जव्हार,प्रतिनिधी,
जव्हार येथे सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रशिक्षण शिबीर,
पालघर जिल्हा पोलीस व जव्हार पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सायबर सुरक्षित मोहिम अंतर्गत सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जव्हार येथे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणामध्ये जव्हार तालुक्यातील ३५० तरुण सहभागी झाले होते.
या शिबिरात सहभागी झालेल्या तरुणांना यावेळी सायबर सुरक्षेविषयी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.सायबर पोलीस कक्षाचे पो.अं.म. रुपेश पाटील आणि म पो.अं.म. स्नेहल डोरे यांनी पिपिटी आणि प्रोजेक्टरच्या सहाय्याने सायबर गुन्हे,त्यांचे vividh प्रकार,तसेच त्यावर प्रतिबंधात्मक उपाय,याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.सायबर गुन्ह्यांची तक्रार कशी नोंदवावी,त्यासाठी कोणतते अँप्स आणि वेबसाइटचा वापर करावा, तसेच पालघर पोलीस विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरील सुविधा कशा वापरायच्या,याची माहिती देण्यात आली.प्रशिक्षणा दरम्यान सायबर सुरक्षेसंबंधी व्हिडिओ दाखवण्यात आले, जेणेकरून उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्यक्ष गुन्हे ओळखण्यास आणि त्यांना रोखण्यास मदत करणे शक्य होईल.सहभागी प्रशिक्षणार्थ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निरसन करण्यात आले. प्रशिक्षणा दरम्यान जव्हार चे पोलीस निरीक्षक किशोर मानभाव तसेच जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता,असे प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असून, भविष्यात अशा उपक्रमांची संख्या वाढवण्याची आवश्यकता असल्याचे मत अनेक तरुणांनी यावेळी व्यक्त केले.

