सचिन परब,विरार
विरारच्या प्रतिक चव्हाण याची आंतरराष्ट्रीय मास्टर स्पर्धेसाठी निवड,
७ व्या राष्ट्रीय मास्टर्स गेम्स फाउंडेशन ( रजि ) आयोजित ६ ते ०९ मार्च २०२५ दरम्यान राष्ट्रीय मास्टर जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धा बिरसा मुंडा स्टेडियम,ओडिशा येथे पार पडल्या.
या स्पर्धेमध्ये विरारच्या प्रतिक प्रकाश चव्हाण याने पुरुष गटातील २०० मीटर फ्रीस्टाईल – सोलोमध्ये सुवर्णपदक व १०० मीटर फ्रीस्टाईल सोलोमध्ये रजतपदक,पुरुष ४०० मीटर हर्डल सोलोमध्ये रजत पदक, मेन्स रीले ४ × ४०० मीटर रनिंग टीम सादरीकरणामध्ये रजतपदक मिळवले होते.
प्रतिक याने स्पर्धेत मिळवलेल्या घवघवीत यशामुळे त्यांना महाराष्ट्र रीले संघाचे कॅप्टनपद भूषवण्याचा बहुमान मिळाला आहे.
प्रतिक चव्हाण हे मूळचे विरारचे रहिवासी असून विवा महाविद्यालय येथे प्राणीशास्त्र विषयाचे सहा.प्राध्यापक आहेत.या स्पर्धेवेळी हेमंत कोने ( जॉईन सेक्रेटरी , मास्टर्स गेम्स असोसिएशन ) , बाळा चव्हाण ( जनरल सेक्रेटरी,मास्टर्स गेम्स असोसिएशन ) मान्यवर उपस्थित होते.तसेच प्रतीक याची मलेशिया – श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मास्टर स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

