजनाचे व्यवस्था केली होती.संपूर्ण शिबीर खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. शिबीराचा समारोप करताना ज्येष्ठ मंडळीने उपस्थितांचे आभार मानले.

